नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक / संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली. . सदर स्पर्धेतीलअंतिम फेरीत निवड झालेल्या ९ एकांकिकेंना मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री. नीरज शिरवईकर - बुलढाणा, मा.श्री. मंगेश कदम-पुणे, मा.श्री. संतोष पवार-पुणे, मा.श्री. राजेश देशपांडे-कोल्हापूर, मा.श्री. विजय केंकरे-बीड, मा.श्री. कुमार सोहोनी-नाशिक, मा.श्री. अद्वैत दादरकर-अहमदनगर, मा.श्री. चंद्रकांत कुळकर्णी-मुंबई, मा.श्री. विजू माने – विरार यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन मार्गदर्शन केले आहे आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या ९ एकांकिकांना नामांकित ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक मार्गदर्शन करण्य