पोस्ट्स

चित्रनगरीच्या चित्रांगण कट्ट्यावर नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रीशक्तीच्या गौरवाचा विशेष उपक्रम.

इमेज
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव, तिच्या संघर्षाचा सन्मान आणि तिच्या कर्तृत्वाचा जागर घडवणारा ‘तेजोमयी – जागर स्त्रीशक्तीचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण कट्ट्याच्या वतीने आयोजित करण्यात आला. चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या.     स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. देवीच्या आराधनेपासून ते आधुनिक स्त्रीच्या आत्मभानापर्यंतचा प्रवास संगीत, नृत्य, कविता आणि अभिवाचन अशा विविध कलाप्रकारांतून उलगडण्यात आला. स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि वैचारिक पैलूंसह तिचा संघर्ष, जिद्द, स्वाभिमान, नात्यांमधील भावबंध आणि कर्तृत्व यांचे संवेदनशील दर्शन या सादरीकरणातून घडले.     या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती सारंगधर आणि अभिनेत्री स्वानंद...

मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत सस्पेन्सचा थरार : शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव यांचं '२३ वा मजला'.

इमेज
 मराठी रंगभूमीवर जेव्हा एखादं थ्रिलर नाटक येतं, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणण्यासाठी तेवढंच पुरेसं नसतं; तर ते नाटक आशय आणि विषयाने कसदार असणंदेखील गरजेचं असतं. अशाच एका उत्कंठावर्धक नाटकाची घोषणा झाली आहे - '२३ वा मजला'. सवाईगंधर्व, नाट्यपुष्प आणि अथर्व थिएटर या तीन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती असलेलं हे नाटक मुंबईतील एका आलिशान उंच इमारतीत घडतं आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे आणि समिता भरत काणेकर यांची निर्मिती असणारी ही सस्पेन्स थ्रीलर गोष्ट लवकरच रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन यशस्वी लेखकांची दीर्घकाळाची मैत्री, त्यातून उभी राहिलेली व्यावसायिक भागीदारी आणि पुढे हळूहळू उलगडत जाणारी एकमेकांची रहस्यं व कारस्थानं, या सगळ्यातून रंगतो सूडाचा एक धोकादायक खेळ. मित्रप्रेम, लोभ आणि धावपळीच्या युगात सहजपणे होणारा विश्वासघात यावर हे नाटक जोरदार प्रकाश टाकतं. उत्कंठा, पांढरपेशी विनोद, गूढ हालचाली आणि प्रत्येक क्षणी येणारी अनपेक्षित वळणं यातून "पुढे काय घडणार?" हा प्रश्न प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्...

‘दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगला ‘आदि अनंत’चा संगीत अनावरण सोहळा.

इमेज
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘आदि अनंत’मधील ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुण्यात चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाला पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्याची साथ देत ठेका धरला.  या खास संगीत मैफलीसोबतच कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पाही रंगल्या. या सोहळ्याला पद्मश्री अशोक सराफ, छायाचित्रकार, दिग्दर्शक महेश लिमये, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, निर्माते मुरलीधर छतवानी, समीर हंपी, अनिकेत मराठे, रविंद्र औटी आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केलं आहे. तर राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्यात आर्तता आणली आहे. महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ हा नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सहवासाचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधू...

चित्रनगरीची नारीशक्ती दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील (IAS) यांच्या समवेत महामंडळाच्या अधिकारी- कर्मचारीवृंद

इमेज

आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मजनू-लैलाच्या प्रेमकहाणीला ‘वॉमँटिक’ ट्वीस्ट.

इमेज
‘नखरेवाली’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विनोद, भावना आणि हटके ‘वॉमँटिक’ अंदाज असलेला हा ट्रेलर रोमँटिक कॉमेडीला एक नवी रंगत देतो. गोंधळ, मिश्किल संवाद आणि आजच्या नात्यांमधील गंमतीजमती यांची सांगड घालत हा चित्रपट प्रेम आणि नात्यांबद्दलच्या अपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने मांडतो. या ट्रेलरमध्ये काही पुरुष प्रेमाकडे कसे पाहतात, महिलांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीबद्दल त्यांची काय भूमिका असते आणि ज्या महिलांना ते डेट करतात, त्यांच्याशी वागण्याची पद्धत आणि ज्यांच्याशी त्यांना लग्न करायचे असते, त्यांच्याबद्दलची विचारसरणी यात किती फरक असतो, हे दाखवण्यात आले आहे. प्रेमाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पनांपासून सुरू होणारी ही गोष्ट हळूहळू प्रेमकहाणीत बदलते. आपल्या आवडत्या व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी माणूस किती पुढे जाऊ शकतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळते. हसत-खेळत ही कथा समाजातील स्त्री-पुरुषांमधील भेदभाव आणि दुहेरी निकषांवरही प्रश्न उपस्थित करते.    या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या हटके पोस्टरला “कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पड़ता है” या मजेशीर...

आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
नवरात्रीच्या मंगलमय पर्वात आई अंबाबाईच्या भक्तीचा स्वर घेऊन ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे सुंदर पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांच्या भेटीला आले आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा आणि भक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रीत या गीताच्या माध्यमातून अंबाबाईच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा सुरेल अनुभव रसिकांना घेता येणार आहे. पारंपरिक लोकगीताला नव्या संगीताची जोड देणारे हे गीत देवीच्या भक्तांसाठी भक्तिरसाची अनुभूती देणारे ठरत आहे. या गीताला दुर्गेश काळे यांचा स्वर आणि संगीत लाभले असून गीताचे बोल पारंपरिक आहेत. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर हे या गीताचे निर्माते असून आदित्य पाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभलेल आहे. साईरत्न एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गीत प्रदर्शित झाले आहे.    निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर म्हणतात, “नवरात्री हा आई अंबाबाईच्या भक्तीचा आणि शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. या मंगलमय पर्वात ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या लोकपरंपरेतील अशी भक्त...

‘प्रेमायण’,राष्ट्रीय पुरस्कार विजेते भिमराव मुडे यांची नवी कलाकृती ‘स्टेज ओटीटीवर’.

इमेज
‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’ 'डावपेच' आणि ‘कौल मनाचा' 'तारिणी'अशा विविध कलाकृतींमधून आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता *‘प्रेमायण’* या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडणारे भिमराव मुडे यावेळी प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर *‘प्रेमायण’* ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून प्रदर्शित होणार आहे. ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भिमराव मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील *‘प्रेमायण’* हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या वेबसिरीजचे ते क्रिएटर असून, राजेश पाठक (कंटेंट हेड स्टेज मराठी)यांच्या कथेला ...