पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मालिका विश्वातून व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे पदार्पण.

इमेज
मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे ५ ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक 'युनिव्हर्सिटी' असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.     आपल्या या पहिल्या वहिल्या नाटकाबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते, "मालिकांच्या शूटिंगमध्ये आपल्याला पटकन प्रतिसाद द्यावा लागतो, कधीकधी 'क्विक डिलिव्हरी' करावी लागते. पण नाटकाच्या तालमींत एका वाक्याचे विविध अर्थ आणि हावभाव कसे बदलतात, हे शिकायला मिळतंय. मालिकांमधून प्रसिद्धी मिळते, पण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या 'लाईव्ह' प्रतिक्रियांची जी ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच आहे. मालिकेच्या सेटवर चुका सुधारण्यासाठ...

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित.

इमेज
   समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत, ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुण्यातील उद्योगपती तसेच रामकथा प्रवचनकार श्री. रवींद्र पाठक यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या चित्रपटाविषयी सध्या सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे. अधिक मासानिमित्त आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामकथा मानस पसायदान’ या विशेष प्रवचन कार्यक्रमात ‘समर्थ’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे भव्य अनावरण करण्यात आले. आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला भाविक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.     यावेळी बोलताना श्री. रवींद्र पाठक म्हणाले, “‘समर्थ’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळात किती प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतात, हे नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात...

हसवणार...घाबरवणार...आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार.

इमेज
मनोरंजनाचा दर्जा कायम राखत नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांसमोर आणणारे झी स्टुडिओज आणि कायरा कुमार क्रिएशन्स आता प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  भय आणि हास्य यांचं जबरदस्त मिश्रण असलेल्या या चित्रपटात सोशल मीडियावरील आपल्या भन्नाट रील्स, कॉमिक टायमिंग आणि मजेशीर कंटेंटमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे स्टार कॅान्टेन्ट क्रिएटर्स पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम एका हटके आणि धम्माल अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाच्या नावातच रहस्य, मजा आणि थोडासा गोंधळ दडलेला असताना, या हॉरर-कॉमेडीमागची नेमकी कथा काय आहे? हे सगळे कोणत्या भानगडीत अडकणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.  दिग्...

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन!‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट.

इमेज
ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहाण्यासाठी नागरिकांना शहरांवर अवलंबून राहावे लागते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत थेट नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे भव्य लोकार्पण नुकतेच मुंबईत पार पडले. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिनेसृष्टीतील दीपक तिजोरी, दिग्दर्शक अभिजीत पानसे, विजू माने, समीर विद्वांस, आशिष बेंडे, सुबोध खानोलकर, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश सादर करण्यात आला. तसेच या सोहळ्यात ‘किस्सा शुरू टॉकीज’ चा विस्तार महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये करण्याची घोषणाही करण्यात आली.    ‘किस्...

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा साधू अवतार चर्चेत.

इमेज
झी स्टुडिओजच्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  चित्रपटातील त्यांच्या गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा साधूचा अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साधूची भूमिका असली तरीही त्यांच्या मिश्कीलपणाची व खुमासदार अंदाजाची झलक टीझरमध्ये दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांची सहजता आणि देहबोलीमुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळाच रंग मिळाला आहे. मकरंद अनासपुरे यांनी यापूर्वीही विविध छटांतील भूमिका साकारल्या आहेत, मात्र साधूच्या गेटअप...

‘जीव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.

इमेज
दर्जेदार आशयघन चित्रपट युवा पिढीसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुजाण प्रेक्षकवर्ग घडविण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘जीव’ चित्रपटाचे प्रदर्शन  मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांसह बहुसंख्येने प्रेक्षक उपस्थित होते. दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जीव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह चित्रपटातील प्रशांत कांबळे, रविंद्र जाधव, उषा रविंद्र जाधव, समृद्धी रविंद्र जाधव,  प्रसाद कुंभार, करण जाधव, विशाल नामदेव सिरसट, अक्षय कदम,...

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,व भंडारी समाज उत्कर्ष मंडळ, विक्रोळी.यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.

इमेज
विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी‌ सभागृहामध्ये ह्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर श्री. ‌ जयप्रकाश पेडणेकर व श्री.विकास राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.उमेदवारांना मार्गदर्शन श्री. आदित्य कांबळी सर व त्यांचे सहयोगी श्री.सर्वेश दामले यांनी केले.विद्यार्थी प्रतिनिधींचा उत्तम सहभाग लाभला, या शिबिरात ५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर साहेबांनी भंडारी समाजातील तरुणाईला आव्हान केले, की रोटी, कपडा, मकान हे जर साध्य करायचं असेल, तर आपल्याकडे आर्थिक पाठबळ लागते, आणि याचाच अर्थ वित्य संस्थेकडे नोकरी केल्यास ते सहज शक्य होते. आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्या मुली होत्या. डॉक्टर श्री. जयप्रकाश पेडणेकर यांनी या उपक्रमाची खूप प्रशंशा केली, व भंडारी समाजाच्या तरुणाईला यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यासपीठावरती भंडारी उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा सौ. गावकर मॅडम, तसेच अ.भ.भ.स.महासंघाच्या विश्वस्ता श्रीमती रिटा मीठ बावकर,  व महासचिव श्री.प्रकाश कांबळी, तसेच टिळक नगर चेंबूर येथील  नगरसेवक श्री.अविनाश मयेकर, त्याचप्...

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे प्रदर्शन लांबणीवर.

इमेज
   गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा सिनेमा असून याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचेही लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील.    ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाच्या टीजर ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या मनात घर केल्याच पाहायला मिळालं. यानंतर सगळ्या प्रेक्षकांना २९ मे ची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी आता प्रेक्षक वर्गाला...

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'मोशन पोस्टर प्रदर्शनाद्वारे आगामी मराठी चित्रपटाची घोषणा...

इमेज
समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद कित्येकदा रुपेरी पडद्यावरही उमटतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून काही अप्रकाशित पैलू उजेडात येतात. आजवर समाजात घडलेल्या अनेक घटना आणि प्रकरणांवर आधारित वास्तवदर्शी चित्रपट बनले आहेत. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणाऱ्या या चित्रपटांनी सरकारी व्यवस्थांनाही धारेवर धरले आहे. नुकतीच घोषणा झालेल्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटातही संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या अशाच एका गाजलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करून 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे मोशन पोस्टरवर घोषित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यां...

‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे गाणं प्रदर्शित

इमेज
   झी स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आता आणखी एक खास आणि मनाला भिडणारं गाणं ‘देवा मला पाव की रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं भावविश्वाला स्पर्श करत थेट मनात घर करणारं आहे. सई ताम्हणकरवर चित्रित या गाण्यात ईश्वराकडे मनापासून केलेली प्रार्थना, संकटाच्या काळात देवाकडे धाव घेणाऱ्या मनाची आर्त हाक आणि श्रद्धेची भावनिक गुंफण या गाण्यातून अनुभवायला मिळते.   कधी आयुष्यातील संकटं, कधी असहायता तर कधी मनातील वेदना अशा अनेक भावनांनी भरलेल्या क्षणी मन देवाकडे धाव घेतं. हीच भावना या गाण्यात सुंदरपणे मांडण्यात आली आहे. गाण्याचे शब्द, सूर आणि गायन या तिन्ही माध्यमांतून सायली खरे यांनी या गाण्याला एक वेगळीच आत्मीयता दिली आहे. ‘देवा मला पाव की रे’ या गाण्याची गीतकार, संगीतकार व गायन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या गीतातील भावनांचा गहिरा प्रवास आणि  प्रेक्षकांना अंतर्मुख करते. हे गाणं मनातील भावना आणि देवाशी सं...

गीत ध्वनीमुद्रणाने 'लाईव्ह' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त...

इमेज
आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियाच्या काळात 'लाईव्ह' गोष्टी पाहण्याला खूप महत्त्व आले आहे. आता हेच 'लाईव्ह' चित्र प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे, पण ते कसे हे आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना समजणार आहे. 'लाईव्ह' शीर्षक असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला आहे. रिद्धी बिद्धी व्हिजन या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे 'लाईव्ह' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. संजीव राय यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, त्यांनीच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. संजीव राय यांनी पूनम विभूते यांच्या साथीने चित्रपटाचे संवादलेखनही केले आहे. अंधेरी येथील रेकॉर्डिंग पंचम स्टुडिओमध्ये 'लाईव्ह'मधील मुहूर्ताचे गाणे रेकॅार्ड करण्यात आले. याप्रसंगी गायक, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. गीतकार महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी सुमधूर संगीत दिले आहे. गायिका डॉ. नेहा राजपाल यांच...

‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
   सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.  मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.  चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे. यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झ...

‘गणा धाव रे’मधून प्रेक्षकांना मिळणार अध्यात्मिक अनुभूती.

इमेज
   मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा, सांस्कृतिक भान आणि भावनांचा हळुवार स्पर्श यांचा प्रभावी संगम घडवणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अध्यात्मिक आणि भावविश्वाला स्पर्श करणारा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहेत. ‘बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘गणा धाव रे’ हा आगामी मराठी चित्रपट श्रद्धा, माणुसकी, परंपरा आणि भक्तीभाव यांच्या गाभ्याशी जोडलेली एक भावस्पर्शी कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, नूतन जैन , चैतन्य राणे आणि रिचर्ड पीटर्स यांच्या नेतृत्वाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत रिचर्ड पीटर्स यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण टीमने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. बाप्पांच्या चरणी नतमस्तक होत ‘गणा धाव रे’च्या चित्रीकरणाला अधिकृत सुरुवात करण्यात आली. श्रद्धा आणि भक्ती या...

मा.श्रीमती स्वाती चिटणीस व मा.श्री. दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री मा.श्रीमती स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते मा.श्री. दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर ‘पुरस्कार वितरण समारंभ’ रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजता यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई ४०००१६ येथे संपन्न होणार आहे.      या सोहळ्यात व्यावसायिक नाट्यपुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक प्राजक्त देशमुख (नाटक : करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास  (नाटक : कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ऋतुजा बोठे  (नाटक : चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार किशोर इंगळे  (नाटक : कुटुंब किर्रर्रतन),  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार अजित परब ...

देवदत्त नागेचा दमदार नवा लूक; ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता.

इमेज
   हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.  आतापर्यंत ‘आदिपुरुष’मधील हनुमंत, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील सूर्याजी मालुसरे, ‘सत्यमेव जयते’मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड, तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ मधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि तेलगू चित्रपट ‘कमसराजू’ मधील ‘देवकी नंदन वासुदेवा’सारख्या विविध व्यक्तिरेखांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद प्रभावीपणे सिद्ध केली आहे. प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी सादर करत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. आता मात्र देवदत्त एका पूर्णपणे नव्या आणि अनपेक्षित अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत.     ‘घबाडकुंड’ या आगामी चित्र...

'देऊळ बंद २' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज.

इमेज
    २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या 'देऊळ बंद' चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. 'वटवृक्ष एण्टरटेन्मेंट' निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. "आता परीक्षा देवाची..." या अत्यंत आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक टॅगलाईनसह येत असलेला हा भव्य चित्रपट येत्या २१ मे २०२६ रोजी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'देऊळ बंद २' चे कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष या विषयांवर प्रकाश टाकणारे आहे. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनुसार, या भागामध्ये शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या, त्यांचे आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांमधील ...

तब्बल तीन दशकांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांची जोडी रंगभूमीवर एकत्र.

इमेज
मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत असून, या बहुप्रतिक्षित नाटकाचे नाव आहे ‘आता थांबवायचं कसं?’ "मुलीचा बाप म्हणून ती कथा पाहून मी आतून हादरलो!" – डॉ. गिरीश ओक ३० वर्षांनंतर सुकन्या मोने यांच्याशी पुन्हा जुळलेल्या समीकरणाबद्दल डॉ. गिरीश ओक भावूक होत सांगतात की, "सुकन्यासोबत ३० वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्य...

मनातील गुंतागुंत वाढविणारा 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित...

इमेज
   नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या डोळ्यांना दिसतं ते सत्य की आपल्याला होणारे भास खरे या अनाकलनीय कोड्याचे उत्तर शोधणारा 'दृश्य-अदृश्य' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे कथानक, आघाडीच्या कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि कुशल दिग्दर्शन असलेला 'दृश्य-अदृश्य' हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी'मध्ये या चित्रपटाने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. आजवर बऱ्याच आशयघन ...

प्रथमच वेंगुर्ल्यात रंगणार मराठी चित्रपट महोत्सव.

इमेज
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०व्या) वर्षानिमित्त सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारा भव्य ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २३ ते २६ मे २०२६ दरम्यान हा चार दिवसीय चित्रपट महोत्सव ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह’, वेंगुर्ला येथे रंगणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि आशयघन आठ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. वेंगुर्ल्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या या चित्रपट महोत्सवामुळे चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी संस्कृती, नातेसंबंध, भावना आणि सामाजिक आशय यांचा सुंदर संगम असलेले विविध विषयांवरील चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ याच्या विशेष प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच ‘बटरफ्लाय’, ‘बापल्योक’, ‘गुलकंद’, ‘एप्रिल मे ९९’, ‘फुलवंती, स्थळ आणि ‘द्विधा' यांसारखे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या महोत्सवातून वेंगुर्ल्याच्या मातीतील चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांना मानाचा मुजरा करण्यात ...

‘रंगकर्मी क्रिकेट लीग मध्ये ‘स्टार मराठा’ ठरली विजेती.

इमेज
मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात १४ व १५ मे रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर पार पडली. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली होती. दोन दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेत रोमांचक सामने, चौकार-षटकारांची आतषबाजी आणि खेळाडूंचा उत्साह प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ला विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.    या स्पर्धेत हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार मराठा’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तर संचित यादव यांच्या नेतृत्वाखालील ‘वीर मराठा’ संघाने उपविजेतेपद मिळवले.    स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखवलेला संघभावना, मैत्री आणि क्रीडाभाव यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मुळे रंगकर्मींच्या नात्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना सहभागी कलाकारांनी व्यक...

क्षितिज पटवर्धन यांच्या 'भूमिका' नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश.

इमेज
 समकालीन भारतीय रंगभूमीवर बहुचर्चित 'भूमिका' हे क्षितिज पटवर्धन लिखित नाटक आता अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने 'मॉडर्न क्लासिक' ठरले आहे. विविध प्रकारच्या अस्मिता टोकदारपणे जपणाऱ्या अराजकसदृश समकालीन पर्यावरणात मानवतेचे, विवेकाचे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य ठसठशीतपणे अधोरेखित करणाऱ्या या नाटकात प्रबोधनाची अफाट क्षमता आहे आणि म्हणूनच या नाटकाचा समावेश करण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे. अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर यांनी २१ वर्षांनंतर या नाटकाद्वारे रंगभूमीवर दमदार पुनरागमन केले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक कलाकाराच्या आयुष्यातील मानसिक गुंतागुंत आणि वास्तव व अभिनय यातील पुसट होत जाणारी रेषा प्रभावीपणे मांडते. नुकताच या नाटकाला मानाचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मान' प्रदान करण्यात आला आहे. 'भूमिका'ने आतापर्यंत विविध विभागांत १५ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले...

शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज,आगर अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष 'श्री. नवीनचंद्र‌ बांदिवडेकर' यांच्या हस्ते दीप प्रज्वलन.

इमेज
   शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज, आगर यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष 'श्री. नवीनचंद्र‌ बांदिवडेकर' दीप प्रज्वलन केलेतसेच त्यांनी शॉपिंग गॅलरी चे उद्घाटन केले. याप्रसंगी विश्व भंडारीचे जयंत पाटकर, शेषवंशी भंडारी समाजाचे श्री. शैलेश पटेल, व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे पालघर जिल्हाप्रमुख श्री. मनोज पाटील, तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे महासचिव श्री. प्रकाश कांबळी. व इतर मान्यवर उपस्थित होते. आजच्या या समारंभात डहाणू येथील भंडारी समाज बांधवांना श्री. नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी गुजराती, व मराठीतून भाषण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात भागोजी शेठ कीर व श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचा उल्लेख करून समाजाला प्रबोधन केले.  अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ चे पालघर जिल्हाप्रमुख श्री. मनोज पाटील यांनी भंडारी समाजाच्या पाच पोट जाती पालघर जिल्ह्यातील एकत्रित यावे, आणि एक वज्रमुठ करावी असे आवाहन केले. तसेच श्री. प्रकाश कांबळी या...

वैभव रामकृष्ण चिंचाळकर दिग्दर्शित 'कप बशी' चित्रपटाचा टीजर लाँच.

इमेज
पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका "कपबशी" या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, येत्या १९ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे."कप बशी" चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध  ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, ...

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव इत्यादी साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. या महोत्सवाचे ६वे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. गेल्या पाच पर्वांमध्ये या फिल्म फेस्टिव्हलने महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमाचा समृद्ध वारसा, बदलत्या काळातील कथा आणि प्रादेशिक कथनशैलीतील नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो.    यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये  ‘जैत रे जैत’, ‘तिघी’’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध पॅनल डिस्कशन्स, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसेच प्रादेशिक कथाकथनाच्या बदलत्या प्रवाहांवर विशेष चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार...

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत, अद्याप प्रदर्शित न झालेला नवाकोरा चित्रपट पाहण्याची सिनेप्रेमींना संधी.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट बाजार विभाग, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यासारख्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवलेल्या जीव या मराठी चित्रपटाचे प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच प्रदर्शन होणार आहे.    महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत या चित्रपटाचे प्रदर्शन मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, लघु नाट्यगृह, तिसरा मजला येथे होणार आहे.    'जीव' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले असून शिवाजी शेवाळे, बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, दीक्षा उजागरे, आदर्श जाधव, समीर रामटेके, रवींद्र जाधव, उषा निंबाळकर आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'जीव' चित्रपटाची कथा नेमकी काय आहे? 'जीव - The Creature हा एक मराठीतील महत्त्वपूर्ण आणि आशयघन चित्रपट आहे. दिग्दर्शक रवींद्र जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील श्रद्धा, परंपरा आणि मानवी संघर्ष यांचे अत्यंत...

विशाल ददलानीच्या आवाजातील ‘तुंबाडची मंजुळा’मधील भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर थिरकवण्यासाठी झी स्टुडिओजच्या  ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटातील ‘तर्राट’ हे भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या जोशपूर्ण बीट्स, धमाल वातावरण आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे या गाण्याला बॉलिवूडला ‘बलम पिचकारी’, ‘झुमे जो पठाण’, ‘ मल्हारी ’ अशी अनेक लोकप्रिय गाणी गाणारे  गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांचा दमदार आवाज लाभला आहे. विशाल ददलानी यांच्या एनर्जेटिक गायकीने या गाण्याला एक वेगळीच रंगत भरली आहे.      या गाण्याविषयी विशाल ददलानी म्हणतात, “ ‘तर्राट’ गाणं पहिल्यांदा ऐकल्यावरच मला त्याची तुफान एनर्जी जाणवली. या गाण्यात एक मोकळेपणा, भन्नाट बीट्स आणि सेलिब्रेशनची मजा आहे. हे गाणं गाताना मी स्वतः खूप एन्जॉय केलं आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकही या गाण्यावर तितक्याच उत्साहात नाचतील.”    या गाण्याबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की , "तर्राट साठी जेव्हा गायकां...

’द महाराष्ट्र फाईल्स’ मधील मार तू शिक्का गाणं प्रदर्शित, सपना चौधरी-नागेश भोसलेचा जबरदस्त परफॉर्मन्स.

इमेज
हरियाणाची धडाकेबाज क्वीन सपना चौधरी आता महाराष्ट्राच्या रंगमंचावर आपली खास छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. निमित्त आहे येत्या २९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या बहुचर्चित चित्रपटाचे. या चित्रपटातील "मार तू शिक्का" हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत असून, हरियाणवी तडका आणि मराठी ठसका यांचा भन्नाट संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे. "तेरी आँखों का ए काजल", "काला चष्मा", "घुंघट" यांसारख्या गाण्यांमधून सपना चौधरीने नृत्त्यकला पेश केली तेव्हा संपूर्ण हरियाणा तिच्या तालावर थिरकला होता. आता हाच जलवा ती महाराष्ट्रात घेऊन येत आहे. "मार तू शिक्का" या गाण्यात तिची अदा, तिचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील दबदबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे. या गाण्याला मराठी संगीतविश्वातील दिग्गजांचा दमदार आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण गायकीसोबत सपना चौधरी यांची स्टाईल अशी काही जुळून आली आहे की, हे गाणं रिलीजपूर्वीच चर्चेचा विषय बनलं आहे. त्याचबरोबर आनंद शिंदे आणि वैशाली म्हाडे यांच्या आवाजाने गाण्याला आणखी रंगत आणली...

नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार दमदार नाट्य,‘जोडीचा मामला’

इमेज
आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी, असा विचार निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘जोडीचा मामला’ हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत.  या  नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली  या नव्या नाटकाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध  निर्माता - दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. नवे कलाकार रंगभूमीवर येण्याने नाटकांमधून नवी ऊर्जा पाहायला मिळेल, त्यामुळे नव्यांचं येणं मराठी नाटक व्यवसायासाठी चांगलंच आहे, असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.       ‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ हे दोन अ...

‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री.

इमेज
  अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ‘रंगी’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं  नाव आहे.  चित्रपटात ब्लॅक मॅजिक करताना दिसणारी ‘रंगी’ आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि भयावह उपस्थितीने कथानकात वेगळीच रंगत आणताना दिसणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते... नाव हिचं रंगी...!” ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचं नेमकं वर्णन करते.   आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगतात, ‘घबाडकुंड’मधील ‘रंगी’ ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. थिएटरमधील अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली समज या व्यक्तिरेखेला आकार देताना ...

'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर .

इमेज
   गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ''यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!'' हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विजू माने यांच्या आगामी 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.   ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा मित्रांच्या जगात घेऊन जाणारा, हसवणारा आणि तितकाच रिलेट होणारा चित्रपट घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या गोवा ट्रिपमध्ये नेमकं कोण सहभागी असणार, याची उत्सुकता होती. अखेर या भन्नाट गँगचा खुलासा झाला असून कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर ही ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे या धमाल गँगमध्ये आता अंकुश चौधरीचीही एन्ट्री झाली असून त्यामुळे चित्रपटाची मजा आणखी रंगणार आहे.     नुकतंच या चित...

‘रंगकर्मी क्रिकेट लीग’च्या ‘ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण.

इमेज
 रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’चे सामने १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर रंगणार आहेत. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मध्ये ६ संघ असून त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले आहे. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’ संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच नुपूर दुधवडकर ‘मर्द मराठा’ संघाची धुरा सांभाळणार आहेत. हरीश दुधाडे ‘स्टार मराठा’ संघाचे नेतृत्व करणार असून कांचन पगारे ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे ‘मराठा वॉरियर’ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.     राजकीय नेते श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. ‘कलाकारांमध्ये मैत्री आणि क्रीडाभावना...