पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध...२९ मे २०२६ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार.

 ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका २९ मे २०२६  पर्यंत मागविण्यात येत असून निर्मात्यांनी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका वेळेत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६५ येथे  कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर  www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. निर्मात्यांनी परिपूर्ण अर्ज भरून महामंडळाकडे प्रवेशिका सादर करायच्या आहेत. 

'गोंधळ’नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती....महाराष्ट्र दिनी ‘शहाजीराजे’ची दमदार घोषणा...

इमेज
    महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट जागतिक स्तरावर झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते. पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.   संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व...

२० वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ'.. मनोरंजनाचा नवा 'पॅटर्न'.

इमेज
काही नाटकं ही केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ती आयुष्याच्या एका कालखंडाची आणि जुन्या ऋणानुबंधांची साक्ष असतात. तब्बल २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' हे नाटक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यंदा या नाटकाच्या पडद्यामागे केवळ तांत्रिक तयारी नाही, तर भावनांची एक मोठी गुंफण आहे. रॉयल थिएटर आणि निर्माते मिहिर गवळी यांच्या या नव्या प्रयोगाचे दिग्दर्शक संतोष पवार यांनी या प्रवासातील काही अत्यंत हळवे पैलू उलगडले आहेत. अतुलच्या आठवणी आणि विनयची साथ हे नाटक पुन्हा सुरू करताना समोर उभं होतं ते २० वर्षांपूर्वीचं चित्र. तेव्हा या नाटकात विनोदाची अप्रतिम जाण असलेले अतुल परचुरे होते. आज अतुल आपल्यात नसला तरी, त्याची जागा घेण्यासाठी संतोष पवारांनी अशा एका व्यक्तीची निवड केली, जो अतुलचा केवळ सहकलाकार नव्हता, तर त्याचा शाळकरी मित्र होता - विनय येडेकर.   संतोष पवार भावूक होत म्हणतात, "आम्हाला या भूमिकेसाठी असा कलाकार हवा होता, ज्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली असेल आणि जो या पात्राला पूर्णपणे न्याय देईल. विनय आणि अतुल हे जिवलग मित्र. त्यामुळ...

उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'लाडकी बहीण' चित्रपटाचा टीझर लॉन्च..१५ मे ला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित.

इमेज
   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत काल 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार श्री. संदीप क्षीरसागर, शितल म्हात्रे मॅडम, पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, राज्यमंत्री श्री. योगेश कदम आणि उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.  टीझर लॉन्च दरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून, महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आणि इतर लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत कसा पोहोचत आहे, याचे जिवंत दर्शन घडवणारा आहे." उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती केली की, "येत्या १५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वांन...

'सांस्कृतिक कलादर्पण २०२६' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.

इमेज
 चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित २८ वा “सांस्कृतिक कलादर्पण २०२६” गौरव रजनी पुरस्कार सोहळा मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली. या वेळी यंदाचा मानाचा “सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र आवटी आणि सांस्कृतिक कलादर्पण अध्यक्ष संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाटक विभागात “गोष्ट तिच्या घटस्फोटाची” या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम पुरस्कार पटकावला, तर “फिल्टर कॉफी” आणि “लागली पैज” यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. प्रायोगिक नाटक विभागात “इथेच टाका तंबू” या नाटकाने बाजी मारली. मालिका विभागात “लक्ष्मी निवास” (झी मराठी) या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला, तर “लग्नानंतर होईलच प्रेम” (स्टार प्रवाह) लक्षवेधी मालिका ठरली. चित्रपट विभागात “आदिशे...

'बाप्या'च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता.

इमेज
मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता ट्रेलरमधून थेट कथानकाची झलक दाखवत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ट्रेलरमध्ये राजश्री देशपांडे साकारत असलेली 'बाप्या' ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. तिचा 'शैलजा ते शैलेश' हा प्रवास आणि त्या बदलामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी उलथापालथ ट्रेलरमध्ये ठळकपणे दिसते. गिरीश कुलकर्णीशी तिचं आधीच लग्न झालेलं दिसतेय, त्यांना मुलगाही आहे. तो. पण त्याच वेळी गिरीशचं दुसरं आयुष्यही समोर येतं आणि इथूनच सगळ्या नात्यांचा गुंता वाढताना दिसतो. नात्यांमध्ये गोंधळ का निर्माण होतो आणि या सगळ्यात ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही मैत्री नेमकी कोणती भूमिका बजावते, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.   ट्रेलरमध्ये हलक्याफुलक्या क्षणांसोबतच भावनिक प्रसंगांचीही चांगली सांगड घालण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या अभिनयाची ...

‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित.

इमेज
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय.      पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.    या पोस्टरच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलतांना  स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “कोणत्याही चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्य ...

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात “जीव -द क्रियेचर”आणि “एप्रिल मे ९९” या दोन चित्रपटांची निवड.

इमेज
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स मधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात “जीव -द क्रियेचर”आणि “एप्रिल मे ९९” या दोन चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली. निवड झालेल्या चित्रपटांचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी अभिनंदन केले.    महाराष्ट्रातील आदिवासी कोकणी समाजाच्या परंपरा आणि रूढींवर जीव' (The Creature)  हा चित्रपट असून रविंद्र जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे. रोहन मापुस्कर  दिग्दर्शित एप्रिल मे ९९ हा चित्रपट मैत्रीतले ताण, प्रेमाची सुरुवात, स्वतःला शोधायचा प्रवास आणि उन्हाळी सुट्टीच्या आठवणी ह्या भोवती हा सिनेमा बांधला आहे.    फ्रान्स येथे येत्या १२ ते २२ मे कालावधी मध्ये कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. यामध्ये आयोजन केल्या जाणाऱ्या फिल्म बाजार विभागात सन २०१६ पासून शासनाच्या माध्यमातून महामं...

सुशांत शेलार यांची गावविकासासाठी आग्रही भूमिका.

इमेज
मनोरंजन, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांत सक्रिय असणारे अभिनेता सुशांत शेलार हे सातत्याने नवे उपक्रम आणि समाजभिमुख कामासाठी प्रयत्नशील असतात. आता रत्नागिरी जिल्ह्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत, त्यांनी स्थानिक प्रतिनिधींसह पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. विविध विकासकामांचा प्रस्ताव या भेटीदरम्यान मांडण्यात आला.  यावेळी सांगवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावामध्ये सप्तलिंगी नदीचा गाळ काढून तिचे पुनरुज्जीवन करणे, बहुउद्देशीय सभागृह उभारणे, गणेश विसर्जनासाठी सुरक्षित घाट बांधणे, गावात स्ट्रीट लाईट बसवणे तसेच नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे अशा अनेक मूलभूत सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणालाही प्राधान्य देण्यात आले असून, नदी स्वच्छता आणि परिसराचे जतन करण्यावर भर देण्यात येत आहे.    या विकासकामांसाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने सुशांत शेलार यांनी  मा. मं...

'गोंधळ’चित्रपट....तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून पोहोचणार जगभरात.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठत संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटाने आता जागतिक झेप घेतली आहे. ‘गोंधळ’ तब्बल ७ भाषांमध्ये डब झाला असून, व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा प्रकारे सादर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे. या चित्रपटाने सुरुवातीपासूनच आपल्या वेगळ्या आशयामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, संस्कृतीशी जोडलेली कथा आणि भावनांचा प्रवाह यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहात नाही, तर तो एक वेगळाच अनुभव देतो. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘गोंधळ’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि दमदार कथानकासाठी या चित्रपटाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. तसेच भारताकडून निवड होणाऱ्या ॲास्करच्या अधिकृत प्रवेशासाठीच्या स्पर्धेमध्ये...

‘सृजन द क्रिएशन’ संस्थेचा सहावा वर्धापन सोहळा.

इमेज
लेखक दिग्दर्शक अभिनेता राजेश देशपांडे ह्यांनी कोरोनाच्ग्या काळात जेव्हा सगळं जग ठप्प झालं होतं तेव्हा संकटात संधी ह्या न्यायाने नवोदित कलाकाराना योग्य शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळावं म्हणून सृजन द क्रिएशन ही ऑनलाइन कार्यशाळा सुरू केली. त्या कार्यशाळेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातून कलाक्षेत्रात करियर करू इच्छिणारे नवोदित कलाकार एकत्र आले आणि विविध उपक्रम करू लागले. आता ह्या संस्थेला अर्ध तप होत आहे.   गेल्या सहा वर्षात ह्या संस्थेच्या कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्मस  स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार मिळवले. सृजन द क्रिएशन मधील अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट क्षेत्रात आपले कलागुण दाखवत आहेत. ह्या संस्थेचा येत्या १५ मे रोजी बोरिवली येथे सहावा वर्धापन सोहळा साजरा होणार आहे. त्या निमित्ताने सृजनोत्सव ह्या कार्यक्रमा अंतर्गत सृजन द क्रिएशनचे कलाकार विविध कलाविष्कार सादर करणार असून दिनांक १६ मे रोजी संध्याकाळी तिची शेवटची भेट आणि कॉफिन ह्या दोन दीर्घांकाचे प्रयोग होणार आहेत. आणि रवि...

दुसऱ्या आठवड्यातही ‘सालबर्डी’चा थरार कायम.

इमेज
गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळते आहे. रहस्यमय कथानक, अनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही ‘सालबर्डी’ची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही ‘सालबर्डी’ बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पदार्पणाबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं, ‘प्रेक्षकांनी ‘सालबर्डी’ला दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही मिळत असलेलं प्रेम आम्हाला उत्तम काम करण्याची प्रेरणा देत आहे.’   नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ...

अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पुनरागमन.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी "तुला पाहता" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि  दिग्दर्शन ही  मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे, आनंद काळे, दीपाली विचारे, मानसी पाटील, नचिकेत लेले, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे आणि आकाश शिंदे अशी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.    भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, अशा कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण जोडपं स्वतःची ओळख, नातेसंबंध, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा अनेक भावनिक, सामाजिक आणि वैचारिक ...

'हेरगिरी'ची रिक्षा चालवत दाभोळकर पोहोचले विलेपार्ल्यात.

इमेज
   प्रसिद्ध ऍड गुरु आणि इंग्रजी, हिंदी व गुजराती रंगभूमीवर नाटकांचे विविध ट्रेंड रुजवणारे भरत दाभोळकर पहिल्यांदाच मराठीमध्ये एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. या नाटकाचं पूर्वीचं नाव बदलून आता नवीन मराठमोळं नाव आणि वेगळं रूप नाटकाला देण्यात आलं आहे. या बदलाची घोषणा करण्यासाठी भरत दाभोळकरांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या रिक्षेवर त्या नाटकाचे पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली आणि त्याच रिक्षेने ते विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करायला दाखलही झाले. दाभोळकर हे आपल्या विविध छंदांसाठीसुद्धा ओळखले जातात. त्यांना गाड्यांचा प्रचंड शौक आहे. त्यांच्याकडे विविध पद्धतीच्या गाड्या असून त्यांच्या मालकीच्या दोन रिक्षा आणि रिक्षेचा लायसन्स व बिल्लाही त्यांच्याजवळ आहे.    नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेल्या 'कॅरी ऑन स्पाईंग' या दाभोळकरांच्याच इंग्रजी नाटकावर आधारित असलेल्या या मराठी नाटकाचं नाव "हेरगिरी चालू आहे"असं बदलण्यात आलं असून त्यामध्ये मराठी प्रेक्षकांना नवीन अशी खास दाभोळकरी शैली वापरण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील काही प...

'गोंधळ' चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल.

इमेज
 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी 'गोंधळ' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.   या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते - दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ असिस्टंट डिरेक्टर संकेत सावंत आणि कलाकारांपैकी किशोर कदम, ईशिता देशमुख, अनुज प्रभू उपस्थित होते.     राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.   चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्री.साजणीकर यांनी चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास संवाद साधला. टीमनेदेखील चित्रपटाच्या निर्मितीप...

छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

इमेज
 एज्युकेशन सोसायटीच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छबिलदास शाळेत ‘अक्षीकर पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पार पडला. संस्थेचे आद्य संस्थापक कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी २४ एप्रिल १८९२ रोजी स्थापन केलेल्या या संस्थेच्या मुंबईमध्ये दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, रायगड - उरण येथे मराठी, इंग्रजी माध्यमांसह व सीबीएसई पॅटर्न शाळा - महाविद्यालयांची एकूण संख्या ४९ इतकी असून असुन शिक्षण क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा  लौकिक गौरव विस्तारात आहे. संस्थेची विचारधारा जपणाऱ्या आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हा सोहळा छबिलदास मुला-मुलींची शाळा, दादर येथील अक्षीकर-ताम्हाणे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी देवराज लालचंद राका अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर व माजी विद्यार्थी संजय घाडी, तसेच सनदी लेखापाल व माजी अध्यक्ष (ICAI) मुकुंद चितळे उपस्थित होते. याशिवाय कार्याध्यक...

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत 'गोंधळ' चित्रपटाचे प्रदर्शन.

इमेज
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ आयोजित 'गोंधळ'  या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता लघु नाट्यगृह, तिसरा मजला,पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. गोंधळ’ हा डावखर प्रस्तुत मराठी चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे, प्रभाकर माथपती, विठ्ठल काळे, प्रदीप दळिंबकर, शरद जाधव आणि पूनम पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.  'गोंधळ' हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.   कधी : २४ एप्रिल २०२६ वेळ : दुपारी ४ वाजता  कुठे : लघु नाट्यगृह, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई . प्रवेश - सभासदांसह प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.

‘पीएम व्हिजन टू आर्ट’ टर्न व्हिजन इन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

इमेज
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ७५ विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मा. मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभाग सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “मला जाणीवपूर्वक याचा उल्लेख करावा लागेल की, आपल्या देशातील युवकांमध्ये, युवतींमध्ये किंवा नागरिकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणतात, एक सॉफ्ट पॉवर ...

‘वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय.

इमेज
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.   अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व  मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने  संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते ...

मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' मधून रसिकांच्या भेटीला.

इमेज
 अभिनयाची अचूक जाण आणि संवादांचे वेगवान टायमिंग ही आपली स्वतंत्र शैली जपणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी यांची निर्मिती असलेल्या 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' या नव्या कोऱ्या नाटकाचा शुभारंभ होत आहे. सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या विनय येडेकर यांनी या नाटकासाठी खास वेळ काढण्यामागे एक अत्यंत जिव्हाळ्याचे कारण दडलेले आहे. अतुल परचुरेंच्या आठवणी आणि मैत्रीचा ऋणानुबंध या नाटकाची निवड करण्यामागचे मुख्य कारण सांगताना विनय येडेकर भावूक झाले. ते म्हणतात, "मी गेल्या काही काळापासून 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे दौरे आणि मालिकांच्या चित्रिकरणात व्यग्र होतो. त्यामुळे नवीन नाटक हातात घ्यायला वेळ मिळत नव्हता. मात्र, जेव्हा या नाटकाची संहिता माझ्याकडे आली, तेव्हा ती नाकारणे शक्यच नव्हते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, माझा जवळचा मित्र दिवंगत अभिनेते अतुल परचुरे याने ही भूमिका यापूर्वी अजरामर केली होती. अतुलने ज्या ताकदीने हे नाटक गाजवले, त्याच मंचावर त्याची आठवण जागवत ही भूमिक...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाचा शंभरावा प्रयोग.

इमेज
रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू असून, त्यापैकी काहींनी १००-१५०  प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. मनोरंजनाची भन्नाट मेजवानी घेऊन रंगभूमीवर आलेले ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, आता या नाटकाने आपल्या यशस्वी वाटचालीत शंभर प्रयोगांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत, ‘जिगीषा’ निर्मित, विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग नुकताच अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात साजरा झाला. या विशेष प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेत्री सुचित्रा बादेकर यांसह अनेक मान्यवर मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.   ‘या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग एवढ्या उत्साहात साजरा होताना पाहणे, हा खरोखरच आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ...

'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी'कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य' स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशप...

‘गोंधळ’च्या दिग्दर्शकाची नवीन कलाकृती ‘आभाळवृक्ष‘ लघुकथेचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित .

इमेज
   गोव्यामध्ये झालेल्या ५६व्या इफ्फीमध्ये ‘गोंधळ’ चित्रपटासाठी बेस्ट डायरेक्टर सिल्वर पिकॉक हा पुरस्कार प्राप्त करणारे संतोष डावखर आता एका वास्तववादी कथेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या ‘आभाळवृक्ष’ या नव्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, समाजातील संवेदनशील विषय मांडण्याची त्यांची खास शैली या ट्रेलरमधून पुन्हा अधोरेखित होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेल्या ‘गोंधळ’नंतर येणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे. ‘आभाळवृक्ष’च्या ट्रेलरमध्ये दुष्काळग्रस्त गावाचे वास्तव प्रभावीपणे उभे केले आहे. कोरडी पडलेली जमीन, पाण्यासाठीची झुंज, आभाळाकडे आशेने पाहाणारे शेतकरी आणि पावसाच्या प्रतीक्षेत दिवसागणिक वाढणारी हतबलता या सगळ्या भावनांचा तीव्र अनुभव ट्रेलरमध्ये येतो. मात्र या सगळ्यात एक प्रतीक म्हणून उभा राहाणारा 'आभाळवृक्ष' विशेष लक्ष वेधून घेतो. गावकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचे, श्रद्धेचे आणि पावसाशी जोडलेल्या भावनिक नात्याचे ते जणू एक जिवंत रूप भासते. त्या वृक्षाभोवती फिरणारी भावनिक धाग्यांची गुंफण ट्रेलरमध्ये पा...

'माऊस ट्रॅप' रहस्यमय थरारनाट्य मराठी रंगभूमीवर...

इमेज
प्रख्यात लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचे 'माऊस ट्रॅप' हे नाटक सन १९५२ पासून जागतिक रंगभूमीवर सुरू आहे. याच नाटकाला आता मराठीचे कोंदण लाभले असून, या नाटकावर आधारित 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे मराठी नाटक रंगभूमीवर आले आहे. सस्पेन्स-थ्रिलर या पठडीतील हे नाटक आहे. 'धि गोवा हिंदू असोसिएशन' व 'सुकल्प चित्र' यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाच्या निमित्ताने काही काळाच्या विश्रामानंतर 'धि गोवा हिंदू असोसिएशन' ही संस्था पुन्हा एकदा नाट्य निर्मितीत उतरली आहे.    'सुभेदार गेस्ट हाऊस' या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून, नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे आणि नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख असे सध्याचे आघाडीचे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. 'सुभेदार गेस्ट हाऊस' या नाटकाचे प्रयोग सध्या मोठ्या उत्साहात रंगभूमीवर...

आगामी "कापूसकोंडा" चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र.

इमेज
    चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री  मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो ? या हिरोच नाव आहे "कापूसकोंडा". हा एक गोंडस भुभु - कुत्रा आहे. आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर "कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले दिसले होते. आता तब्बल २२ वर्षांनंतर "कापूसकोंडा" या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र आले असून, बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे.    जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित "कापूसकोंडा" चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा...

‘घबाडकुंड’ मध्ये संदीप पाठक यांचा भन्नाट अंदाज....सोन्यासाठी विहिरीत उतरले.......

इमेज
    चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली आहे.  आता मात्र प्रेक्षकांना संदीप पाठक यांचा एकदम वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या मोहात ते चक्क एका गूढ विहिरीत उतरले आहेत.  पण हे सोनं नेमकं काय आहे? आणि त्यामागचं रहस्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. संदीप पाठक यांच्या ‘दिल्या’ या व्यक्तिरेखेचा अचंबित  करणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये संदीप पाठक यांचा आजवर न पाहिलेला भन्नाट अवतार समोर आला आहे.    ओरस गावातील ‘अल्याड-पल्याड’च्या गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘दिल्या’ आता ‘घबाडकुंड’ युनिव्हर्समधील नव्या कथेत पुन्हा एकदा भेटणार आहे. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी ...

कुमार सोहोनी यांची१२५ वी नाट्यकृती ...'भुल भुलैय्या’

इमेज
  नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे कुमार सोहोनी.. त्यांच्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सतत प्रयोगशील राहणाऱ्या नाट्य प्रयोगशाळेसारखीच वाटते. नवनवीन संहितांचा शोध, नवोदित कलाकारांना संधी आणि सादरीकरणात सातत्याने वैविध्य आणण्याची त्यांची दृष्टी नेहमीच प्रकर्षाने दिसून येते. अशा या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक… ‘भुल भुलैय्या’.   तब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि १२५ नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी ‘भुल भुलैय्या’ या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.     ‘भुल भुलैय्या’ नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून ‘बाबा वर्दम थिएटर्स’ या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. ही संस्था ५४ वर्षांपासून हौशी व प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दोघेही गेली २८ वर्षे नाट्यक्षेत्रात सक्रिय आहेत. राज्यभरातील कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर संधी मि...

प्रविण विठ्ठल तरडेंचे दिग्दर्शन आणि मोहन जोशींचे 'स्वामी'रूप; 'देऊळ बंद २' साठी प्रेक्षक उत्सुक.

इमेज
    बहुप्रतिक्षित "देऊळ बंद 2" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज "देऊळ बंद 2" चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. "देऊळ बंद" मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना "देऊळ बंद 2" मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत.   वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेने हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या च...

'राजा शिवाजी’ चित्रपटाचे पहिले गाणे राजा शिवाजी अँथम "छत्रपती"आज प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
 इतिहासाच्या तेजस्वी वारश्याला भव्य आणि भावपूर्ण स्वरूपात साकार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम "छत्रपती" आज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आले आहे. 'जिओ स्टुडिओज्' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने, देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडियाच्या माध्यमातून सादर झालेले हे गीत प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय संगीतमय अनुभव ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी वारश्याला समर्पित असलेले हे गीत, केवळ एक गाणे नसून शौर्य, अभिमान आणि इतिहासाचा भव्य संगम आहे.    प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या मराठी आणि हिंदी भाषिय आवृत्ती साठी अजय गोगावले यांच्या दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हिंदी गाणं शब्दबद्ध केलं आहे नामांकित गीतकार मनोज मुंतशिर यांनी, जे आजच्या भारतीय अस्मितेचं एक प्रतिक ठरणार आहे. तब्बल ८० गायकांच्या समूहाने साकारलेले हे गीत श्रवणीय भव्यतेचा उच्चांक गाठते. गीतातील प्रत्येक स्वर,...

इलैयाराजा यांचं संगीत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकला.

इमेज
   दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला असून, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’च्या निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर करण्यात आली असून, येत्या १ ऑक्टोबर २०२६ मध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'ढसाळ'मध्ये ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्यांच्या लूकची प्रभावी झलकही समोर आली आहे. ललित प्रभाकरच्या या भूमिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले असून, त्याने साकारलेला ढसाळांचा बंडखोर आणि तडफदार आविष्कार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चित्रपटात दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोही कवी पद्मश्री नाम...

‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ.

इमेज
   युवावर्गाची ऊर्जा, बिनधास्त अटिट्यूड आणि भन्नाट लय यांचा परफेक्ट संगम असलेलं ‘कारट्या’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील हे नवं रॅप गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय.    या गाण्याच रॅपसोबतच आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, त्याची अफलातून दृश्य मांडणी. आजवर अनेक रॅप गाणी आली असली तरी ‘कारट्या’ हे गाणं आपल्या वेगळ्या चित्रणशैलीमुळे ठळकपणे उठून दिसतेय. या गाण्याचं चित्रीकरण एक्स्ट्रा वाइड डायनॅमिक कॅमेरा लेन्सिंगमध्ये करण्यात आलं असून, मोठ्या पडद्यावर पाहाताना हा अनुभव अक्षरशः भव्य वाटेल. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी पहिल्यांदाच इंस्टा ३६० कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये वेगळेपणा आणि नवी ऊर्जा जाणवते.    समुद्रकिनाऱ्यावर चित्रीत केलेली रंगतदार दृश्यं, सतत बदलणारे अँगल्स, विस्तृत फ्रेम्स आणि अनोख्या कॅमेरा हालचालींमुळे ‘कारट्या’ हे ग...

नाट्यगृह भाडेवाढीवर निर्मात्यांचा आक्षेप; स्थगितीची मागणी.

मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात १ एप्रिल २०२६ पासून करण्यात आलेल्या सुमारे रु.४,००० पर्यंतच्या वाढीव निर्णयावर नाट्यनिर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत ही भाडेवाढ तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षी ५% भाडेवाढ करण्याचे नियोजन असताना त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत नाट्यनिर्माते तिकीट दर रु.५०० च्या पुढे वाढवू शकत नाहीत. कारण रु. ५०० पेक्षा अधिक दर ठेवल्यास जीएसटी लागू होतो, ज्याचा आर्थिक भार निर्मात्यांवर येतो.     याशिवाय, दरवर्षी ५% भाडेवाढ सुरू राहिल्यास पुढील ५ ते ७ वर्षांत नाट्यगृहांचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम नाट्य व्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे सध्याची भाडेवाढ स्थगित करून पुढील काळात दर तीन वर्षांनी ५% भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.    नाट्यव्यवसाय टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महानगरपालि...

रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार......

इमेज
   चित्रपट ही केवळ कथा नसते ती एक भावनांची, दृश्यांची आणि विचारांची गुंफण असते. या गुंफणीत प्रत्येक धागा योग्य ठिकाणी बांधण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे असतं. म्हणूनच चित्रपटाच्या यशाचं खरं सूत्र दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनात आणि मांडणीत दडलेलं असतं. सक्षम निर्मितीमूल्यांची जोड मिळाली, की ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते.   अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’. सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या चौधरी यांनी यावेळी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक कथा पडद्यावर साकारली आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला असून, येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.    गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन...

'गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर सर्पमित्राच्या भूमिकेत.

इमेज
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित ‘गोंधळ’ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर साधारण दहा वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये ते सापांचे रेस्क्यू करताना दिसत आहेत. पडद्यामागे कथा घडवणारा दिग्दर्शक प्रत्यक्ष आयुष्यात सर्पमित्र म्हणून कार्यरत असल्याचे पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.    दहा वर्षांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये संतोष डावखर अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने साप हाताळताना दिसतात. कोणतीही घाईगडबड किंवा भीती न दाखवता, सापाला कोणतीही इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत ते त्याला सुरक्षितपणे पकडतात. त्यांच्या या कार्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.    संतोष डावखर हे डोंबिवलीस्थित ‘नेचर सेव्ह सोसायटी’ या कल्याण डोंबिवली मधील संस्थेशी जोडलेले असून, सचिन जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत.    २०१५ पर्यंत य...