पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमीत ‘बंध विमोचन राम’ गाण्याचे भावपूर्ण अनावरण.

इमेज
गुरुपौर्णिमा… गुरुंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस! समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी अनेक पिढ्यांना जीवनाची दिशा दिली. त्याच समर्थ विचारांचा जागर करणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे गुरुपौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर समर्थ रामदास स्वामींच्या कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर भक्तिमय वातावरणात अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र भूमीत झाले असल्याने हा सोहळा अधिकच भावपूर्ण ठरला. समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या सज्जनगडावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून गीताचे अनावरण केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य, सज्जनगडाचे पावित्र्य आणि समर्थांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव यामुळे हा क्षण केवळ एका गाण्याच्या अनावरणापुरता मर्यादित न राहता समर्थ विचारांना अभिवादन करणारा एक सांस्कृतिक सोहळाच ठरला. ‘बंध विमोचन राम’ हे भक्तिगीत समर्थ रामदास स्वामींच्या परमशिष्या संत वेण्णास्वामी यांनी रचलेले असून, त्यांची समाधीही सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीच्या समीप आहे. गुरु-शिष्य परंपरेचे मूर्तिमंत उदाहरण ठ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोडीचा नवा चित्रपट 'मूर्ती'.

इमेज
कला जेव्हा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करते, तेव्हा ती केवळ मनोरंजनाचे माध्यम राहत नाही, तर विचारप्रवर्तक ताकद बनते. अशाच आशयप्रधान आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या आणि विचारप्रवर्तक मराठी चित्रपटासह येत आहे. ‘हलाल' आणि 'भोंगा' सारख्या राष्ट्रीय पुरस्करांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षी निर्मितीतील 'मूर्ती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना संवेदनशीलपणे मांडत, प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवण्याची हातोटी दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी यापूर्वी सिद्ध केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक भान, वास्तवाची जाणीव आणि विचारांना चालना देणारा आशय असतो. त्यामुळेच पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या शिवाजी लोटण पाटील यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष असते.'मूर्ती...

गोव्याच्या सफरीला साऊथचा तडका!‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मधील ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला...

इमेज
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटाने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांना गोव्याच्या धमाल सफरीची झलक दाखवली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक भन्नाट प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या हटके साऊथ इंडियन स्टाईलमुळे हे गाणं विशेष चर्चेत आलं आहे. ‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि धमाल व्हाइब अनुभवायला मिळतात. गाण्याची ऊर्जा, आकर्षक सादरीकरण आणि मनोरंजक कोरिओग्राफीमुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे आहे. गोव्याच्या धमाल वातावरणात साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि भन्नाट प्रवासाची आणखी एक झलक दाखवते.    मराठी चित्रपटात साऊथ इंडियन स्टाईलचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, सोशल मीडियावरही या गाण्याची चांगली चर्चा सुरू आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते व राहुल देशपांडे यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तसेच अवधूत गुप्ते यांनीच या गाण्याचे शब्द लिहले असून त्यांचेच संगीत या गाण्याला लाभले आहे. त्यांच्या संगीताने या गाण्याला एक वेगळीच उर्जा ...

'बंधिनी' चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी.

इमेज
मराठी चित्रपटांत स्त्री विषयक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या उत्तमोत्तम चित्रपटांची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेणारा 'बंधिनी' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.      सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित 'बंधिनी' हा चित्रपट एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो. देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा संवेदनशील वेध घेते. 'बंधिनी' ही केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नसून, प्रत्येक नात्यामधील प्रेम, त्याग आणि आत्मसन्मानाचा अर्थ नव्याने उलगडणारी भावनिक सफर आहे. चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या प्रभावी अभिनयातून ही कथा अधिक सशक्तपणे उलगडणार आहे.    चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरीकर म्हणाले, "आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्नं आणि कुटुंबाची ज...

‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ रंगभूमीवर उलगडणार विठ्ठलभक्ती,श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास.

इमेज
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने एका नव्या आणि आशयघन नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनप्रवास यांचा वेध घेणारी ही कलाकृती असल्याची उत्सुकता पहिल्या पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे.      ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते.’ या आशयपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.    या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून निर्मिती डॉ.उमेश आजगावकर,नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी, स्वाती दिवे मुखर्जी यांनी केली आहे. कथानक, सादरीकरण आणि भावविश्व यांचा सुरेख मेळ साधत हे नाटक प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिग्दर्शक ...

अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र.

इमेज
तरुणाईच्या पसंतीस उतरलेला "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी  प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. "भेटली तू पुन्हा 2" लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे. स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. "भेटली तू पुन्हा" या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे  या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे."भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा सिक्वल येतो आहे हे माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित...

निसर्गाच्या सान्निध्यात रंगणार मराठी कलाकारांची ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिक.

इमेज
पावसाच्या सरींनी राज्यभरातील वातावरण प्रसन्न केलं असून, सर्वत्र हिरवाईची चादर पसरली आहे. अशा आल्हाददायक वातावरणात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही पावसाळ्याचा आनंद एका वेगळ्याच अंदाजात साजरा करणार आहेत. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याने ‘झिम्माड’ या खास पावसाळी पिकनिकचे आयोजन केले असून, पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ या आलिशान ठिकाणी हा मैत्रीसोहळा रंगणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नाच-गाणी, धमाल खेळ, गप्पा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भरपूर मस्तीचा रंगतदार मेळा यावेळी अनुभवायला मिळणार आहे.     पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या मनात काही ना काही सुंदर आठवणी जाग्या होतात. शाळा-कॉलेजच्या दिवसांतील मित्रमैत्रिणींसोबतच्या पावसाळी सहली, धम्माल आणि अविस्मरणीय क्षण आजही प्रत्येकाच्या स्मरणात असतात. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे अशा निवांत भेटी आता दुर्मिळ झाल्या आहेत. हाच धागा पकडत पुष्कर श्रोत्रीने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना एकत्र यायचं आवाहन केलं आणि त्याच्या आवाहनाला ६० हून अधिक कलावंतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा पावसाळ्याचा आनंद ...

’मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये मकरंद अनासपुरेंच्या कॅमिओची कमाल.

इमेज
मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा प्रेक्षकांसाठी छोट्या-छोट्या सरप्राईजेसची पेरणी केली जाते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मध्येही असंच एक खास सरप्राईज दडलं आहे. मकरंद अनासपुरे यांचा या चित्रपटात एक भन्नाट कॅमिओ आहे आणि त्या छोट्याशा भूमिकेतही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. या कॅमिओमधील सर्वात खास बाब म्हणजे मकरंद अनासपुरेंच्या तोंडी असलेला एक हटके संवाद. हा संवाद लिहिताना त्यांच्या कारकिर्दीतील ‘उलाढाल’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘खबरदार’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नऊ महिने नऊ दिवस’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘मला एक चान्स हवा’, ‘डावपेच’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘दे धक्का’, ‘दणक्यावर दणका’ आणि ‘साडे माडे ३’ या गाजलेल्या चित्रपटांच्या नावांचीच हुशारीने गुंफण करण्यात आली आहे.     विशेष म्हणजे, हा संवाद ऐकताना सुरुवातीला तो एक साधा संवाद वाटतो, मात्र लक्षपूर्वक ऐकल्यावर त्यामध्ये मकरंद अनासपुरेंच्या चित्रपटांची नावं एकामागोमाग एक गुंफलेली असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा प्रसंग म्...

‘भूतम भयम्’मधील ‘हॅपी न्यू इयर’ गाण्याचीही प्रेक्षकांमध्ये क्रेझ.

इमेज
प्रदर्शनानंतर सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळवत असलेला ‘भूतम भयम्’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चित्रपटातील प्रत्येक पैलूचं कौतुक होत आहे. थरार आणि विनोदाचा अनोखा मिलाफ, भव्य सेट्स, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, कलाकारांचा दमदार अभिनय आणि मनोरंजक कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपटातील ‘हॅपी न्यू इयर’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.     बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मिका सिंग यांच्या दमदार आणि जोशपूर्ण आवाजाने सजलेलं हे गाणं प्रत्येक सेलिब्रेशनसाठी परफेक्ट ठरत असून श्रीनाथ म्हात्रे यांच्या एनर्जेटिक संगीताला आणि खंडेराव यांच्या शब्दांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या गाण्याची विशेष दखल घेतली असून, थिएटरमधून बाहेर पडताना हे गाणं गुणगुणताना ते दिसत आहेत. यंदाच्या नवीन वर्षाच्या पार्टीत हे गाणं हमखास वाजणार हे नक्की!      या गाण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे लोकप्रिय युट्यूबर श्रीमान लिजेंड अर्थात सिद्धांत जोशी यांची खास उपस्थिती...

अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’,‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच एका वेगळ्या धाटणीचा अँक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी ‘सायको रंगा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. ताजी मांडणी, दमदार अँक्शन, शहरातील आकर्षक झगमगाटासोबत गावातल्या मातीमधील संघर्ष दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना प्रभावित करतो. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला गुढ व्यक्तिमत्वाचा ‘रंगा’ नेमका कोण आहे? शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना शक्तिशाली वाईट प्रवृत्तींना तो नमवू शकतो का ?त्याच्या गूढ वावरामागील रहस्य काय? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून उलगडणार आहेत.  विशेष म्हणजे, ‘विजेता’नंतर पुन्हा एकदा सुबोध भावे आणि देवेंद्र चौगुले ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यांच्यासोबत मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते(दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे,एन डी चौगुले,सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभवी आणि दमदार कलाकारांची ही फळी चित्रपटाच्या कथेच्या मांडणीला अधिक प्रभावी बनवणार आहे.   ...

रिअल ते रील... ‘द्विधा' मध्ये झळकणार मानसी कुलकर्णीसह तिची लेक.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असते. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट 'द्विधा' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या 'श्रावणी' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा' चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या पडद्यावरचा हा पहिलाच ‘ऑनस्क्रीन’ प्रयत्न असूनही तिने आत्मविश्वास, आणि निरागसतेने ही भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.    याविषयी अभिनेत्री मानसी कुलकर्णीने सांगितलं,‘श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना अभिमान वाटत होता, सोबत तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून समाधान मिळालं...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचे मराठी दिग्दर्शनात पदार्पण,सत्य घटनेवर आधारित 'लाडू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
भारतीय चित्रपटसृष्टीत २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि १२ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग आता ‘लाडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत. हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शनाचे अनुभव गाठीशी असणारे शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रचंड गाजत आहे. दिग्दर्शकाचे आत्मीयतेचे पाऊल आणि भव्य कारकीर्द ,‘पेज ३’, ‘कांचीवरम’, ‘हनुमान’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘डोर’ यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मिती करणारे, तसेच भारतातील पहिली पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील कलाकृती भारतात प्रदर्शित करणारे शैलेंद्र सिंग आपल्या या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाविषयी म्हणतात, "मी ७२ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केले...

'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच.

इमेज
काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर येत आहे. २४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या 'एक होतं माळीण' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीवर आधारित मराठीतील हा पहिला मराठी चित्रपट असून तो नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण  कोंजे, दत्तात्रय गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, पंकज म्हात्रे ,श्रीराम भगत, अक्षय म्हात्रे व राजु राणे  यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे  अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे य...

'पाच फुटाचा बच्चन' चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट उलगडणार..

इमेज
   नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे  . कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं  संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, ...

झी टॉकीजवर ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ कार्यक्रमातून अनुभवता येणार विठ्ठलभक्तीचा उत्सव.

इमेज
आषाढी वारी म्हणजे विठ्ठलभक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माचा अखंड उत्सव. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत मार्गक्रमण करतात. या भक्तिमय वातावरणाचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी झी टॉकीजने खास आषाढी सोहळ्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा विशेष कार्यक्रम दररोज सकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश साठे महाराज आणि अनुराधा ताई यांच्या प्रभावी कीर्तनातून संतवाङ्मय, वारकरी संप्रदायाची परंपरा, विठ्ठलभक्ती आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे विचार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. ओघवती वाणी, अभ्यासपूर्ण निरूपण आणि भक्तिरसाने भारावलेले वातावरण यामुळे प्रत्येक भाग हा अध्यात्माचा आनंद देणारा ठरणार आहे.     आषाढी वारीचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा या हेतूने झी टॉकीजतर्फे ‘भेटी लागे जीवा’ हा विशेष कार्यक्रम वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला आहे. भक्ती, कीर्तन आणि आपुलकीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत विठ्ठलभक्तीचा आनंद साजरा ...

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

इमेज
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचा भन्नाट संगम असलेल्या या चित्रपटाचं सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच आता प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज समोर आलं आहे. चित्रपटात आधीच दमदार कलाकारांची फौज असताना आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या चित्रपटात ‘मया’ ही अतिशय वेगळी आणि रहस्यमय भूमिका साकारत आहे.    चित्रपटातील ‘मया’ हा विचित्र स्वभावाचा, अनाकलनीय आणि प्रेक्षकांना सतत संभ्रमात ठेवणारा आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीमागे एक गूढ दडलं असून तो कथेला अनपेक्षित वळण देतो. हा मया नेमका कोण आहे? त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तो नेमकं काय करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.    याविषयी प्रियांदर्शन जाधव म्हणाला, ‘’ ‘भूतम भयम्’चा भाग होणं हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी...

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सादर.

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सर्वांगीण पुनर्विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकासाचा आराखडा तसेच राज्याच्या चित्रपट धोरणाचा मसुदा बुधवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सादर केला.      यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, उप सचिव महेश वाव्हळ, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू उपस्थित तसेच चित्रनगरीसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.       राज्यातील चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी आणि डिजिटल कंटेंट उद्योगाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशासह निर्मात्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधाचा समावेश पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे.      याचबरोबर महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात ...

प्रदर्शनापूर्वीच ‘भूतम भयम्’ची जोरदार हवा!चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून भरभरून कौतुक, आजपासून सर्वत्र प्रदर्शित.

इमेज
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात घर करणं, हे प्रत्येक चित्रपटाचं स्वप्न असतं. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. ट्रेलर, गाणी आणि चित्रपटाची भन्नाट झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता अक्षरशः चाहत्यांच्या प्रेमात रूपांतरित झाली असून, चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याच प्रेमाची खास दखल घेत ‘ऑरेंज ज्यूस गँग’ने चाहत्यांसाठी एक्सक्लुझिव्ह फॅन स्क्रीनिंगची घोषणा केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या पडद्यावर ‘भूतम भयम्’ अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचं समजताच चाहत्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर घोषणा होताच गुगल फॉर्मद्वारे हजारोंची नोंदणी झाली आणि हा क्षण चित्रपटाविषयी असलेल्या विश्वासाची आणि कमालीच्या उत्सुकतेची साक्ष देणारा ठरला.     फॅन स्क्रीनिंगसोबतच निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठीही विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे भरभरून कौतु...

'द इंडिया स्टोरी' : काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्माता सागर बी. शिंदे यांनी घेतली एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट.

इमेज
प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना, चित्रपटातील प्रमुख कलाकार काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे, तसेच दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माते सागर बी. शिंदे यांनी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.      सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुकाराम मुंडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त करत, लाखो लोकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर विषयावर चित्रपट भाष्य करत असल्याचा आनंद व्यक्त केला आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनीदेखील मुंडे यांच्या प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाबद्दल आपला आदर व्यक्त केला. त्यामुळे ही भेट अधिक अर्थपूर्ण ठरली.       झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगान...

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा.

इमेज
आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या भक्तीचा, हरिनामाच्या गजराचा आणि वारकरी परंपरेच्या अखंड श्रद्धेचा पवित्र उत्सव. राज्यभरातील लाखो भाविक ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठ्ठलनामात तल्लीन होतात. याच भक्तिमय वातावरणाची अनुभूती आता घरबसल्या घेता येणार आहे ती झी टॉकीजवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’मधून. भक्ती, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याचे विशेष महत्त्व अधिकच वाढले आहे. कीर्तन, अभंग, भारूड आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे.    या विशेष पर्वात महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकार आपल्या प्रभावी निरूपणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. सोपान सानप, संगीता चोपडे, अविनाश भारती, प्रकाश साठे, भानुदास बैरागी आणि गौरीताई सांगळे हे नामवंत कीर्तनकार आपल्या ओजस्वी वाणीने, संतविचारांनी आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणातून प्रेक्षकांना भक्तीच्या अनोख्या विश्वात घेऊन जाणार आहेत.   संत ज्ञानेश्वर, संत तुकारा...

‘काटकोन त्रिकोण’ - तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास .

इमेज
मराठी रंगभूमीवर आशयघन नाटकांची परंपरा जपणाऱ्या नाटकांमध्ये आता आणखी एका वेगळ्या कलाकृतीची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून, पोस्टरपासूनच या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ‘बुद्धी आणि भावना ह्यांना स्पर्श करणारं नाटक! ’ या एका ओळीतील ओळखच या नाटकाच्या गाभ्याची उत्सुकता वाढवणारी ठरते. सर्वसामान्य वाटणाऱ्या एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि त्यानंतर बदलत जाणारी नात्यांची समीकरणं. प्रत्येक उत्तरासोबत उभे राहाणारे नवे प्रश्न, मनात दडवून ठेवलेली सत्यं आणि भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली माणसं… ‘काटकोन त्रिकोण’ नेमकं काय उलगडणार, याची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे.    या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर या तीन दमदार कलाकारांच्या भूमिका असून, त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील अनेक छटा उलगडणार आहेत.    दिग्दर्शक अजित भुरे म्हणाले, ‘’ ‘काटकोन त्रिकोण’ हा कौटुंबिक थ्रिलर असून प्रत्येक कुटुंबात काही न बोललेले प्रश्न, काही दडवलेली सत्यं आणि काही नाती...

श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान (मठ), अर्नाळा, येथे बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव.

इमेज
   नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या वतीने 'श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान' (मठ), फॅक्टरी पाडा समोर, अर्नाळा, विरार पश्चिम येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यावर्षीही श्रींच्या पादुकांवर अभिषेक करण्याचा संकल्प करण्याचे योजिले आहे. या अभिषेक संकल्पात भाविकांनी सहभागी व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ शक्ती स्थानातर्फे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६, रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अभिषेक होणार असून भाविकांना स्वहस्ते अभिषेक करायचा असेल तर त्यांनी आपली नावे व  गुरु दक्षिणा रु २५१/- खालील नंबरवर पाठवून नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे. तसेच भंडाऱ्याचा 'सुखा शिदा' द्यायचा असेल तरीही संपर्क करावा. या दिनी मठात श्री साईबाबांच्या पवित्र द्वारकामाई मशीद व धुनीचे चलचित्र पाहण्यास मिळणार असून कीर्तनकार श्री व सौ.गोखले- तळेगाव यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सौ मेघा घोडे : ८१४९४७४९९१

'द्विधा'मधून निमिष कुलकर्णीच मराठी चित्रपटात पदार्पण.

इमेज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘मर्डरवाले  कुलकर्णी’ या मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट 'अग्नि'मध्ये तो झळकला. सध्या 'सनई चौघडे' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणार आहे. येत्या २१ ऑगस्टला 'द्विधा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आदित्य (आदि) व्यक्तिरेखा या चित्रपटात तो साकारत आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे.तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याची त्याच्यात विलक्षण संवेदनशीलता आहे. कधी कधी सर्वात मोठा आधार हा मोठ्या शब्दां...

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. 'अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'घबाडकुंड' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच 'खिचिक', 'डॉक्टर डॉक्टर' आणि 'ढिशक्यांव' यांसारख्या चित्रपटांनंतर 'अल्याड पल्याड' आणि 'घबाडकुंड' या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे.    विशेष म्हणजे, 'घबाडकुंड' च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय, रहस्य, अॅक्शन, इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्...

ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री श्री.शंकरजी महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित रीवा राठोड यांच्या सुमधुर स्वरांतून साकारलेलं भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला,

इमेज
आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतेच या गाण्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं प्रत्येकाला वारीचा आध्यात्मिक अनुभव देत आहे.     या गाण्याला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची मिळाली आहे. ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचं सार शब्दांत प्रभावीपणे मांडलं आहे.या गाण्याची सुंदर ध्वनिचित्रफित सौ.श्वेता परुळकर यांनी केली आहे.हे गाणे डीएफएफने प्र...

'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस'चा ट्रेलर प्रदर्शित..

इमेज
'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेतीच्या गंभीर समस्येवर आणि तिच्या समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रभावी भूमिका असलेला हा चित्रपट दडलेले सत्य उलगडत लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या संकटाची जाणीव करून देतो. दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण असा हा ट्रेलर सत्य, न्याय आणि जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवतो. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने साकारलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   ट्रेलरबद्दल बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, "'द इंडिया स्टोरी' हा केवळ चित्रपट नाही, तर समाजाने करायलाच हवा असा एक महत्त्वाचा संवाद आहे. प...

नीलमताई शिर्के - सामंत,यांचा दिवंगत सचिन माने, यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात .

इमेज
आचार्य अत्रे रंगमंदिराचे साऊंड ऑपरेटर कै. सचिन माने यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. कुटुंबाला 'श्री श्री बालाजी' संस्थेतर्फे १ लाख रुपये आणि बालरंगभूमी परिषद, मध्यवर्तीतर्फे १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या कठीण काळात आम्ही माने कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

'सामना' या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन…

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सामना या चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त 'महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'च्या 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'तर्फे सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात होणार आहे.   मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड  ठरलेल्या या चित्रपटात डॉ.श्रीराम लागू आणि निळू फुले यांची प्रमुख भूमिका असून रामदास फुटाणे यांनी निर्माता म्हणून तर डॉ. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली असून संगीत हे पंडित भास्कर चंदावरकर यांनी दिले आहे . तसेच  या चित्रपटात मोहन आगाशे, विलास रकटे,  स्मिता पाटील अशा मान्यवर कलाकारांनीही...

‘भूतम भयम्’साठी करण सोनावणे शिकला मालवणी भाषा.

इमेज
सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे आता मोठ्या पडद्यावरही तितक्याच दमदार अंदाजात झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्’मध्ये करण एका अस्सल मालवणी तरुणाच्या भूमिकेत दिसणार असून, या भूमिकेला वास्तवदर्शी बनवण्यासाठी त्याने खास मालवणी भाषा शिकण्याची मेहनत घेतली आहे.    करण मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने या भूमिकेसाठी स्वतःवर विशेष मेहनत घेतली. फक्त संवाद पाठ करून न थांबता, मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची सहज शैली समजून घेण्यासाठी त्याने सातत्याने सराव केला. यासाठी त्याने आपल्या मालवणी मित्रांची, चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांची मदत घेतली. संवादांमधील प्रत्येक शब्द नैसर्गिक वाटावा, पडद्यावर कुठेही कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने अनेकदा संवादांची उजळणी करत भाषेवर प्रभुत्व मिळवलं.    याबद्दल करण सोनावणे म्हणाला, “या चित्रपटात मी साकारत असलेलं पात्र मालवणी असल्याचं समजलं, तेव्हाच मला ज...

ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्याने आठवण करून देणारी एक कथा...

इमेज
समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आधुनिक जीवनातील धावपळ, कुटुंबातील मतभेद आणि अध्यात्मातून जीवनाला मिळणारी नवी दिशा यांची भावस्पर्शी झलक या टीझरमधून पाहायला मिळते. टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध—या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची योग्य दिशा देणारे आहेत, हे टीझर सूचकपणे अधोरेखित करतो.    या विचारांचा या कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का? समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत.    दिग्दर्शक...

बहुचर्चित चित्रपट ‘खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर.

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा 'खालिद के शिवाजी' हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर  प्रदर्शित झाला आहे. पी.पी.सिनेप्रोडक्शन प्रस्तुत 'खालिद के शिवाजी' या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रभावी भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत सहजतेने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे. अमेरिकेतील अग्रगण्य मानसिक आरोग्य सेवा संस्था Omni Health Care Services चे अध्यक्ष असलेले मायकल थेवर यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.     दिग्दर्शक राज प्रितम मोरे म्हणाले, '...

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात.

रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा जरा वेगळ्याच कारणासाठी रंगली आहे. कारण असं की, सध्या भूषण प्रधान आणि सायली पाटील आपल्या चाहत्यांच्या लग्नात जाऊन त्यांना सरप्राईज आहेत.  काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर ‘कॅन व्ही अटेंड युअर वेडिंग?’ हे भन्नाट कॅम्पेन सुरू केलं होतं. या हटके संकल्पनेला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नवदांपत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भूषण प्रधान आणि सायली पाटील यांना आपल्या लग्नासाठी प्रेमाने निमंत्रण दिलं. या उत्स्फूर्त प्रतिसादातून काही निवडक लग्नसोहळ्यांना भूषण आणि सायलीने उपस्थित राहात नवविवाहितांना आयुष्यभर लक्षात राहील, असं सरप्राईज दिलं.   या अनपेक्षित भेटीमुळे लग्नसोहळ्यातील आनंद द्विगुणित झाला. नवदांपत्यांसोबत गप्पा, फोटो, सेल्फी, शुभेच्छा आणि धमाल मस्ती करत भूषण आणि सायली यांनी प्रत्येक कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण अनुभवले. कलाकारांना आपल्या लग्नात पाहून अनेक चाहत्यांच्या आनंदाला प...

गोव्याच्या किनाऱ्यावर रंगली ‘डार्लिंग’ची जादू .

इमेज
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी चित्रपटातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोव्याच्या मस्तीने, भन्नाट संगीताने आणि तरुणाईला साद घालणाऱ्या सादरीकरणामुळे ही गाणी चांगलीच चर्चेत आली. आता या चित्रपटातील आणखी एक खास गाणे ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजातील या जबरदस्त गाण्याला अनुराग गोडबोले यांनी तसेच एनर्जेटिक  संगीत दिले असून, गाण्याचे बोल विजू माने यांनी लिहिले आहेत.  या गाण्यात गोव्याच्या रंगतदार वातावरणाची, समुद्रकिनाऱ्यावरील बेफिकीर क्षणांची आणि मैत्रिणींच्या धमाल ट्रिपची झलक पाहायला मिळते. विदुला चौघुले, नेहा खान आणि रुचिरा जाधव यांची गर्ल गँग या गाण्यात फुल्ल ऑन एन्जॉयमेंट करताना दिसते. तिघींचे आकर्षक लुक्स, ग्लॅमरस स्टाईल, उत्साहाने भरलेली ऊर्जा आणि स्क्रीनवरील सहज वावर गाण्याला अधिक रंगतदार बनवतो. मैत्री आणि गोव्याच्या मस्त वाईब्सचा सुंदर मिलाफ असलेले हे गाणे ऐकतानाच पाय ठेका धरू लागतात.     याविषयी दिग्दर्शक, गीतकार विजू माने म्हणाले, ‘’या गाण्यामागे...

भयाच्या सावटात झाला ‘भूतम भयम्’चा ट्रेलर लॉन्च.

इमेज
चित्रपटाच्या घोषणेपासूनच चर्चेत असलेल्या ‘भूतम भयम्’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून एक भव्य, आगळ्यावेगळ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणात हा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाच्या विश्वाची अनुभूती देणाऱ्या खास हॉरर-थीम सेटवर पार पडलेल्या या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्यात उपस्थितांना ‘भूतम भयम्’च्या रहस्यमय दुनियेचीच सफर घडली.  या ट्रेलर लाँच सोहळ्याचं आणखी एक खास आकर्षण म्हणजे ‘ऑरेंज ज्यूस गँग’च्या पालकांची उपस्थिती. या विशेष प्रसंगी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून सुरुवात करून आज मोठ्या पडद्यावर झळकण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ऐकताना वातावरण भावूक झालं. सुरुवातीला कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रात जाण्याबाबत साशंक असलेल्या पालकांनीही आज त्याच मुलांना रुपेरी पडद्यावर पाहून अभिमानाने डोळे भरून आल्याचं सांगितलं. मुलांच्या मेहनतीचं, चिकाटीचं आणि यशाचं कौतुक करताना अनेक पालकांना आनंदाश्रू अनावर झाले. या भावनिक क्षणांनी ‘भूतम भयम्’च्या ट्रेलर लाँ...

‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा थरारक लूक समोर.....

इमेज
बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा केवळ हॉरर नाही, तर विनोद आणि रहस्य यांचा भन्नाट संगम असणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिलाच लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हे पात्र म्हणजे ‘जठाई’! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये ‘जठाई’चं रूप अंगावर काटा आणणारं दिसत आहे. भयावह चेहरा आणि भेदक नजर यामुळे पोस्टर क्षणात लक्ष वेधून घेतं. विशेष म्हणजे या लूकमध्ये दिग्गज अभिनेत्री छाया कदम यांना ओळखणंसुद्धा कठीण झालं आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच त्या अशा पूर्णपणे वेगळ्या आणि धक्कादायक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटात ‘जठाई’ची नेमकी भूमिका काय आहे, ती कथानकात कोणतं रहस्य दडवून ठेवते, याचा उलगडा मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे.टीझरनंतर चित्रपटाबद्दल निर्माण झालेली उत्सुकता या नव्या पोस्टरमुळे आणखी वाढली आहे. सोशल मीडियावरही ‘जठाई’च्या लूकची चर्चा रंगू लागली असून, या ...

प्रेम, रहस्य आणि भावनांचा ‘सुपरनोव्हा’! ‘बोल बोल राणी’तील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
‘बोल बोल राणी’च्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. प्रत्येक पात्राभोवती असलेले गूढ, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची झलक पाहिल्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे ‘सुपरनोव्हा’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, चित्रपटाच्या भावविश्वाची एक वेगळीच बाजू या गाण्यातून समोर येते. सामान्य प्रेमगीतांच्या चौकटीपलीकडे जाणारे ‘सुपरनोव्हा’ हे गाणे ऐकण्याबरोबरच अनुभवण्यासाठीही आहे. सुपरनोव्हा म्हणजे एका ताऱ्याच्या विस्फोटातून निर्माण होणारे अफाट तेज. याच भावनेचा धागा पकडत हे गाणे प्रेमाच्या अशा टप्प्याची गोष्ट सांगते, जिथे भावना इतक्या तीव्र होतात की, त्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात. त्यामुळे हे गाणे चित्रपटातील रहस्य उलगडत नाही, परंतु त्या रहस्यामागील भावनिक विश्वाची झलक नक्कीच दाखवते.    सुझेन डिमोलाच्या भावपूर्ण आवाजाने सजलेले हे गाणे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या आगळ्यावेगळ्या संगीतामुळे आणखी प्रभावी ठरते. सावरी वर्मा यांनी लिहिलेल्या शब्दांमध्ये प्रेम, ओढ आणि अनामिक अस्वस्थतेचा सुंदर मिलाफ आहे. गाण्यात सई ताम्हणकर एका विलक्षण भावविश्वात वावरताना...

'द इंडिया स्टोरी'च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना.....

इमेज
सामाजिक आशय असलेल्या बहुचर्चित 'द इंडिया स्टोरी' या कोर्टरूम ड्रामाचा आणखी एक प्रभावी पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. येत्या २४ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कीटकनाशक शेती आणि त्याचे जनतेच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या संवेदनशील विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका प्रभावी कोर्टरूम ड्रामामधून समाजाला विचार करायला भाग पाडणारा विषय मांडण्यात आला आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे अत्यंत तणावपूर्ण आणि भावनिक प्रसंगात दिसत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा एका धक्कादायक सत्याचा शोध घेत असताना त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागते, याची प्रभावी झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते.     गजबजलेल्या भाजी मार्केटच्या पार्श्...