पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘कॅप्टन तुम्ही, मी नौका...’ गाणे आणि टिझरसह, मनोज जोशींचा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटातील उत्कंठावर्धक लूक रिव्हील.

इमेज
    घोषणेपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाने राजकीय वर्तुळासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडींना रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटात नेमके कोणाचे बुरखे फाटणार? कोणाची गुपिते उघड होणार? कोणाच्या पडद्यामागील कारनाम्यांचा पर्दाफाश होणार? अशा अनेक प्रश्नांनी रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. शीर्षकापासूनच रहस्याची किनार लाभलेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथित वास्तवातील संदर्भांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच आता चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका...’ या गाण्यासोबतच कथित भोंदूबाबाचे पहिले पोस्टरसह टिझर प्रदर्शित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून, या सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली करण्यात आली...

बापलेकाची जोडी 'विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे.

इमेज
सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.  ‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण ही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं...

‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान.

इमेज
मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’च्या यंदाच्या पर्वाची घोषणा सोमवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. हा महोत्सव १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.     मराठी चित्रपटांना केवळ चित्रपटगृहांपुरते किंवा पुरस्कारांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना अधिक व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देणे आणि नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांना प्रोत्साहन देत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने गेल्या वर्षीपासून चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे दुसरे पर्व संपन्न होत असून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित...

‘लग्न आणि बरंच काही’ सिनेमाला सिनेप्रेमींचा भरभरून प्रतिसाद.

इमेज
कधी एका राईट स्वाइपवर जुळणारं कनेक्शन, कधी चॅटिंगमधून फुलणारं प्रेम, तर कधी लग्नाच्या वळणावर बदलणारं नात्यांचं समीकरण. डिजिटल युगातील प्रेमाची ही अनोखी कहाणी ‘लग्न आणि बरंच काही’मधून मोठ्या पडद्यावर रंगत असून प्रेक्षकांच्या मनावर प्रेमाची मोहोर उमटवत आहे. महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांत २३ ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालेल्या वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित ‘लग्न आणि बरंच काही’ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. आजच्या पिढीच्या प्रेमविश्वाचा वेध घेणारी कथा, नात्यांमधील भावनिक चढ-उतार आणि मनोरंजनाची धमाल यामुळे चित्रपट प्रेमींशी नातं जोडत आहे. विशेषतः पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या जोडीला खास पसंती मिळत आहे. आधुनिक नातेसंबंधांचा वेध घेताना विनोद आणि भावनांचा सुंदर समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर या लोकप्रिय जोडीने आपल्या सहज अभिनयातून आणि पडद्यावरील केमिस्ट्रीतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांमधील लहानसहान प्रसंग, संवादांमधील मिश्कीलपणा आणि भावनिक क्षण...

चेतन चावडा दिग्दर्शित 'बागुलबुवा' मराठीतील पहिला 'एआय' चित्रपट.

इमेज
आताच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) प्रभाव सर्वच क्षेत्रांवर वाढत आहे. एआयद्वारे आतापर्यंत काही चित्रपटांची निर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत झालेला नाही. ही उणीवही आता भरून निघाली असून, एआयच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'बागुलबुवा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे खरे कलाकार घेऊन एआयच्या माध्यमातून हा चित्रपट तयार करण्यात आला असून असा नाविन्यपूर्ण प्रयोग करून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. एस एस फिल्म्स प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली असून शरद पाटील, अंजली पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा यांनी या चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केले असून नितिन चव्हाण यांनी पटकथा लेखन, विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स, आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्ड केला आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने या चित्रपटाच्या एआयचे काम पाहिले आहे.आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना गीत साई पियूष यांचे संगीत लाभले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर ...

‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट.

इमेज
काही जोड्या सहज जुळतात, तर काहींची गाठ पडण्यासाठी खास योग जुळून यावा लागतो. असाच एक अनोखा योग जुळून आला आहे ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने! मुक्ता बर्वे-प्रियदर्शन जाधव आणि आरती वडगबाळकर-अंशुमन विचारे या कलाकारांच्या जोड्या पहिल्यांदाच एकत्र आल्या असून, त्यांच्या व्यक्तिरेखांची  जुळून आलेली केमिस्ट्री २३  ऑक्टोबरला  भेटीला आलेल्या ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटाकाचे  खास  आकर्षण  ठरणार आहे.        ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांची निर्मिती असलेल्या ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाचं लेखन देबू बर्वे यांनी केलं असून, दिग्दर्शनाची धुरा मीरा वेलणकर यांनी सांभाळली आहे. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. गीत वैभव जोशी तर गीत संगीत श्रीनाथ म्हात्रे यांचे आहे. पार्श्वसंगीत संतोष जगदाळे यांनी दिलं आहे. वैशाली माडे आणि अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.    काही नाती काळासोबत संपत नाहीत, तर आठवणींतून आणि...

‘जनक’ हा कोर्टरूम थ्रिलर १३ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.

इमेज
ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या सन्मानासाठी लेकच ढाल बनून उभी ठाकते! एका बाजूला आरोपांचं वादळ, तर दुसऱ्या बाजूला बापासाठी सर्वस्व पणाला लावणारी लेकीची जिद्द. अशा संघर्षातून उलगडणारा ‘जनक’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा प्रवास नाही, तर स्वाभिमानासाठी पेटलेल्या लढ्याची कहाणी आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीझर नुकताच सिनेप्रेमींच्या भेटीला आला असून, त्यातील भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’  चित्रपटाचा टीझर बाप-लेकीच्या नात्याची ताकद दाखवतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतो. या टीझरमध्ये सायली संजीव एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसत असून, तिच्या व्यक्तिरेखेचा नवा आणि दमदार पैलू पाहायला मिळतो. वडिलांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी म्हणून तिच्या भूमिकेतील ताकद आणि भावनिक खोली लक्ष वेधून घेते. दुसरीकडे, आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित करणारे अविनाश नारकर यांनी पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. एका बाजूला वैयक्ति...

धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार.

इमेज
विद्रोही कविता, व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज आणि दलित पँथर चळवळीचा धगधगता इतिहास… पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका कवीचा जीवनप्रवास नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या विचारांची क्रांती! हेच वादळी व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजिलेल्या धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  बंडखोर विचार, परखड लेखणी आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कविता यांच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा उलगडणार, याची उत्सुकता या टीझरमुळे अधिकच वाढली आहे.    संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा, संजय पांडे यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या विचारां...

विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘अबीर’चे नवे पोस्टर झळकले,अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्यांना छेद देत स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, मनोधैर्याचा आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा वेध घेणारा ‘अबीर’ हा मराठी चित्रपट रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. मराठी चित्रपटाचा डंका सातासमुद्रापार घुमवणाऱ्या ‘अबीर’ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील निवडीमुळेही विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आता विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या नव्या पोस्टरने या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, सौंदर्याच्या कल्पनांमागील पूर्वग्रह आणि तिच्या अंतर्मनातील भावविश्व यांची झलक देणारे हे पोस्टर चित्रपटाच्या आशयाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करते.     श्री. सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शंभो एंटरटेनमेंट व श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी ‘अबीर’ या चित्रपटाचे पटकथा, संवाद व दिग्दर्शन केले आहे. सौंदर्यामुळे स्त्रीच्या कलागुणांपेक्षा तिच्यातील उणिवांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या सामाजिक मानसिकतेवर चित्रपट ...

बालमनाचा ठेका धरत ‘चिकीझिंग’चे शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला...

इमेज
बालपणीच्या निरागस आठवणी, मातीच्या सुगंधात दरवळणारा आनंद आणि भावंडांच्या नात्यातील निखळ प्रेम यांची सुरेल गुंफण अनुभवायला मिळते ती ‘चिकीझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाच्या शीर्षकगीतामधून! गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे मंत्रमुग्ध करणारे शीर्षकगीत नुकतेच व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खेळकर शब्दरचना, ठेका धरायला लावणारे संगीत आणि ग्रामीण जीवनाचे लोभस चित्रण यांमुळे हे गीत बालपणाच्या रम्य विश्वात घेऊन जाते. बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचे बालगीत आल्याने रसिकांचे लक्ष वेधले गेले आहे. बालपणाचा गोडवा आणि नात्यांची ऊब जपणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण, उमेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राजेंद्र बगाट...

चित्रनगरीच्या चित्रांगण कट्ट्यावर नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रीशक्तीच्या गौरवाचा विशेष उपक्रम.

इमेज
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव, तिच्या संघर्षाचा सन्मान आणि तिच्या कर्तृत्वाचा जागर घडवणारा ‘तेजोमयी – जागर स्त्रीशक्तीचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण कट्ट्याच्या वतीने आयोजित करण्यात आला. चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या.     स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. देवीच्या आराधनेपासून ते आधुनिक स्त्रीच्या आत्मभानापर्यंतचा प्रवास संगीत, नृत्य, कविता आणि अभिवाचन अशा विविध कलाप्रकारांतून उलगडण्यात आला. स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि वैचारिक पैलूंसह तिचा संघर्ष, जिद्द, स्वाभिमान, नात्यांमधील भावबंध आणि कर्तृत्व यांचे संवेदनशील दर्शन या सादरीकरणातून घडले.     या कार्यक्रमात अभिनेत्री अदिती सारंगधर आणि अभिनेत्री स्वानंद...

मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत सस्पेन्सचा थरार : शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव यांचं '२३ वा मजला'.

इमेज
 मराठी रंगभूमीवर जेव्हा एखादं थ्रिलर नाटक येतं, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणण्यासाठी तेवढंच पुरेसं नसतं; तर ते नाटक आशय आणि विषयाने कसदार असणंदेखील गरजेचं असतं. अशाच एका उत्कंठावर्धक नाटकाची घोषणा झाली आहे - '२३ वा मजला'. सवाईगंधर्व, नाट्यपुष्प आणि अथर्व थिएटर या तीन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती असलेलं हे नाटक मुंबईतील एका आलिशान उंच इमारतीत घडतं आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे आणि समिता भरत काणेकर यांची निर्मिती असणारी ही सस्पेन्स थ्रीलर गोष्ट लवकरच रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन यशस्वी लेखकांची दीर्घकाळाची मैत्री, त्यातून उभी राहिलेली व्यावसायिक भागीदारी आणि पुढे हळूहळू उलगडत जाणारी एकमेकांची रहस्यं व कारस्थानं, या सगळ्यातून रंगतो सूडाचा एक धोकादायक खेळ. मित्रप्रेम, लोभ आणि धावपळीच्या युगात सहजपणे होणारा विश्वासघात यावर हे नाटक जोरदार प्रकाश टाकतं. उत्कंठा, पांढरपेशी विनोद, गूढ हालचाली आणि प्रत्येक क्षणी येणारी अनपेक्षित वळणं यातून "पुढे काय घडणार?" हा प्रश्न प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्...

‘दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगला ‘आदि अनंत’चा संगीत अनावरण सोहळा.

इमेज
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘आदि अनंत’मधील ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुण्यात चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाला पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्याची साथ देत ठेका धरला.  या खास संगीत मैफलीसोबतच कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पाही रंगल्या. या सोहळ्याला पद्मश्री अशोक सराफ, छायाचित्रकार, दिग्दर्शक महेश लिमये, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, निर्माते मुरलीधर छतवानी, समीर हंपी, अनिकेत मराठे, रविंद्र औटी आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केलं आहे. तर राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्यात आर्तता आणली आहे. महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ हा नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सहवासाचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधू...

चित्रनगरीची नारीशक्ती दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील (IAS) यांच्या समवेत महामंडळाच्या अधिकारी- कर्मचारीवृंद

इमेज

आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मजनू-लैलाच्या प्रेमकहाणीला ‘वॉमँटिक’ ट्वीस्ट.

इमेज
‘नखरेवाली’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विनोद, भावना आणि हटके ‘वॉमँटिक’ अंदाज असलेला हा ट्रेलर रोमँटिक कॉमेडीला एक नवी रंगत देतो. गोंधळ, मिश्किल संवाद आणि आजच्या नात्यांमधील गंमतीजमती यांची सांगड घालत हा चित्रपट प्रेम आणि नात्यांबद्दलच्या अपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने मांडतो. या ट्रेलरमध्ये काही पुरुष प्रेमाकडे कसे पाहतात, महिलांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीबद्दल त्यांची काय भूमिका असते आणि ज्या महिलांना ते डेट करतात, त्यांच्याशी वागण्याची पद्धत आणि ज्यांच्याशी त्यांना लग्न करायचे असते, त्यांच्याबद्दलची विचारसरणी यात किती फरक असतो, हे दाखवण्यात आले आहे. प्रेमाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पनांपासून सुरू होणारी ही गोष्ट हळूहळू प्रेमकहाणीत बदलते. आपल्या आवडत्या व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी माणूस किती पुढे जाऊ शकतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळते. हसत-खेळत ही कथा समाजातील स्त्री-पुरुषांमधील भेदभाव आणि दुहेरी निकषांवरही प्रश्न उपस्थित करते.    या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या हटके पोस्टरला “कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पड़ता है” या मजेशीर...

आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
नवरात्रीच्या मंगलमय पर्वात आई अंबाबाईच्या भक्तीचा स्वर घेऊन ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे सुंदर पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांच्या भेटीला आले आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा आणि भक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रीत या गीताच्या माध्यमातून अंबाबाईच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा सुरेल अनुभव रसिकांना घेता येणार आहे. पारंपरिक लोकगीताला नव्या संगीताची जोड देणारे हे गीत देवीच्या भक्तांसाठी भक्तिरसाची अनुभूती देणारे ठरत आहे. या गीताला दुर्गेश काळे यांचा स्वर आणि संगीत लाभले असून गीताचे बोल पारंपरिक आहेत. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर हे या गीताचे निर्माते असून आदित्य पाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभलेल आहे. साईरत्न एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गीत प्रदर्शित झाले आहे.    निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर म्हणतात, “नवरात्री हा आई अंबाबाईच्या भक्तीचा आणि शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. या मंगलमय पर्वात ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या लोकपरंपरेतील अशी भक्त...

‘प्रेमायण’,राष्ट्रीय पुरस्कार विजेते भिमराव मुडे यांची नवी कलाकृती ‘स्टेज ओटीटीवर’.

इमेज
‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’ 'डावपेच' आणि ‘कौल मनाचा' 'तारिणी'अशा विविध कलाकृतींमधून आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता *‘प्रेमायण’* या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडणारे भिमराव मुडे यावेळी प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर *‘प्रेमायण’* ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून प्रदर्शित होणार आहे. ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भिमराव मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील *‘प्रेमायण’* हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या वेबसिरीजचे ते क्रिएटर असून, राजेश पाठक (कंटेंट हेड स्टेज मराठी)यांच्या कथेला ...

नात्यांची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन ‘बंधू’ येणार.

इमेज
आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि आपल्या सकस कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी कलाकारांची अदाकारी ‘बंधू’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या एका छोट्या शेतकरी कुटुंबाची गोष्ट मांडणाऱ्या ‘बंधू’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी दोन भावांची भूमिका साकारत असून त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत अभिनेत्री मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.  आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे त्यांच्या अनुभवसंपन्न अभिनयातून या व्यक्तिरेखांना भावनिक आणि सशक्त आयाम मिळणार असून, दोघींची ही भूमिका चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची रंगत आणणार आहे.    अभिनयाची उत्तम जाण आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची ताकद असलेल्या या कलाकारांनी आजवर आपल्या विविधांगी भूमिकांमधून रसिकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता ‘बंधू’ चित्रपटाच्या माध्यमातून हे कलाकार नात्यांच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन प...

मराठी रंगभूमीवर OTTच्या धाटणीचा अनोखा प्रयोग; तीन कथांतून उलगडणार ‘ति ची गोष्ट’.

इमेज
OTTच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात वेगवेगळ्या कथा, व्यक्तिरेखा आणि भावविश्वांचा अनुभव घेण्याची सवय प्रेक्षकांना झाली आहे. हाच अनुभव आता मराठी रंगभूमीवर अनोख्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी केला आहे. सुप्रसिद्ध लेखक आनंद म्हसवेकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या तीन स्वतंत्र कथांना एका सूत्रात गुंफणारा ‘ति ची गोष्ट — Season 1’ हा अभिनव रंगमंचीय प्रयोग प्रेक्षकांसमोर येत आहे. तीन कथा, वेगवेगळी पात्रं आणि बदलत्या परिस्थिती; मात्र या सगळ्यांना जोडणारा समान धागा म्हणजे स्त्रीचं भावविश्व आणि तिच्या मनात दडलेल्या न बोललेल्या गोष्टी! मराठी रंगभूमीला प्रयोगशीलतेची समृद्ध परंपरा लाभली आहे. संगीत नाटकांपासून सामाजिक आणि प्रायोगिक नाटकांपर्यंत रंगभूमीने सातत्याने नवे विषय आणि अभिव्यक्तीची नवी माध्यमं स्वीकारली आहेत. याच परंपरेत डिजिटल मनोरंजनाच्या बदलत्या स्वरूपाचा वेध घेत ‘ति ची गोष्ट’ हा वेगळा प्रयोग आकाराला आला आहे. वेगवेगळ्या कथांमधून प्रेक्षकांना विविध अनुभव देतानाच त्यांना एका समान भावविश्वाशी जोडण्याची संकल्पना या नाटकातून मांडण्यात आली आहे. ‘ति ची गोष्...

‘आजोबा - नातवाच्या नात्यातील प्रेम, माया अन् आठवणींचा हळवा प्रवास ‘आदि अनंत’मधून उलगडणार गोड नात्याचे भावविश्व

इमेज
काही नाती शब्दांपलीकडची असतात… ज्यात प्रेम असतं, काळजी असते आणि न बोलताही व्यक्त होणारा भावनिक आधार असतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि नव्या पिढीतील सदस्य यांच्यातील नातंही असंच खास असतं. अनुभवातून मिळणारे संस्कार, मायेने केलेले लाड आणि आयुष्यभर मनात जपून ठेवाव्यात अशा आठवणी या नात्याला अधिक समृद्ध करतात. याच भावविश्वाची हळवी अनुभूती देणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरमधून प्रेक्षकांना एका भावस्पर्शी कौटुंबिक गोष्टीची झलक अनुभवायला मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती अर्थात आजोबा म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा असतो. त्यांच्या सहवासातून मिळणारी शिकवण, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणारी माया आणि प्रत्येक प्रसंगी पाठीशी उभं राहाण्याची भावना नात्यांना वेगळीच उब देतात. ‘आदि अनंत’मधून अशाच जिव्हाळ्याच्या नात्याचं भावविश्व उलगडणार आहे. या चित्रपटातील कथा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी, बालपणीच्या आठवणींशी आणि आपुलकीच्या माणसांशी पुन्हा एकदा जोडणारी ठरणार आहे. दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा आणि न...

बालमनाच्या आनंदाचा उत्सव : ‘चिकीझिंग’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी व लक्षवेधी टिझर प्रदर्शित.

इमेज
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जपून ठेवलेल्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणारा नवा कोरा कौटुंबिक चित्रपट ‘चिकीझिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. स्वतःच्या शाळेपेक्षा बाहेरच जास्त रमणारा एक अवखळ, चुणचुणीत आणि स्वप्नाळू मुलगा म्हणजे ‘चिक्या’; आणि आणि त्याचे बालसुलभ भावविश्व व स्वप्नपूर्ती ची रंजक धडपड रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ‘चिकीझिंग’ची जगभरातील १६ प्रतिष्ठित अशा पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाली असून, आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी आणि मनाला भुरळ घालणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, नेटकरी सोशल मीडियावर भावुक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत या टिझरचे तोंडभरून कौतुक करत आहेत. दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत ‘चिकीझिंग’ या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप...

"कोलंबस" येतोय ११ डिसेंबरला.

इमेज
अलीकडे शिक्षण, नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. विशेषतः सरकारी नोकरीसाठी धडपडणारे हजारो तरूण आजुबाजूला दिसतात. अशाच हजारो तरुणांची एक प्रातिनिधीक गोष्ट "कोलंबस" या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत रंजक कथानक, दमदार कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट येत्या ११ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. एस एस आर फिल्म्स प्रस्तुत  सतीश नाईक, रोहित गुप्ता, सनोबर लाकडावाला यांनी "कोलंबस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवींद्र शिवाजी यांनी दिग्दर्शन, गौरव कुलकर्णी यांनी छायालेखन, रोहन पाटील, सुयश जाधव यांनी संकलन, वैभव शिरोळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चैतन्य पिसाळ यांनी लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत केलं आहे, तर आनंद शिंदे, कैलास वाघमारे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात अंकुर वाढवे, रोहित माने, सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण माने त्याचबरोबर सिमरन खेडकर, अश्विनी भांडे, प्रसाद माने, हेमंत शिंदे, चंद...

‘आठवणीतले नाना’ या कार्यक्रमाद्वारे स्व. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा.

इमेज
 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते स्व. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘आठवणीतले नाना’ या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्व. नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाचे स्मरण करून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाला अभिवादन करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या आदरांजली सभेनंतर दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत स्व. नाना पाटेकर अभिनीत चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा तपशील - कार्यक्रमाचे नाव : ‘आठवणीतले नाना’ - दिनांक : बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ - वेळ : सायंकाळी ५.३० वाजता - स्थळ : लघु नाट्यगृह, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई.

रहस्याच्या सावलीत उलगडणार ‘खग्रास’ची गोष्ट.

इमेज
गूढ वातावरण, आकाशात सूर्याला झाकोळणारा चंद्र आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता… ‘जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते’ या गूढ करणाऱ्या ओळींसह आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. नावापासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील एकापेक्षा एक उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रहस्य आणि उत्कंठेने भरलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच चित्रपटाची कथा काय असेल? या कथेत कोणते रहस्य दडले आहे, कोणत्या घटनांची उकल होणार आणि या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल, याची ही उत्सुकता आता वाढली आहे. सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर, राहुल पेठे, सायली पाठक, अनन्या जावळे, सुबोध भावे अशी दमदार कलाकारांची मांदियाळी ‘खग्रास’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी ओळख आणि अभिनयाची स्वतंत्र शैली यामुळे या चित्रपटातील व्यक्तिरेखा कशा असतील, त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल याची उत्सुकता वाढली आहे. आकाश पेंढारकर आणि पराग मेहता प्...

‘नखरेवाली’ चित्रपट एक हटके ‘वॉमँटिक कॉमेडी’,३०ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित.

इमेज
नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव यांचा ‘नखरेवाली’ हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी या चित्रपटाला एक नवा दृष्टिकोन देण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या हटके आणि रंजक विश्वाची झलक दाखवणाऱ्या पोस्टरवर “कभी कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पड़ता है” ही ओळ पाहायला मिळते. जी प्रेमाच्या नात्यातील पारंपरिक भूमिका उलटवणारी आणि स्त्री-पुरुषांच्या नात्यांकडे एका नव्या नजरेतून पाहण्याचा संकेत देते. राहुल शंकल्या यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. पारंपरिक रोमँटिक कॉमेडीपेक्षा वेगळा ‘वॉमँटिक कॉमेडी’ हा अनोखा अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विनोद, भावनिक नातेसंबंध आणि आजच्या काळातील विचार यांची सांगड घालत हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष समानतेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहतो. हलकीफुलकी आणि मनोरंजक मांडणी करत ‘नखरेवाली’ महिला सुरक्षा आणि समाजात खोलवर रुजलेल्या पारंपरिक विचारांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. मनोरंजनासोबतच , सामाजिक विषयांवर विचार करायला लावणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ...

‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित.

इमेज
ऑनलाइन प्रोफाइल, राईट स्वाइप, पहिली चॅट आणि मग लग्नाची बात! डिजिटल दुनियेत जोडीदार शोधताना जुळणारे सूर, वाढणाऱ्या अपेक्षा आणि प्रेमाच्या शोधात येणारे अनपेक्षित ट्विस्ट आजच्या जनरेशनच्या ऑनलाइन लव्हपासून लग्नापर्यंतचा हा भन्नाट प्रवास उलगडणार आहे ‘लग्न आणि बरंच काही’! वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित, नाद स्टुडिओस प्रस्तुत आणि अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित या धमाल सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. सोबतच चित्रपटातील दोन धमाल गाणी “मला लग्नाची झालिया घाई” आणि “साखरपुडा” सुद्धा रिलीज झाली आहेत.  लग्न म्हणजे प्रेमाचा हॅप्पी एंडिंग की एका नव्या पिक्चरची सुरुवात? या प्रश्नाचं मनोरंजक उत्तर या सिनेमातून मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये मनोरंजनाची धमाल, भावनिक क्षण आणि मनाचा ठाव घेणाऱ्या सुरेल गाण्यांची झलक पाहायला मिळत आहे.    ‘लग्न आणि बरंच काही’ हा केवळ लग्नाभोवती फिरणारा चित्रपट नसून, आजच्या पिढीचे विचार, नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वि...

श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार.

इमेज
कोकणभूमीत परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे. 'दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज' असं या चित्रपटाचं नाव असून, प्रेक्षकांना अध्यात्माचा परिपूर्ण अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. महाकाली प्रॉडक्शन, स्मिता क्रिएशन यांनी दाणोलीश्वर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत, स्मिता घाग चित्रपटाचे निर्माता, रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माता आहेत.  कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या "दाणोलीश्र्वर" या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे. विराज राजे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. प्राप्त:स्मरणीय सद्गुरु चिटणीस बाबा (डॉ. शशिकांत चिटणीस), प.पू.बाळूमामा दळवी (शिरसंगी) यांच्या आशीर्वादाने व दाणोली समाधी मंदिर ट्रस्ट विश्वस्त कार्यकारी मंडळ, बबी देवळे, श्रीमंत सरकार खेमराज शिवराम राजे सावंत भोसले, दाणोली बाजार तरुण मंडळ यांचे या चित्रपटासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे. समर्थ शंक...

'अ परफेक्ट मर्डर': इन्स्पेक्टर घारगे बनून सतीश राजवाडे पुन्हा एकदा सज्ज.

इमेज
 मराठी रंगभूमीवर आपल्या अफाट उत्कटतेने आणि खिळवून ठेवणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे थ्रिलर नाटक म्हणजेच अ परफेक्ट मर्डर’. सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित आणि नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, या नाटकात प्रेक्षकांचे लाडके अभिनेते सतीश राजवाडे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर घारगे यांच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सुमारे ३५० हून अधिक यशस्वी प्रयोग पूर्ण केले आणि त्यातले सतिश यांनी जवळपास १२० प्रयोगांमध्ये अभिनय केला. या भूमिकेत पुन्हा परतण्याबाबत सतीश राजवाडे सांगतात, "‘अ परफेक्ट मर्डर’ हे असंच एक नाटक आहे, ज्याच्या माध्यमातून मी तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा मराठी रंगभूमीवर परतलो होतो. या भूमिकेसाठी मला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे सर्व पुरस्कार मिळाले होते. हा असा एक पात्राचा प्रवास आहे, जो माझ्या मनाशी कायमचा जोडला गेला आहे. पुन्हा त्याच युनिटसोबत आणि त्याच भूमिकेत परतणं हा एक अद्भूत आणि भावनिक अनुभव आहे. या प्रवासात प्रिया आमची अत्यंत जवळची मै...

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर.

इमेज
काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या शक्तीचा आणि नवचैतन्याचा जागर केला जातो, त्याच मंगलपर्वात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या दोन मैत्रिणींच्या सर्जनशील सहप्रवासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. २५ वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून एकत्र काम केलेल्या या दोघी ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र येत आहेत. शुक्रवार २३ ऑक्टोबरला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.      अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव गाठीशी असलेल्या मीरा वेलणकर यांचं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिलंच पाऊल आहे. या नव्या सर्जनशील प्रवासातून ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विशेष म्हणजे मुक्ताला या नाटकाची संहिता बाहेर कुठे नव्हे, तर आपल्याच घरात, आपल्या भावाच्या लेखणीत सापडली! कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू बर्व...

‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरीचा रौद्र अवतार.

इमेज
रावणाचा अंत झाला, महिषासुराचा संहार झाला… पण आजच्या युगातील अन्याय आणि अधर्माचं काय? या विरोधात आज कोण उभं राहणार? कोण याचा सर्वनाश करणार? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर घेऊन ‘दशमी’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन  योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.   या चित्रपटातील ‘चंडिका हो’ या गाण्यातला अभिनेत्री गौरी इंगवलेचा ‘दुर्गा अवतार’ चर्चेचा विषय ठरत आहे. अंगावर लाल वस्त्र, कपाळी कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्याची माळ, तीक्ष्ण नजर आणि  हातात अधर्माविरुद्ध  लढण्यासाठी  निर्धाराने  प्रज्वलेली  ज्योत अशा प्रभावी रूपात गौरी दिसणार आहे. स्त्रीशक्ती, अन्यायाविरोधातील लढा आणि आदिशक्तीचा जागर यांचा थरारक मिलाफ या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. सुरेश पंडित यांनी  लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला जसराज जोशी यांचा स्वरसाज लाभला आहे.  गौरी इंगवलेच्या या रूपातून ‘दुर्गा म्हणजे केवळ पूजनीय शक्ती नाही, तर अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी ताकद आहे’, हा आशय अधोरेखित...

नात्यांचा "कापूसकोंडा" येतोय २३ ऑक्टोबरला.

इमेज
मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित मनोरंजक 'कापूसकोंडा' या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. सत्यघटनेवरून प्रेरित असलेली अत्यंत वेगळी गोष्ट, उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट  येत्या २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. नी "कापूसकोंडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.“कापूसकोंडा" चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांच आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांव...

आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित,

इमेज
स्वाभिमान, सत्य आणि न्यायाची लढाई ! कोर्टरूम ड्रामाचा अनोखा मेळ साधणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अभिषेक कंवर यांच्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमधून रहस्य, संघर्ष आणि न्यायाच्या लढाईची झलक पाहायला मिळते. काही सेकंदांच्या या मोशन पोस्टरमधूनच चित्रपटातील संघर्षाची तीव्रता आणि पुढे उलगडणाऱ्या रहस्याची उत्सुकता निर्माण होते. आयुष्य बदलणाऱ्या त्या एका घटनेनंतर सुरू झाली अशी लढाई जिथे पणाला लागला आहे एका माणसाचा स्वाभिमान आणि त्याच एका घटनेने उभा केला न्यायाचा प्रश्न ! आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामा मध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार सिनेमात दिसणार आहेत.     चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांचे आहे. त्रिलोक सिंग राजपूत असोसिएट प्रोड्युसर, सुजीत मुकाटे कार्यकार...