‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांची अनोखी गोष्ट.

काही जोड्या सहज जुळतात, तर काहींची गाठ पडण्यासाठी खास योग जुळून यावा लागतो. असाच एक अनोखा योग जुळून आला आहे ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने! मुक्ता बर्वे-प्रियदर्शन जाधव आणि आरती वडगबाळकर-अंशुमन विचारे या कलाकारांच्या जोड्या पहिल्यांदाच एकत्र आल्या असून, त्यांच्या व्यक्तिरेखांची  जुळून आलेली केमिस्ट्री २३  ऑक्टोबरला  भेटीला आलेल्या ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटाकाचे  खास  आकर्षण  ठरणार आहे.       ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांची निर्मिती असलेल्या ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाचं लेखन देबू बर्वे यांनी केलं असून, दिग्दर्शनाची धुरा मीरा वेलणकर यांनी सांभाळली आहे. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. गीत वैभव जोशी तर गीत संगीत श्रीनाथ म्हात्रे यांचे आहे. पार्श्वसंगीत संतोष जगदाळे यांनी दिलं आहे. वैशाली माडे आणि अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.
   काही नाती काळासोबत संपत नाहीत, तर आठवणींतून आणि पुन्हा भेटण्याच्या ओढीतून अधिक घट्ट होत जातात. ‘पुन्हा नक्की भेटू’ हे केवळ निरोपाचे शब्द नाहीत, तर नातं जपण्याचं, पुन्हा भेटण्याचं आणि मनातली जवळीक कायम ठेवण्याचं एक सुंदर आश्वासन आहे. याच भावनेला स्पर्श करत, नव्या जोड्यांची अनोखी केमिस्ट्री आणि नात्यांचे विविध रंग उलगडणारं हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंदासोबत भावनांच्या विश्वातही घेऊन जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...