पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी सिनेमाची सामाजिक ताकद: 'देऊळ बंद २' मधील बोगस बियाण्यांचा प्रश्न थेट विधानसभेत.

इमेज
बॉक्स ऑफिसवर यशाचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या 'देऊळ बंद २' या चित्रपटाने आता मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीचे रूप घेतले आहे. बळीराजाच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाची थेट महाराष्ट्र विधानसभेत चर्चा झाली असून, सिनेमात मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येला लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज दिला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' या चित्रपटात बोगस बियाणे आणि निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे शेतकऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीचे आणि मानसिक त्रासाचे वास्तव प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आले आहे. फसवणुकीच्या या दुष्टचक्रामुळे शेतकरी कसा कर्जबाजारी होतो, हा संवेदनशील मुद्दा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणला. याच सामाजिक मुद्द्याची गंभीर दखल घेत उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रवीण स्वामी यांनी सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित केला. विधानसभेत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:  कठोर कायदेशीर कारवाई बोगस बियाणे आणि निक...

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास 'दर्याभवानी' मोठ्या पडद्यावर.... १५ जानेवारीला २०२७ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

इमेज
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प 'दर्याभवानी' नव्या वर्षात १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या शुभमुहूर्त आणि भव्य पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी कलाकार तसेच दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांची विशेष उपस्थिती लाभली. आकर्षक पोस्टरने चित्रपटा विषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी विचारांना केंद्रस्थानी ठेवत, हिंदवी स्वराज्याच्या अभेद्य सागरी संरक्षणाची, आरमार उभारणीची, जलदुर्गांच्या रणनीतीची आणि समुद्रावरील मराठी सामर्थ्याची थरारक गाथा 'दर्याभवानी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी 'दर्याभवानी' चि...

आता 'बोल बोल राणी'चा थरार १७ जुलैला उलगडणार.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, आता रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले असून, या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. नव्या पोस्टरमध्ये सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे हे चारही कलाकार अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण मुद्रेत दिसत आहेत. हातात बंदुका, चेहऱ्यांवरील तीव्र भाव यामुळे चित्रपटातील रहस्य, संघर्ष आणि धोक्याची चाहूल या पोस्टरमधून स्पष्टपणे जाणवते. प्रत्येक पात्र काहीतरी लपवत असल्याचा भास निर्माण करणारे हे पोस्टर प्रेक्षकांना कथेबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास भाग पाडते. ‘बोल बोल राणी’ हा एक असा रहस्यप्रधान चित्रपट आहे, जो एका महिलेच्या आयुष्याभोवती विणलेल्या गुंतागुंतीच्या घटनांचा थरारक प्रवास उलगडणारा सिनेअनुभव आहे. नातेसंबंध, विश्वासघात, गूढ घटनांची साखळी आणि अनपेक्षित वळणांनी सजलेली कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार असल्याची चर्चा आहे....

उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’

इमेज
 शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या जीवनकौशल्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून दादर येथील छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE Affiliated)तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. २४ व २५ जून २०२६ रोजी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उन्हाळ्याच्या सुट्टीचा विधायक उपयोग व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजावी, तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शाळेने विद्यार्थ्यांना महिनाभर विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा सराव करण्यासाठी प्रेरित केले होते. त्यातूनच या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली.   स्पर्धेचे उद्घाटन दादरमधील प्रसिद्ध मामा काणे उपाहारगृहाचे मालक श्रीधर कमलाकर काणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘चैतन्य – अस्सल मालवणी भोजनगृह’च्या संचालिका सायली वाळक यांचीही...

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित...कीटकनाशक शेतीमागील लपलेलं सत्य उलगडणार...

इमेज
'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर होणारा गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दररोज लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या धोक्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. झी स्टुडिओज आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत 'द इंडिया स्टोरी'चे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.    चित्रपटाच्या उत्कंठावर्धक टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे न्यायासाठी लढताना तसेच कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव उघड करताना दिसतात. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. भावनिक आणि सामाजिक आशय असल...

दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक प्रदर्शित.....अभिनेत्री 'दीपाली सय्यद' मुख्य भूमिकेत...

इमेज
    प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल' या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. 'आता सगळं उघड होणार...!' असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आ...

गौतमी पाटीलचा 'लागला ठसका ४४०चा झटका...''लाईव्ह'मध्ये लावणीचा तडका असलेले, आधुनिक आयटम गीत...

इमेज
मराठी चित्रपटांमध्ये गीत-संगीताचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे सुरेल गीत-संगीताची किनार असलेले मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. 'लाईव्ह' या आगामी मराठी चित्रपटालाही श्रवणीय गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून मराठीतही आयटम साँगचा ट्रेंड रुजला असून, 'लाईव्ह'मध्ये एक वेगळ्या धाटणीचे आयटम साँग पाहायला मिळणार आहे. शीर्षकावरून या चित्रपटात काय पाहायला मिळेल याचा थांगपत्ता लागत नसल्याने 'लाईव्ह'बाबत कुतूहल वाढले आहे. अशातच या चित्रपटाला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या ठसकेबाज गाण्याचा तडका देण्यात आल्याने 'लाईव्ह'ची जोरदार चर्चा रंगणार आहे.  निर्माते सुमित पांडे रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली 'लाईव्ह' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, संजीव राय लेखक-दिग्दर्शक आहेत. काही दिवसांपूर्वीच 'लाईव्ह'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. नुकतेच 'लाईव्ह'मधील एका महत्त्वाच्या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. हे गाणे म्हणजे लावणीचा तडका असलेले नव्य...

भूषण प्रधान-सायली पाटील यांच,’स्वप्नसुंदरी' चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ गाणं प्रदर्शित

इमेज
प्रेमाच्या नाजूक भावना, मनात अलगद उमलणारी ओढ आणि एका नव्या नात्याची गोड सुरुवात यांचं सुंदर चित्रण करणाऱ्या ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची फ्रेश आणि आकर्षक जोडी पाहायला मिळत असून, त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीने गाण्याला रंगत आली आहे. मनाला भिडणाऱ्या दृश्यांसोबतच गाण्याचे सुरेल संगीत आणि भावस्पर्शी शब्द प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात. या चित्रपटातील गाण्यांची खासियत म्हणजे ही गाणी बुडापेस्ट येथे रेकॉर्ड करण्यात आली आहेत.  या गाण्याला इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत आणि मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर यांचा मधूर आवाज लाभला आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गाण्याला अंकुश बोराडकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्यातील प्रत्येक ओळ प्रेमातील कोमल भावना व्यक्त करते. तसेच अभिजीत आणि आर्या यांच्या आवाजातील भावनांनी त्याला आणखी उंची प्राप्त करून दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात, “‘जादू केलीस तू’ हे गाणं चित्रपटातील दोन व्यक्तींच्या नात्याच...

सोनी आणि रीलोइडने "द व्हर्टिकल सिनेमा मास्टरक्लास" आणि तीन ओरिजिनल सिरीजच्या लॉन्चसह शॉर्ट-फॉर्म कंटेंटमध्ये घडवून आणली क्रांती

इमेज
ज्या युगात सहा इंचांची मोबाईल स्क्रीन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे नवीन रणांगण बनली आहे, तिथे सोनी (Sony) आणि रीलोइड (Reeloid) यांनी एका ऐतिहासिक कार्यक्रमासाठी हातमिळवणी केली आहे: "द व्हर्टिकल सिनेमा मास्टरक्लास: स्टॉप स्क्रोलिंग, स्टार्ट स्टोरीटेलिंग" (The Vertical Cinema Masterclass: Stop Scrolling, Start Storytelling). ही भागीदारी मनोरंजन विश्वात एक मोठा बदल दर्शवते, जी पारंपारिक वाईडस्क्रीन फॉरमॅटच्या पलीकडे जाऊन मोबाईलवरील "उभ्या" (व्हर्टिकल) स्क्रीनच्या सिनेमाई कथांच्या युगाला कवेत घेत आहे. या मास्टरक्लासचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माते आणि उद्योजक रोहित गुप्ता यांनी केले, ज्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या सुरू असलेल्या "अटेंशन वॉर" (प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याची स्पर्धा) यावर सखोल चर्चा करण्यात आली. मोबाईल व्ह्यूइंगमधील (मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याच्या प्रमाणात) झालेली मोठी वाढ अधोरेखित करत, या कार्यक्रमात आजच्या पिढीसाठी (मायक्रो-जनेरेशन) खास तयार करण्यात आलेली एक नवीन स्टोरीटेलिंग फ्रेमवर्क सादर करण्यात आली. मास्टरक्लासची वैशिष्ट...

'लॉ ऑफ लव्ह' 24UA MOVIES या ओटीटी चॅनलवर प्रदर्शित.

इमेज
धडाकेबाज अॅक्शन आणि रोमान्सचा समावेश असलेला "प्रेमाचा कायदा" (लॉ ऑफ लव्ह) हा चित्रपट आता आपण 24UA MOVIES या ओटीटी चॅनलवर घरबसल्या पाहू शकतो. 24UA MOVIES या OTT चॅनलला आत्ताच प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि हा चित्रपट पहा. या चित्रपटाची कथा ८०-९०च्या दशकातील आहे. प्रेमाचा एक कायदा असतो हे तेव्हा दशकातील तरुणाईला माहित नव्हतं. प्रेमाचा एक कायदा असून, त्याचा तरुण पिढीवर कसा चांगला-वाईट परिणाम होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. निर्माता, दिग्दर्शक, कथा-पटकथा, प्रमुख अभिनेता अशा अनेक भूमिकेत उदयराज हे स्वतः असून मोहन जोशी, यतीन कार्येकर, शाल्वी शाह, प्राची पालवे, अनिल नगरकर यांनी 'लॉ ऑफ लव्ह'मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला संगीत पी शंकर व पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे लाभले आहे. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात प्रेमामधील वेडेपणा आणि प्रासंगिक विनोदांचा संगम अनुभवायला मिळेल. धडाकेबाज अॅक्शन आणि रोमान्सचा समावेश असलेला हा सिनेमा कुटुंबाबरोबर पाहण्याजोगा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, आशयघन कथानक, अर्थपूर्ण स...

MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’ प्रस्तुत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून, पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची झलक यातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. टेंबूरखेड या छोट्याशा गावातील काही तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणांना वाटत असते की, पुस्तकांमध्ये असलेली उत्तरेच आयुष्याचे सर्व प्रश्न सोडवतील. मात्र, नियती त्यांच्या समोर असा एक गंभीर विषय आणून उभा करते, ज्याकडे समाज आणि व्यवस्था दोघांनीही दुर्लक्ष केलेले असते. हा ‘आऊट ऑफ सिलॅबस’ विषय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो आणि तेथून सुरू होतो त्यांच्या संघर्षाचा खरा प्रवास. निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत हे तरुण जीवनाच्या खऱ्या परीक्षेत स्वतःला कसे सिद्ध करतात, याची थरारक आणि प्रेरणादायी मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे.डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स ...

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

इमेज
समर्थ रामदास स्वामींची शिकवण, मनोपासना, बलोपासना आणि नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अशा प्रेरणादायी वातावरणात आगामी ‘समर्थ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण पुण्यात पार पडले. पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा विशेष उत्साहात संपन्न झाला. समर्थ रामदासांनी दिलेल्या मनोपासना आणि बलोपासनेच्या शिकवणीचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या सूर्यनमस्कार घालत समर्थांच्या विचारांना मानवंदना दिली. तर मनाचे श्लोकमधील १३ श्लोकांचे एकसुरात पठण करत परिसर भक्तिमय आणि ऊर्जावान वातावरणाने भारून गेला होता.  या अनोख्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. आजच्या पिढीला समर्थ रामदास स्वामींच्या विचारांशी जोडण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख बाळासाहेब स्वामी यांची प्रमुख ...

'माहेरची साडी' ते 'देऊळ बंद २': दोन वेगवेगळ्या दशकांत अलका कुबल आणि स्नेहल तरडे यांनी जिंकली महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि काही व्यक्तिरेखा अशा असतात, ज्या केवळ पडद्यावर येत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनाचा कायमचा ठाव घेतात. असाच एक सुवर्ण इतिहास १९९१ मध्ये ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने रचला होता. आणि अगदी तसाच भावनिक प्रवास, तब्बल ३५ वर्षांनंतर, २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने पुन्हा एकदा पडद्यावर जिवंत केला आहे. वेगवेगळ्या पिढ्यांमधील दोन सशक्त अभिनेत्रींनी आपल्या अद्भूत अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.१९९१ चा सुवर्णकाळ: अलका कुबल आणि 'माहेरची साडी' चा चमत्कार १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या सशक्त आणि संवेदनशील अभिनयाने इतिहास घडवला. *स्त्री प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद:* महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, विशेषतः महिला प्रेक्षकांनी या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.  अलका कुबल यांनी साकारलेली सहनशील, त्यागी सुनेची...

‘घबाडकुंड' च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ५० कोटींची भव्य गुंतवणूक.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत ‘द फर्स्ट मराठी युनिव्हर्स’ची संकल्पना 'घबाडकुंड' चित्रपटाद्वारे  यशस्वीपणे साकारत नवा इतिहास रचणाऱ्या आयकॉन डी स्टाईल एंटरटेन्मेंट अँड लाइफस्टाईल प्रा. लि.ने आता मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायाची अधिकृत तयारी सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनी तब्बल ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली. मराठी सिनेमात एक वेगळे आणि व्यापक सिनेमॅटिक विश्व निर्माण करणाऱ्या 'घबाडकुंड' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत फ्रँचायझी-आधारित कथानकांना नवे दालन खुले झाले आहे. याच यशाच्या बळावर आता मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय अधिक भव्य, तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचा सिने-अनुभव घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी बोलताना डॉ. रसिक कदम म्हणाले, "मराठी चित्रपटसृष्टीला केवळ स्वतंत्र यशस्वी चित्रपटांची नव्हे, तर दीर्घकालीन सिनेमॅटिक फ्रँचायझीची आवश्यकता आहे. 'घबाडकुंड' हा त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे टाकलेला पहि...

बाप- लेकीच्या नात्याची ‘द्विधा’.

इमेज
बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं.     ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.     नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण...

दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ उत्साहात संपन्न.

इमेज
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आयोजित करण्यात आलेला ‘सेलिब्रिटी योगा’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत निरोगी व संतुलित जीवनशैलीसाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले. यावेळी आयोजित योग प्रात्यक्षिक सत्रामध्ये प्रशिक्षित योगतज्ज्ञ अमी कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे सादरीकरण करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रातील अरुण कदम, अमृता राव, मिलिंद गवळी, रोहिणी निनावे, मंगेश बोरगावकर, प्राची कुलकर्णी, धनश्री दामले, प्राजक्ता दातार, ऋतुराज शिंदे, राधिका हर्षे, मृणमयी भजक, निलिमा कुलकर्णी, निनाद पाटील, मानसी इंगळे  या कलाकारांनी या उपक्रमात सहभागी होत योगाबाबत जनजागृतीचा संदेश दिला.    कार्यक्रमादरम्यान योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानस...

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेचा,२० जून पासून ‘मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित.

इमेज
अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे.  ‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती   देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.    याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमा...

ब्लॉकबस्टर 'तुंबाडची मंजुळा'दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार.

इमेज
ती आली , तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. झी स्टुडिओजची निर्मिती, विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचे दर्शन,  आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा १५ कोटींचा टप्पा पार केला आहे.  मुंबई पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रभर झळकणारे हाऊसफुलचे बोर्ड, समीक्षकांकडून मिळालेली पसंतीची पावती, प्रेक्षकांकडून येणाऱ्या कौतुकाच्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकापासून ते इन्फ्लुएन्सर्समध्ये निर्माण झालेली क्रेझ यातूनच चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाची प्रचिती येत आहे.    चित्रपटाला सर्वत्र मिळणारा तुफान प्रतिसाद बघता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम सध्या विविध शहरांत चित्रपटगृहांना भेटी देत आहेत. यावेळी "हा चित्रपट आम्हाला खूप भावलाय", "आम्ही खूप दिवसांनी खळखळून हसलो", "संपूर्ण कुटुंबासह आनंद ...

तिघी' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन.

इमेज
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने बहुचर्चित ‘तिघी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि.२० जून २०२६ रोजी, दुपारी १.०० वाजता , पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात आयोजित करण्यात आले असून, चित्रपटप्रेमींना या चित्रपटाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.  या विशेष प्रदर्शनाला प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे , दिग्दर्शक जिजीविषा काळे उपस्थित राहणार आहेत. चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या आशय, निर्मिती प्रक्रिया आणि सामाजिक संदर्भांवर उपस्थितांशी संवाद साधला जाणार आहे. ‘तिघी’ हा चित्रपट स्त्रीजीवनातील विविध पैलूंवर भाष्य करणारा असून, त्याच्या प्रभावी कथानक, संवेदनशील मांडणी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षक व समीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना दर्जेदार सिनेमाचा अनुभव घेण्याबरोबरच कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट रसास्वाद मंडळाने सर्व चित्रपटप्रेमींना या वि...

लघुपट आणि माहितीपटांच्या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दर्जेदार कलाकृतींना रसिकांची पसंती.

इमेज
 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  गुरुवारी दाखवण्यातआलेल्या ब्रह्मकमळ- लघुपट, गढूळ- लघुपट, डीयर 202- लघुपट, 17 वे वर्ष- लघुपट, फड- माहितीपट पाहण्यासाठी रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. याप्रसंगी माहितीपट आणि लघुपटातील उपस्थित लेखक-दिग्दर्शकांना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.     महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’, ‘नेहमीच’ हे लघुपट तसेच ‘फड’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतरच्या प्रदर्शनांनाही चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील मान्यवराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध विषयांवरील संवेदनशील मांडणी, आशयघन कथा आणि उत्कृष्ट चित्रभाषेमुळे प्रेक्षकांकडून या ...

"तुला पाहता" चित्रपटात अभिनेता आणि पार्श्वगायक म्हणून झळकणार.

इमेज
आजवर अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहचलेला नचिकेत लेले आता आपली एक वेगळी इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे.  ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयूरा प्रधान यांची निर्मीती असलेल्या, आगामी 'तुला पाहता' या चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत हा अभिनेता आणि चित्रपटाचा पार्श्वगायक म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १० जुलैला "तुला पाहता" हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.   "तुला पाहता" चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मयूरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे. मनाला भुरळ घालणाऱ्या या चित्रपटातील "दूर दूर" हे ग...

‘द केरला स्टोरी’ स्टार अदा शर्माची मराठी चित्रपटात दमदार एंट्री.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि नवनवीन प्रयोगांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी 'झिगझॅग प्रॉडक्शन' आणि 'गणराज स्टुडिओज' यांनी आपल्या आगामी भव्य मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'गजरा' असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच या चित्रपटाचे अत्यंत उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणारी केरला स्टोरी सिनेमा ची स्टार आणि आघाडीची अभिनेत्री अदा शर्मा  या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत आपले पदार्पण करत आहे. ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अदा शर्माचा अत्यंत रौद्र, भीतीदायक आणि रक्ताने माखलेला चेहरा पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांमधील तीव्र भाव, कपाळावर लावलेले कुंकू आणि नाकातील पारंपरिक नथ हा लूक लक्षवेधी ठरत आहे. पोस्टरवरील तिची ही झलक पाहाता, हा चित्रपट एक अत्यंत प्रभावी चित्रपट असेल असे नक्कीच म्हणता येईल.'गजर...

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव,व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन संपन्न.

इमेज
 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, 16 जून 2026 रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.  दि.16 ते 20 जून 2026 या कालावधीत हा महोत्सव रंगणार असून दररोज सायंकाळी 6.30 वाजता चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.   या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झालेल्या तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर भाष्य करणाऱ्या दर्जेदार मराठी लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन होणार आहे. चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील व्यावसायिकांना उत्कृष्ट कलाकृती अनुभवण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मायबाचे आशिर...

‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव.

इमेज
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि अनेक ठिकाणी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाभोवती आता नव्या वादाचे वलय निर्माण झाले आहे. चित्रपटामध्ये मराठा समाजाचा उल्लेख कथितपणे ‘छोटा मराठा’ असा करण्यात आल्याचा आरोप करत ‘मराठा क्रांती मोर्चा’ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सेन्सॉर बोर्ड तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून चित्रपटावरील आक्षेपार्ह भाग हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अशा समाजाचा उल्लेख कोणत्याही चित्रपटात कमीपणा दर्शविणाऱ्या शब्दांत होणे समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘छोटा मराठा’ हा शब्दप्रयोग समाजात मोठा-छोटा असा भेद निर्माण करणारा असून तो समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा असल्याचे मोर्चाचे म्हणणे आहे.   निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांच्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाची...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “NAFA 2026” फिल्म फेस्टिव्हलला उपस्थितीची ग्वाही.

इमेज
नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन (NAFA)चे संस्थापक अध्यक्ष, प्रख्यात उद्योगपती, राष्ट्रीय सुवर्ण कमळ पुरस्कार विजेते तसेच ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या लोकप्रिय मराठी चित्रपटांचे नामवंत निर्माते अभिजीत घोलप यांनी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांना कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल (NAFA Film Festival 2026) चे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NAFAच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच "NAFA Film Festival 2026" मध्ये उपस्थित राहण्याचे आश्वासन देत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, अभिजीत घोलप तसेच डॉ. गौरी घोलप उपस्थित होत्या.     उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी NAFA फिल्म फेस्टिव्हल हा प्रतिष्ठेचा सांस्कृतिक चित्रपट महोत्सव बनला असून दरवर्षी भारतातील अनेक मान्यवर कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे या महोत्सवा...

पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न.

इमेज
 श्री विठ्ठल बिरदेव फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि अध्यात्म, संस्कृती तसेच युवा पिढीच्या विचारविश्वाला स्पर्श करणारा बहुचर्चित मराठी चित्रपट "भंडारा" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान, पट्टणकडोली (जि. कोल्हापूर) येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समस्त धनगर समाज, पुजारी समाज आणि भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला. श्री विठ्ठल बिरदेवांच्या पावन सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे दर्शन घडवले.यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश ननावरे, छायाचित्रकार अशोक महाजन, कार्यकारी निर्माता विनायक ढेरंगे, निर्मिती व्यवस्थापक नवीन भालेराव तसेच चित्रपटाचे मार्गदर्शक निलेश बाळू कोळेकर महाराज (निळोबा पुजारी, माणदेश) यांच्यासह देवस्थानाशी संबंधित मान्यवर आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.    चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक रमेश ननावरे यांनी सांगितले की, "भंडारा" हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नसून युवा पिढीला आपल...

अपहरण, रहस्यचा खेळ 'बोल बोल राणी' चित्रपटाची झलक प्रेक्षकांना खिळवणारी.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड' निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बोल बोल राणी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली थरारक झलक समोर आली असून, यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. टीझरमध्ये अनुभवता येणारे चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत यामुळे रहस्याचे वातावरण अधिक गडद होत असल्याचे जाणवते, तर पडद्यावरील ॲक्शन सिक्वेन्स पाहाता हा चित्रपट रहस्य, थ्रिलने पुरेपुर भरलेला आहे. या चित्रपटातील संवाद हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून त्यामुळे रहस्याची खोली अधिकच वाढते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला ...

लालबागच्या राजाच्या पावन भूमीचे दर्शन घेऊन ‘भूतम भयम्’च्या प्रमोशनचा आरंभ.

इमेज
लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला असून, या शुभप्रसंगी बाप्पाच्या चरणांचे पूजन करून प्रत्यक्ष मूर्ती घडविण्याच्या पवित्र कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. याच मंगल प्रसंगाचे औचित्य साधत, येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या यशासाठी कलाकार आणि टीमने लालबागच्या राजाच्या पावन स्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी चित्रपटातील सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या प्रसंगी लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करत संपूर्ण टीमला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रद्धा, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या भेटीमुळे ‘भूतम भयम्’च्या यशस्वी प्रवासाची मंगल सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, ‘माझं बालपण लालबाग परिसरातच गेलं. लालबागच्या राजाबद्दलची श्रद्धा आण...

शेतकऱ्यांच्या अश्रूंनी हादरला महाराष्ट्र; ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटातून वास्तवाचे दर्शन.

इमेज
 गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या जीवनकथेवर आधारित हा चित्रपट शेतकऱ्यांच्या वास्तववादी संघर्षाचे चित्रण करतो. सत्ताधारी व्यवस्था शेतकरी आणि शेतीकडे कोणत्या दृष्टीने पाहते, तसेच राजकारणात शेतकऱ्यांचा कसा वापर केला जातो, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. सामाजिक विकासासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची गरज अधोरेखित करताना बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृतीचाही विशेष उल्लेख चित्रपटात करण्यात आला आहे.   चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांनी या विषयाचे प्रभावी सादरीकरण करण्यात यश मिळवले आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. मोठी स्टारकास्ट आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला अधिक उंची मिळाली आहे. ‘सरकार’ आणि ‘विकास’ या संकल्पनांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी किती मर्यादित संबंध असतो, हे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. शेती आणि शे...

नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा उत्साहात संपन्न.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर तसेच अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे  सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना  सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिष शेलार म्हणाले, “नाट्य परिषदेचे काम कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देणे यासाठी मराठी नाट्य परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रम 'नाट्यकला अकादमी' स सांस्कृतिक विभाग तन, मन आणि धनाने ठामपणे पाठिंबा देईल व सोबत काम करेल. बेस्टच्या काही आगारांमध्ये नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उभारण्याचा आमचा मानस आहे”. तसेच महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.    अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी पुरस्...

थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार 'एक होतं माळीण', २४ जुलैपासून महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

इमेज
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै २०१४ रोजी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५० पेक्षा अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता तर शेकडोजण जखमी झाले होते. याच ​दुर्घटनेवर आधारित काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता "एक होतं माळीण" या चित्रपटातून येत्या २४ जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा भव्य सेट आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.  ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण  कोंजे, दत्ता गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शन चे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे व राजु राणे  यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्...

धुळ्याच्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या बलिदानाने हादरला होता महाराष्ट्र; त्याच संघर्षाची कहाणी मांडणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा भव्य प्रीमियर संपन्न.

इमेज
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीच्या लढ्याबाबत व्यापक चर्चा घडवून आणली होती. याच सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारा आणि व्यवस्थेविरोधातील सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ याचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला. बंजारा समाजातील मान्यवर कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी तसेच चित्रपटाची संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीत हा प्रीमियर सोहळा संपन्न झाला. प्रीमियरनंतर चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली असून सामाजिक आशय, वास्तववादी कथानक आणि प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.    समाजातील वंचित, दुर्बल आणि न्यायासाठी संघर्ष ...

मराठी चित्रपटसृष्टीचा आश्वासक नायक 'ऋषी मनोहर'. ,

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर, रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटक  आणि 'पेट पुराण' सारख्या वेबसिरीज  मधून त्याच्या सहज अभिनयाची, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सची आणि पात्रांमध्ये समरस होण्याच्या क्षमतेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात अभिनयाची खोली आणि नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. ऋषी मनोहरमध्ये ही दोन्ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याकडे एका आश्वासक अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे. दरम्यान, येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणारा 'कप बशी' हा चित्रपट ऋषीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरण...