लघुपट आणि माहितीपटांच्या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दर्जेदार कलाकृतींना रसिकांची पसंती.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी दाखवण्यातआलेल्या ब्रह्मकमळ- लघुपट, गढूळ- लघुपट, डीयर 202- लघुपट, 17 वे वर्ष- लघुपट, फड- माहितीपट पाहण्यासाठी रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. याप्रसंगी माहितीपट आणि लघुपटातील उपस्थित लेखक-दिग्दर्शकांना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’, ‘नेहमीच’ हे लघुपट तसेच ‘फड’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतरच्या प्रदर्शनांनाही चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील मान्यवराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध विषयांवरील संवेदनशील मांडणी, आशयघन कथा आणि उत्कृष्ट चित्रभाषेमुळे प्रेक्षकांकडून या चित्रपटांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
माहितीपट व लघुपट प्रदर्शनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
शुक्रवार, दि. १९ जून २०२६ | सायं. ४.०० ते ६.००
पाणखोल – लघुपट
अर्जुन – लघुपट
डोंगर पाणी – लघुपट
दारवठा – लघुपट
शनिवार, दि. २० जून २०२६ | सायं.४ वाजता
वाघ – लघुपट
सापशिडी – लघुपट
मुक्ता – लघुपट
दारवठा – लघुपट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा