पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिनेता रजत बेदींची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री.

इमेज
मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेले अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी हे आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, देवदास’, ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी सिनेमाला समृद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर नरेंद्...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"

इमेज
 रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी देखील 'नाट्य परिषद करंडक' रूपात आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. मागील वर्षी हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. मागील वर्षी २५८ एकांकिका या महोत्सवात सादर झाल्या, अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांनी गावोगावी जाऊन हे शिबिर घेतले. यामुळे अंतिम फेरीतील एकांकिका दर्जेदार झाल्या आणि यातून मागील वर्षी नाट्य परिषद करंडक स्पर्...

येत्या २५ सप्टेंबरला ‘सायको रंगा’प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित झाला असून पहिल्या टीझरनंतर आता चित्रपटाच्या कथानकातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना होत आहे. या टीझरमध्ये रंगाच्या आयुष्यातील संघर्ष व त्याच्यासोबत असलेल्या आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे कथेला नेमकं कोणतं वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या टीझरमधून रंगाच्या आयुष्याची आणि त्याच्याभोवतीच्या व्यक्तिरेखांची ओळख होते. सुबोध भावे, देवेंद्र चौगुले, मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते (दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे या कलाकारांच्या व्यक्तिरेखाही टीझरमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक पात्राची कथेत असलेली भूमिका आणि रंगासोबत त्यांचं नातं नेमकं काय आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कलाकारांची मोठी फळी ही ‘सायको रंगा’च्या कथानकातील महत्त्वाची बाजू ठरणार आहे. दिग्दर्शक, लेखक व निर्माते देवेंद्र चौगुले म्हणतात, “‘सायको रंगा’मधून प्रेक्षका...