पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबईचा चौथा दीक्षांत समारंभ आज दिमाखात पार पडला.

इमेज
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या (MNLU Mumbai) शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज नोंदवला गेला. प्रभादेवी, मुंबई येथील ऐतिहासिक रवींद्र नाट्यमंदिरात विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या समारंभाला मान्यवर, पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी शिक्षणातील आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.    कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गानाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात औपचारिकता, गांभीर्य, राष्ट्रभावना आणि प्रादेशिक अभिमान यांचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर MNLU मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी स्वागतपर भाषणासह विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. आपल्या भाषणात त्यांनी मागील वर्षभरातील विद्यापीठाची शैक्षणिक प्रगती, संशोधन क्षेत्रातील योगदान आणि संस्थात्मक वाढ यांचा सव...

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा,२ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा .

इमेज
मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल घडताना दिसतोय. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इंडी कलाकारांची एक नवी लाट तयार झाली आहे. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या गुंतवणुकीतून आणि कोणत्याही मोठ्या बॅनरशिवाय दर्जेदार संगीत तयार करणाऱ्या या कलाकारांनी मराठी संगीताला एक नवा आयाम दिला आहे. या नव्या प्रवाहाला योग्य व्यासपीठ, ओळख आणि सन्मान मिळावा, या हेतूने 'मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा)' ही संकल्पना आकाराला आली आहे.    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मराठी इंडी म्युझिकच्या या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती लाभणार असून, संगीत,सृजनशीलता आणि नव्या उर्जेचा संगम असलेला 'मिमा २०२६' हा सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ऑडिटोरियम येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. मराठी इंडी संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर, कलाकार आणि रसिक यांची उपस्थिती यावेळी पाह...

रितेश विलासराव देशमुख यांच्या दिग्दर्शनाने आणि अभिनयाने साकारलेला ‘राजा शिवाजी’,फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर प्रदर्शित.

इमेज
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होतो आहे, भारताच्या सर्वश्रेष्ठ महान अश्या राजाची भव्य झलक अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.   ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.    या च...

निर्मित सावंत यांनी 'सुपर डुपर'साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.    या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर बाईची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्येच त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. घर सांभाळणारी, परिस्थितीशी झुंज देणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी उभी राहाणारी स्त्री. विशेष म्हणजे, या भूमिकेला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी निर्मिती सावंत यांनी खास मेहनत घेतली आहे.ग्रामीण भाषेचा नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक खास शैली निर्माण करणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट पाठवून त्यांच्याकडून भाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि लहेजा समजून घेतला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला खरेपणाची जोड मिळाली. याबद्दल निर्मिती सावंत म्हणतात, 'ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की, मी ए...

‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग.....अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती.

इमेज
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.     या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.      राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  ...

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ चित्रपटातील ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याची खास चर्चा रंगतेय, ती लहान गायक अंशुमन कैलास मोरे याच्या आवाजामुळे. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये अंशुमनने आपल्या सुरांनी अशी छाप सोडली की, त्याचं नाव थेट रसिकांच्या ओठांवर आलं आहे.     जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या विखरण गावातील अंशुमन हा अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेला मुलगा. सरस्वती माध्यमिक विद्यालयात आठवीत  शिकणाऱ्या अंशुमनचे आई-वडील शेतीकाम करून घर चालवतात. घरची परिस्थिती बिकट असली तरी त्याच्या गाण्याची ओढ कधीच कमी झाली नाही. दोन लहान भावांसोबत वाढताना त्याने आपल्या कलेला सातत्याने घडवलं. त्याचा हा संगीताचा प्रवास आधीपासूनच सुरु होता. अंशुमनने 'चार वरिस ना प्यार', 'साजन तू बालम तू', ' सांग ना राणी', 'कोना भरोसे सोडी गई' अशी  अहिराणी भाषेत सुमारे ४० ते ५० गाणी गायली आहेत.  त्याचं 'राजा मना तू राजा रे' हे गाणं विशेष गाजलं.     'कुकडू कू' हे गाणं अंशुमनसाठी टर्निंग पॉइंट ...

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा.

इमेज
  हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध परंपरा, मंदिरसंस्कृती, तसेच अतिथी देवो भव या तत्त्वावर आधारित आदरातिथ्यामुळे जगभरातील पर्यटक आणि व्यावसायिक येथे आकर्षित होतात.    अशा या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फुकेतमध्ये पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकार झाला आहे.    दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या SQCC Properties LLC (Dubai, UAE) आणि Phuket9 Real Estate Development (T...

'गल्ली नं. १३' या मराठी चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित.

इमेज
     मराठी चित्रपटसृष्टीतील काही सिनेमे सुरुवातीपासूनच उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. मराठी सिनेसृष्टीची हिच परंपरा जपत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गल्ली नं. १३' हे या चित्रपटाचे शीर्षकच कुतूहल जागविणारे आहे. 'गल्ली नं. १३'चे पहिले वहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, समाधान बोडके पाटील, युवराज आप्पा कोठुळे, नवनाथ नाना कोठुळे, दिलीप चव्हाण, शिवाजी कसबे, भैरू पाटील मुळाने, निर्माते रामनाथ बोडके, निर्मात्या राजश्री बडगुजर, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित, लेखक डॉ. एस. डी. पाटील, संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.     आरबी सिनेमॅटिक्सने पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहाय्याने 'गल्ली नं. १३'ची प्रस्तुती केली आहे. निर्माते रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर या चित्रपटाचे निर्माते आहेत. निर्माते राम बोडके हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून आरबी सिनेमॅटिक्स अंतर्गत ही त्यांची पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटाच्या ...

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित "कप बशी" ५ जून २०२६ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.

इमेज
    सासूृृ-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता "कप-बशी" या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.     सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात अभिनेत्री  निर्मिती सावंत, पूजा सावंत अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे यात शंका नाही.गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना  चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगी...

सोनालीचा दिलखेचक अंदाज....‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’....

इमेज
आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे  संगीत असलेलं,  हे गाणं आनंदी जोशी हिने गायलं आहे.     ‘सालबर्डी’ या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून आजवर गुल्हर, बाबो, पाणीपुरी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर रहस्यमय थरारपट रसिकांसाठी आणला आहे.     ‘मंजुळा’ या नव्या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणते, ‘हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न ...

"ऑल दि बेस्ट" नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग.

इमेज
    ३१ डिसेंबर १९९३ रोजी देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला. आज तेहत्तीस वर्षानंतरही २०२६ साली सुद्धा नाटकाचे प्रयोग देवेंद्र पेम यांच्या अनामय प्रॉडक्शन्स या संस्थेतर्फे अविरत सुरू आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या नाटकाच्या पहिल्या टीमने रसिक प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. भरत, अंकुश, संजय हे तिघेही गुणी कलाकार सुपरस्टार झाले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, दिपा परब ही दुसरी टीम होती तेही सुपरस्टार झाले. त्यानंतर नाटकाच्या जवळपास २५ टीम्स झाल्या. ५००० प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.     तीच जादू नाटकाची नवीन टीम निखिल चव्हाण जुई बेंडखळे मयुरेश पेम आणि मनमित पेम करत आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ च्या या नवीन टीमवर सुद्धा रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम करत आहेत. म्हणुनच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे जोरदार हाउसफुल्ल प्रयोग सुरू असून लंडन दुबई येथे सुद्धा ...

मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी'.

इमेज
अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. 'सवाईगंधर्व' निर्मित 'कॅरी ऑन स्पायगिरी' हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    आतापर्यंत भरत दाभोळकर यांनी पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलके-फुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिन्दी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक  विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हे नाटक अजरामर केले होते. आता हेच नाटक मराठीत आणण्याचे धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे. आता 'मराठमोळं' कुटुंब पाकिस्तानात मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आल...

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला.....‘सुपर डुपर’चं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'कुकडू कू' असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त ऊर्जा, मजा आणि गोंधळाचा तडका घेऊन आलं आहे.     समीर आशा पाटील यांचे बोल लाभलेले, अभिनय जगताप यांच्या जोशपूर्ण संगीताने सजलेलं हे गाणं अंशुमन मोरे आणि  लहान मुलांच्या आवाजात साकारलं असून ऐकतानाच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडतं. पारंपरिक आणि आधुनिक कुटुंब यांच्यातील मजेशीर संघर्ष आणि जुगलबंदी या गाण्यातून रंगतदार पद्धतीने उलगडते. गाण्यातील सिच्युएशन, रंगतदार मांडणी आणि भन्नाट कोरिओग्राफी यामुळे 'कुकडू कू'  हे गाणं ऐकण्याबरोरच पाहाण्यासाठीही एक व्हिज्युअल ट्रीट ठरतं आहे.      चित्रपटाच्या कथानकातील ‘गोंधळ’ हा महत्त्वाचा भाग या गाण्यातून प्रभावीपणे समोर येतो. दोन भिन्न विचारसरणीच्या कुटुंबांची टक्कर, त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे गाणं अधिकच एंटरटेनिंग बनलं आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या परफॉर्मन्समधून गाण्याला...

‘सखे गं साजणी’ ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
   मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, मित्रांसोबतच्या प्रवासावर केंद्रित असलेला हा मराठीतील एक वेगळा आणि ताजातवाना चित्रपट ठरत आहे.    चित्रपटाच्या ट्रेलरमधून तीन मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांची आणि भावनिक क्षणांची सुंदर झलक पाहायला मिळते. मजा, साहस आणि भावना यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.   याआधी चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून, त्यापैकी ‘सखे गं साजणी’ शीर्षक गीताने मिलियनमध्ये प्रेक्षकसंख्या गाठत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. हे गाणे अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. गीतकार लखन चौधरी यांच्या शब्दांनी या गाण्याला भावनिक आणि उत्साही रंग दिला आहे.तसेच, ‘डीजे चा बास’ हे आणखी एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांनी गायले असून, त्याचे संगीतही विजय भाटे यांनी दिले आहे. या गाण्याचे...

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ – विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत.

इमेज
‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.   संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील विविध घटनांचा आढावा घेत, या कलाकृतीतून त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान उलगडला जातो.   नाटक पाहताना कधी पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर कधी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. त्याचबरोबर आजच्या महाराष्ट्राची आणि विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची वास्तव स्थितीही या नाटकातून अधोरेखित केली जाते.    गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर प्रश...

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर.

इमेज
चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा, या दिवशी या नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात होते. या पवित्र उत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, अभिनेता सुशांत शेलार आणि पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या विद्यमाने लोअर परेल येथे  १९ मार्चपासून  ते २७ मार्च  या कालावधीत  ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.       माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलारमामा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मा.श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य), मा.श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य), श्रीमती. सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.निलम गो-हे (उपसभापती- वि...

हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 'झिम्मा ३' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर.

इमेज
महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला 'आपलीच गोष्ट' वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय!  मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या 'झिम्मा' आणि 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड, सोशल मीडियावर चर्चा आणि बुकमायशोवर ट्रेंडिंग या सगळ्यामुळे 'झिम्मा' हा फक्त चित्रपतटापुरता मर्यादित न राहाता एक अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव बनला. आणि आता… त्या अनुभवाचा तिसरा भाग अधिकृतपणे समोर आला आहे! दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा ३'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२७ मध्ये 'झिम्मा ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या जल्लोषमय सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता पोस्टरमुळ...

फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके.

इमेज
मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.    मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देणारी ठरते. अभिनेता देवदत्त नागे यांच्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचच्या शानदार सोहळ्यात देवदत्त नागे यांनी हा खुलासा केला.चित्रीकरणादरम्यान सहकलाकारांसोबत घडलेल्या विविध आठवणींना उजाळा देताना त्यांनी सेटवरील धमाल, मस्ती आणि गमती-जमतींचा उल्लेख केला. पहाटे दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतरचा फक्कड गुळाचा चहा आणि चमचमीत मॅगी या सगळ्या खास क्षणांची रंगतदार कहाणी सांगताना देवदत्तने कुशलला ‘माझा फिटनेस आयडॉल’ हा किताब देत त्याची फिरकी घेतली...

'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न.

इमेज
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.   कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत...

१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी यांची एकमताने निवड.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळ सभेत नियोजित *१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच १०० व्या नाट्यमहोत्सवाची सांगता शुक्रवार दिनांक २४ एप्रिल ते रविवार २६ एप्रिल दरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे.

केदार शिंदे - सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.   सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले असून छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अ...

विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.    ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा तरुणाईच्या जवळचा विषय घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते. फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.चित्रपटाची नेमकी कथा आणि कलाकारांची फळी अद्याप गुप्त ठेवण्यात आली असली तरी, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हे शीर्षकच प्रेक्षकांना आपल्या मित्रांच्या ग्रुपची आठवण करून देणारं आहे.    दिग्दर्शक विजू माने सांगतात, “‘स्ट्रगलर साला’ला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे. त्या सीरिजमधील मैत्री...

विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती 'बेवारस'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला 'बेवारस' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.    हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित "बेवारस" या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. हरिणी प्रॉडक्शन्सच्या रिया कुमार, नितीन विचारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे . चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांचं आहे.तर पटकथा, संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा आणि महेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.डोळे भरून आलेल्या विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याच...

'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता...........

इमेज
   झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यातील डोळे नेमके कुणाचे आहेत? हे कलाकार कोण आहेत? या काळया पोपटाचे रहस्य काय ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. सोबतीला "गावात सारी चर्चा रे गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत " अशा गाण्याच्या ओळी ऐकायला येत आहेत. यामुळे या गावाबद्दलची यातील कलाकाराबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.   या आगळ्यावेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर  म्हणतात की," तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकां...

सात इन्फल्यूएन्सर्स पहिल्यांदाच झळकणार रंगभूमीवर.

इमेज
   मराठी रंगभूमीवर सध्या खूप नवीन नवीन प्रयोग सुरु आहे. त्यातच एका नवीन प्रयोगाची भर त्यात पडणार आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी इन्फल्यूएन्सर गँग आता रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ह्या गँगच्या "बनवा बनवी" या नवीन नाटकाचा मुहूर्त पार पडला.   "लागली पैज" नंतर प्रभात थिएटर्सची दुसरी निर्मिती असलेल्या या व्यावसायिक नाटकाचे नाव "बनवा बनवी" असून नाटकाच्या नावाला देखील एक कल्ट व्हॅल्यू आहे. श्रीमती ज्योती प्रमोद कठापूरकर आणि श्री.निखिल एकनाथ करंडे हे  ह्या नाटकाचे निर्माते आहेत तर सौं. प्रियंका ​हेमंत जोगी या नाटकाच्या सह निर्मात्या असून हर्षद प्रमोद कठापूरकर हे या नाटकाचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.    "बनवा बनवी" नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर खांडेकर यांचे असून शंतनू रांगणेकर, ऋषभ मोरे, सुमित चव्हाण, ओंकार कदम, सोनाली गुरव,सिद्धी पोतदार आणि सुधाकर सोनावणे ही सात जणांची  गँग या नाटकात धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे. नाटकाचे नेपथ्य डॉ. सुमित पाटील करणार असून, चारूलता देशपांडे नाटकाच्या वेशभूषेच...

गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’.

इमेज
    गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची  भक्ती, त्याची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे.  ‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ । अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे । या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतेच हे गीत प्रकाशित झाले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे.  हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेण...

थिएटरमध्ये गाजणार ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर; ‘धुरंधर द रिव्हेंज’ सोबत खास सादरीकरण.

इमेज
 जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज' या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलि...

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून यात एकमेकांवर कुरघोडी करणारे एकाहून एक मातब्बर कलाकार बघून हा चित्रपट पैसा वसूल करणारा ठरेल  अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.     नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे  कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे ए...

'द ट्रॅप'मध्ये हार्दिक जोशी कोणतं गुढ..... रहस्य उलगडणार.....

इमेज
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिकच्या बहुप्रतिक्षित 'द ट्रॅप' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्यमय कथानक असलेल्या या धमाकेदार पोस्टरने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. पण ते फक्त एक पोस्टर नाही, तो आहे एका अंधाऱ्या खेळाचा पहिला इशारा. गडद सावल्या, नजरेतलं शांत पण अस्वस्थ करणारं काहीतरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी लपवलं गेलं आहे, जे दिसत नसलं तरी पोस्टर पाहून जाणवतंय. 'द ट्रॅप' नाव साधं, पण अर्थ खोल. ट्रॅप एक असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य... इथे प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय. प्रत्येक चेहरा खरा आहे की मुखवटा हे ओळखणं कठीण होत जातं, असा अंदाज पोस्टवरुन येतोय.    नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये हार्दिक जोशीचा लूक अत्यंत गंभीर आणि रहस्यमयी दिसत आहे. बॅकग्राउंडला असलेला गडद रंग आणि सस्पेन्सची जोड यामुळे हा चि...

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला.

इमेज
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.   येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरंजनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दणक्यात साजरं केलं जातं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून ‘चिरायू’ सतत वेगळा आणि सकारात्मक संदेश देत असते. तसेच नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते.    यंदा चिरायू च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये  बियांचा वापर करत ही  गुढी तयार करण्यात आली. उभारलेली ही ‘बीज गुढी’ केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याची प्रेरणा देणारी ठरली. या बियांमधून भविष्यात झाडे उगवून हरित पर्यावरण ...

"फुला" चित्रपटाला लाभला सुबोध भावेचा आवाज.

इमेज
   वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या फुला या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे यांच्या धीरगंभीर आवाज असलेल्या टीजरने लक्ष वेधून घेतले असून,  १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीचा चित्रपटाने आता उत्सुकता निर्माण केली आहे.      पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.  चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील ...

सलग प्रयोगांसह ‘ॲनिमल’ रंगमंचावर; सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत....

इमेज
मराठी रंगभूमीवर नव्या नाटकांची चाहूल लागलेली असतानाच ‘ॲनिमल’ या नाटकाने आणखी एक वेगळी चर्चा रंगवली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करत असून या वेळी त्यांचा प्रवास केवळ एका प्रयोगापुरता मर्यादित नसून सलग प्रयोगांच्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये ‘ॲनिमल’चे सलग प्रयोग सादर होणार असल्याने या नाटकाकडे रंगभूमीप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.   ‘ॲनिमल’ हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे ते या नाटकाचे निर्मातेही आहेत. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.    नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंती...

महाश्वेतादेवींच्या कथांवर आधारित नाटक 'महोगाथा'.

इमेज
प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेल्या तीन कथांवर आधारित असे 'महोगाथा' हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. सावित्री मेधातुल यांनी हे नाटक लिहिले असून, या नाटकाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. मंगेश सातपुते यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील यांची आहे. विक्रम होता यांनी या नाटकाला संगीत दिले असून, विलास हुमणे यांनी प्रकाशयोजना केली आहे. हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल हे चार कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १३ मार्च रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सादर झाला. 'काली बिल्ली प्रॉडक्शन्स' या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.     आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे, त्याची एक नागरिक म्हणून जाणीव असणे आवश्यक आहे, असा विषय मांडणारे हे नाटक आहे. मनोरंजन व एक महत्त्वाचा विचार देणारे आणि सध्याच्या काळात सभोवती घडत असलेल्या विविध घटनांना प्रतिसाद, अशा स्वरूपाचे हे नाटक आहे. प्रेक्षकांना मनोरंजन तर हवेच असते; पण त्या...

संगीतमय "फुला" चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न.

इमेज
   वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी "फुला" या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुण , काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे.     ज्येष्ठ पत्रकार, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत "फुला" या चित्रपटाचे पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच सॅक्सोफोन वादक राज सोडा हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.   पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.  चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगी...