पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्नाळ्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न; मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी.

इमेज
 प्रभात कॉलनी, अर्नाळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण, दर्शन तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांच्या प्रभावी कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी जागर केला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीबरोबरच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे हीच काळाची खरी गरज असल्याचा संदेश देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सत्य, सेवा, प्राणीमात्रावरील प्रेम आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारी असल्याचेही सांगण्यात आले.   स्थानिक परंपरेनुसार, सन १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्नाळा परिसरात वास्तव्य केले होते. त्याच दैवी प्रेरणेतून श्री विनायक गुळगुळे व सौ. नूतन गुळगुळे यांनी सन २०१५ मध्ये गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली.    या शक्तीस्थानातील 'स्वानंद सेवा सदन' या उपक्रमाद्वारे ग्रामी...

यावेळी तिसराच आहे...... झिम्मा -३ च्या चित्रीकरणाला सुरुवात....

इमेज
‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच ‘झिम्मा ३’ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता त्या उत्सुकतेत आणखी भर घालत चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून पोस्टरच्या माध्यमातून त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.  समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या पोस्टरमध्ये काही जण एका वर्तुळात उभे असल्याचे दिसतेय. मात्र, कुणाचाही चेहरा दाखवलेला नाही. त्याऐवजी प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे पेय दिसत आहे. कोणाच्या हातात कॉफी, कोणाकडे प्रोटीन शेक, कोणाकडे रंगीबेरंगी मॉकटेल, कोणाकडे नारळपाणी, तर कोणाच्या हातात आईस कॅन्डी आहे. प्रत्येकाची आवड आणि अंदाज वेगळा असल्याची झलक या पोस्टरमधून मिळते. एकाच फ्रेममध्ये दिसणारी ही रंगतदार मांडणी, समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण आणि प्रत्येकाच्या हातातील वेगळेपण यामुळे यावेळीही प्रेक्षकांना धमाल, मस्ती आणि भरपूर मनोरंजन अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत पोस्टर देत...