खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू, लेखाधिकारी महेश भांगरे, इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी श्री. साजणीकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासात एन.डी. स्टुडिओसारख्या चित्रीकरण स्थळांचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्राच्या समृद्ध कलाविश्वाला अधिक बळ देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.