दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या दिल्ली आवृत्तीचा शुभारंभ.

 मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा, आशयघन चित्रपट आणि दर्जेदार कलाकृती देशाच्या राजधानीतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या दिल्ली आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथे आयोजित दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवादरम्यान राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सदनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंगल, महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा अधिकारी चित्रलेखा खातू, दिल्ली परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागूल उपस्थित होते 
व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेला उपक्रम महाराष्ट्र सदन , दिल्ली परिचय केंद्र यांच्या पुढाकाराने दिल्ली येथे सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नवीन महाराष्ट्र सदन येथे दर महिन्याला निवडक मराठी चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्लीतील मराठी रसिकांसह विविध भाषिक प्रेक्षकांना मराठी चित्रपटांचा आशय, संस्कृती, कला आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.मराठी चित्रपटांना राज्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देणे, चित्रपट रसिकांमध्ये दर्जेदार मराठी सिनेमाबद्दलची आवड वाढविणे तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशाच्या राजधानीत अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नवीन महाराष्ट्र सदनातील नियमित चित्रपट प्रदर्शनामुळे दिल्लीतील मराठी चित्रपट रसिकांसाठी दर महिन्याला मराठी सिनेमाची एक नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.