‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद .

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ (समजूया मराठी चित्रपटाचे अर्थकारण) या महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ , सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाली हा उपक्रम संपन्न होणार आहे. 
चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या परिसंवादामध्ये चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अशोक राणे (ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व अभ्यासक),  महेश मांजरेकर (प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते), मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), राजेश मापुसकर (राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व लेखक)आदी समावेश आहे. 
नाव नोंदणी व इतर माहिती:
हा कार्यक्रम विनामूल्य असून या परिसंवादासाठी जागा मर्यादित असल्यामुळे इच्छुकांसाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी खालील ईमेल आयडीवर संपर्क साधावा: ई-मेल: promfscdc@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क: सुमेध आढाव (८६५२२१५४०१)
मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक गणिते, वितरण, आणि पडद्यामागचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी चित्रपटप्रेमी, विद्यार्थी व व्यावसायिकांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.