दही हंडीतील मटका फोडायला बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘शांताबाई’च्या खास मराठमोळ्या अंदाजात.

दहीहंडीच्या उत्साहात आता बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी देखील मराठमोळ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटातील बहुचर्चित ‘शांताबाई’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या गाण्यात सनी लिओनीचा भन्नाट मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
‘शांताबाई’च्या तालावर मंगेश देसाई, सयाजी शिंदे आणि प्रणवराव राणे यांच्यासह कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार असून, गाण्याची जोशपूर्ण लय आणि उत्साही नृत्य हे या गाण्याचे खास आकर्षण आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मटका फोडण्याचा उत्साह आणि ‘शांताबाई’चा झकास अंदाज यामुळे हे गाणे सणाच्या वातावरणात रंगत आणणारे ठरणार आहे.
या धमाकेदार गाण्याचे संगीत, गीत आणि गायन संजय लोंढे यांनी केले आहे. गाण्याचा पूर्ण व्हिडिओ SKR Music and Movies या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला असून, हे गाणे सर्व प्रमुख संगीत आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’* मध्ये उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि निर्माते संजीव कुमार राठोड आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शक शालिनी राठोड आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर आर्यन राठोड यांनी चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्याला व्यापक व्यासपीठ देणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा संवेदनशील चित्रपट आता प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
    आता ‘द महाराष्ट्र फाईल्स’ पाहा प्राईम व्हिडिओवर! आजच प्राईम व्हिडिओवर जाऊन हा संवेदनशील आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आवर्जून पाहा!शांताबाई’ गाणे प्रदर्शित झाले आहे…आता सनी लिओनीच्या ‘आधुनिक शांताबाई’चा झकास जलवा पाहायला विसरू नका!*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...