‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’,‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत.

रिक्षाच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ प्रत्येकाने वाचली असेल…पण ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हीच ओळ जेव्हा भन्नाट ठेक्यावर ऐकू येते, तेव्हा पावलं आपोआप थिरकायला लागतात! देसी शब्दांचा तडका, नशा चढवणारा ठेका, नकाश अझीझचा जोशपूर्ण आवाज आणि सुरेश पंडित यांचं दमदार संगीत यामुळे हे गाणं ‘दशमी’चं खास आकर्षण ठरणार आहे. 
‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले..तेरा मुँह काला’ हे गाणं चित्रपटाला एक वेगळीच एनर्जी देणार असून, या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन, अभिनेते मकरंद अनासपुरे, विजय निकम या गाण्यावर भन्नाट ठेका धरताना दिसणार आहेत. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला भाग पाडणार आहे. वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं आहे. ‘दशमी’ चित्रपटातील गीते ‘व्हिडिओ पॅलेस’ने प्रकाशित केली आहेत.  
रिक्षांवरच्या भन्नाट लिखाणाला सिनेमाच्या पडद्यावर नवा रंग देणारं हे गाणं प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेला ‘दशमी’आता एका हटके गाण्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत 'दशमी' हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. लेखन आणि संगीत याची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अन्याय, संघर्ष आणि सत्याची परीक्षा येते. अशा वेळी परिस्थितीसमोर न झुकता सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य ‘दशमी’ची कथा देते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...