'लॉ ऑफ लव्ह' 24UA MOVIES या ओटीटी चॅनलवर प्रदर्शित.

धडाकेबाज अॅक्शन आणि रोमान्सचा समावेश असलेला "प्रेमाचा कायदा" (लॉ ऑफ लव्ह) हा चित्रपट आता आपण 24UA MOVIES या ओटीटी चॅनलवर घरबसल्या पाहू शकतो. 24UA MOVIES या OTT चॅनलला आत्ताच प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि हा चित्रपट पहा.
या चित्रपटाची कथा ८०-९०च्या दशकातील आहे. प्रेमाचा एक कायदा असतो हे तेव्हा दशकातील तरुणाईला माहित नव्हतं. प्रेमाचा एक कायदा असून, त्याचा तरुण पिढीवर कसा चांगला-वाईट परिणाम होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
निर्माता, दिग्दर्शक, कथा-पटकथा, प्रमुख अभिनेता अशा अनेक भूमिकेत उदयराज हे स्वतः असून मोहन जोशी, यतीन कार्येकर, शाल्वी शाह, प्राची पालवे, अनिल नगरकर यांनी 'लॉ ऑफ लव्ह'मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला संगीत पी शंकर व पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे लाभले आहे. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात प्रेमामधील वेडेपणा आणि प्रासंगिक विनोदांचा संगम अनुभवायला मिळेल. धडाकेबाज अॅक्शन आणि रोमान्सचा समावेश असलेला हा सिनेमा कुटुंबाबरोबर पाहण्याजोगा आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवाद, अफलातून अभिनय, सुमधूर गीत-संगीत, मुद्देसूद मांडणी, लक्षवेधी दिग्दर्शन असलेला हा परिपूर्ण मनोरंजक चित्रपट कुटूंबाबरोबर एंजॉय करता येईल असा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.