दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ उत्साहात संपन्न.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आयोजित करण्यात आलेला ‘सेलिब्रिटी योगा’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत निरोगी व संतुलित जीवनशैलीसाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.
यावेळी आयोजित योग प्रात्यक्षिक सत्रामध्ये प्रशिक्षित योगतज्ज्ञ अमी कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे सादरीकरण करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रातील अरुण कदम, अमृता राव, मिलिंद गवळी, रोहिणी निनावे, मंगेश बोरगावकर, प्राची कुलकर्णी, धनश्री दामले, प्राजक्ता दातार, ऋतुराज शिंदे, राधिका हर्षे, मृणमयी भजक, निलिमा कुलकर्णी, निनाद पाटील, मानसी इंगळे 
या कलाकारांनी या उपक्रमात सहभागी होत योगाबाबत जनजागृतीचा संदेश दिला.
   कार्यक्रमादरम्यान योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनमूल्ये जोपासण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी योगाभ्यासाचा अनुभव घेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साहाने आनंद लुटला.
   यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, अधिकारी, कर्मचारी योगप्रेमी नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत व दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त"माझा बाबा"शॉटफिल्मला मिळाले ३मानाचे पुरस्कार.