आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मजनू-लैलाच्या प्रेमकहाणीला ‘वॉमँटिक’ ट्वीस्ट.

‘नखरेवाली’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विनोद, भावना आणि हटके ‘वॉमँटिक’ अंदाज असलेला हा ट्रेलर रोमँटिक कॉमेडीला एक नवी रंगत देतो. गोंधळ, मिश्किल संवाद आणि आजच्या नात्यांमधील गंमतीजमती यांची सांगड घालत हा चित्रपट प्रेम आणि नात्यांबद्दलच्या अपेक्षा एका वेगळ्या पद्धतीने मांडतो.
या ट्रेलरमध्ये काही पुरुष प्रेमाकडे कसे पाहतात, महिलांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीबद्दल त्यांची काय भूमिका असते आणि ज्या महिलांना ते डेट करतात, त्यांच्याशी वागण्याची पद्धत आणि ज्यांच्याशी त्यांना लग्न करायचे असते, त्यांच्याबद्दलची विचारसरणी यात किती फरक असतो, हे दाखवण्यात आले आहे. प्रेमाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पनांपासून सुरू होणारी ही गोष्ट हळूहळू प्रेमकहाणीत बदलते. आपल्या आवडत्या व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी माणूस किती पुढे जाऊ शकतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळते. हसत-खेळत ही कथा समाजातील स्त्री-पुरुषांमधील भेदभाव आणि दुहेरी निकषांवरही प्रश्न उपस्थित करते.
   या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या हटके पोस्टरला “कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पड़ता है” या मजेशीर ओळीसाठी चांगली पसंती मिळाली होती. आता ट्रेलरमुळे चित्रपटाच्या वेगळ्या विषयाबद्दल आणि नात्यांकडे पाहण्याच्या त्याच्या मिश्किल दृष्टिकोनाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
   नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल शांकल्या यांनी केले आहे. आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा यांच्या नेतृत्वाखालील जिओ स्टुडिओज आणि कलर येलो यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेम, विनोद आणि भरपूर नखऱ्यांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची एक खास मेजवानी देण्याचे आश्वासन देतो.
‘नखरेवाली’ हा चित्रपट ३० ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर लिंक -https://youtu.be/Gw5_UTgjVgY?si=EOciaOfRtvQIB9Fx

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...