अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’,‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच एका वेगळ्या धाटणीचा अँक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी ‘सायको रंगा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे. ताजी मांडणी, दमदार अँक्शन, शहरातील आकर्षक झगमगाटासोबत गावातल्या मातीमधील संघर्ष दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना प्रभावित करतो. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला गुढ व्यक्तिमत्वाचा ‘रंगा’ नेमका कोण आहे? शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना शक्तिशाली वाईट प्रवृत्तींना तो नमवू शकतो का ?त्याच्या गूढ वावरामागील रहस्य काय? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून उलगडणार आहेत. 
विशेष म्हणजे, ‘विजेता’नंतर पुन्हा एकदा सुबोध भावे आणि देवेंद्र चौगुले ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यांच्यासोबत मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते(दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे,एन डी चौगुले,सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभवी आणि दमदार कलाकारांची ही फळी चित्रपटाच्या कथेच्या मांडणीला अधिक प्रभावी बनवणार आहे.
   याविषयी  देवेंद्र चौगुले म्हणाले, “ प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक चित्तथरारक अनुभव असेल. निखळ प्रेम, कर्तव्यदक्षतेसोबत  अघोरी महत्त्वाकांक्षेमुळे एका सामान्य व्यक्तीच्या जीवनात आलेले वादळ आणि परिस्थितीसमोर झुकण्याऐवजी लढण्याची त्याची जिद्द या सगळ्याचं चित्रण आम्ही प्रामाणिकपणे या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात मनोरंजन आहेच , तसेच  सामाजिक वास्तवाची ठोस मांडणी आहे. ही कथा एका युवकाच्या स्वाभिमानाची, त्याच्या अविश्वसनीय लढ्याची आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.” 
   ‘सायको रंगा’ हा चित्रपट देवेंद्र चौगुले लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित असून, स्नेहलराज(दादू) यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. उत्तम चोरडे या नव्या दमाच्या संगीतकाराने अतिशय वेगळ्या धाटणीचे संगीत दिलेले आहे. अँक्शन, स्टंट्स, रोमान्स , ड्रामा, म्युझिकल ट्रीट असलेला ‘सायको रंगा’ हा चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.