कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात “जीव -द क्रियेचर”आणि “एप्रिल मे ९९” या दोन चित्रपटांची निवड.

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स मधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात “जीव -द क्रियेचर”आणि “एप्रिल मे ९९” या दोन चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली. निवड झालेल्या चित्रपटांचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी अभिनंदन केले. 
  महाराष्ट्रातील आदिवासी कोकणी समाजाच्या परंपरा आणि रूढींवर जीव' (The Creature) 
हा चित्रपट असून रविंद्र जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे. रोहन मापुस्कर  दिग्दर्शित एप्रिल मे ९९ हा चित्रपट मैत्रीतले ताण, प्रेमाची सुरुवात, स्वतःला शोधायचा प्रवास आणि उन्हाळी सुट्टीच्या आठवणी ह्या भोवती हा सिनेमा बांधला आहे.
   फ्रान्स येथे येत्या १२ ते २२ मे कालावधी मध्ये कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. यामध्ये आयोजन केल्या जाणाऱ्या फिल्म बाजार विभागात सन २०१६ पासून शासनाच्या माध्यमातून महामंडळ सहभागी होत आहे.
मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा आणि जागतिक सिनेप्रेमिना मराठी चित्रपटाची भुरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महामंडळाने तज्ज्ञ परीक्षक समिती तयार केली होती. यामध्ये छाया कदम, अमोल परचुरे,तृप्ती भोईर, भाऊसाहेब कऱ्हाडे, विजय खोचीकर यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...