शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज,आगर अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष 'श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर' यांच्या हस्ते दीप प्रज्वलन.
शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज, आगर यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष 'श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर' दीप प्रज्वलन केलेतसेच त्यांनी शॉपिंग गॅलरी चे उद्घाटन केले. याप्रसंगी विश्व भंडारीचे जयंत पाटकर, शेषवंशी भंडारी समाजाचे श्री. शैलेश पटेल, व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे पालघर जिल्हाप्रमुख श्री. मनोज पाटील, तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे महासचिव श्री. प्रकाश कांबळी. व इतर मान्यवर उपस्थित होते. आजच्या या समारंभात डहाणू येथील भंडारी समाज बांधवांना श्री. नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी गुजराती, व मराठीतून भाषण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात भागोजी शेठ कीर व श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचा उल्लेख करून समाजाला प्रबोधन केले. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ चे पालघर जिल्हाप्रमुख श्री. मनोज पाटील यांनी भंडारी समाजाच्या पाच पोट जाती पालघर जिल्ह्यातील एकत्रित यावे, आणि एक वज्रमुठ करावी असे आवाहन केले. तसेच श्री. प्रकाश कांबळी यांनी रोजगार,व नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी मार्गदर्शन शिबिर पालघर, व डहाणू येथे घेण्याचे सुचवले. कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा