‘जीव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.

दर्जेदार आशयघन चित्रपट युवा पिढीसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुजाण प्रेक्षकवर्ग घडविण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘जीव’ चित्रपटाचे प्रदर्शन  मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांसह बहुसंख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जीव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह चित्रपटातील प्रशांत कांबळे, रविंद्र जाधव, उषा रविंद्र जाधव, समृद्धी रविंद्र जाधव,  प्रसाद कुंभार, करण जाधव, विशाल नामदेव सिरसट, अक्षय कदम,  अभय पोते,  ⁠ओंकार गोखले, आदर्श सातपुते हे कलाकारही उपस्थित होते. याप्रसंगी कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करताना  दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले.
  ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील श्रद्धा, परंपरा आणि मानवी संघर्ष यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण करणाऱ्या 'जीव' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले असून शिवाजी शेवाळे, बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, दीक्षा उजागरे, आदर्श जाधव, समीर रामटेके, रवींद्र जाधव, उषा निंबाळकर आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जीव’ चित्रपटाचा विशेष गौरव करण्यात आला असून, चित्रपटातील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाचेही भरभरून कौतुक करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने कान चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी निवडलेल्या मराठी चित्रपटांमध्येही ‘जीव’ चित्रपटाची निवड झाली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.