अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,व भंडारी समाज उत्कर्ष मंडळ, विक्रोळी.यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.

विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी‌ सभागृहामध्ये ह्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर श्री. ‌ जयप्रकाश पेडणेकर व श्री.विकास राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.उमेदवारांना मार्गदर्शन श्री. आदित्य कांबळी सर व त्यांचे सहयोगी श्री.सर्वेश दामले यांनी केले.विद्यार्थी प्रतिनिधींचा उत्तम सहभाग लाभला, या शिबिरात ५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर साहेबांनी भंडारी समाजातील तरुणाईला आव्हान केले, की रोटी, कपडा, मकान हे जर साध्य करायचं असेल, तर आपल्याकडे आर्थिक पाठबळ लागते, आणि याचाच अर्थ वित्य संस्थेकडे नोकरी केल्यास ते सहज शक्य होते. आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्या मुली होत्या.
डॉक्टर श्री. जयप्रकाश पेडणेकर यांनी या उपक्रमाची खूप प्रशंशा केली, व भंडारी समाजाच्या तरुणाईला यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यासपीठावरती भंडारी उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा सौ. गावकर मॅडम, तसेच अ.भ.भ.स.महासंघाच्या विश्वस्ता श्रीमती रिटा मीठ बावकर,  व महासचिव श्री.प्रकाश कांबळी, तसेच टिळक नगर चेंबूर येथील  नगरसेवक श्री.अविनाश मयेकर, त्याचप्रमाणे भंडारी उत्कर्ष मंडळ विक्रोळीचे श्री.गणेश राऊळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रोफेसर हळदणकर यांनी केले..कार्यक्रमाची सुरुवात श्री. उज्वल जाधव यांनी महाराष्ट्र गीतांनी गाऊन केली.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.