पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*‘डोळ्यावर गॉगल लावा’ ठसकेदार लावणी प्रेक्षकांच्या भेटीला*

इमेज
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘भिरकीट’ नावाच वादळ घोंगावत आहे. ‘भिरकीट’ च्या ट्रेलरला व गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यातून  प्रेक्षकांमध्ये चांगलाच हश्या पिकणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांचा ठसकेदार आवाज मिळाला असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. १७ जून रोजी ‘भिरकीट’ नावाचे  वादळ संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, ‘भिरकीट’ चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात विनोद आणि  कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणी ही पहायला मिळणार आहे. नक्कीच हे गाणं प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ चित्रपटाची निर्मीती सुरेश जामतराज ओसवाल व भाग्यवंती ओ...

दगडूच्या प्रेमाला फुटणार नवी 'पालवी' !

इमेज
हम गरीब हुए तो क्या हुआ ! चला, हवा येऊ द्या ! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू - प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती,  शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास ! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास २ हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.   टाइमपास ३ ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ' पालवी दिनकर पाटील' ! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी ! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेम...

'अनन्या' २२ जुलैला भेटीला येणार ........

इमेज
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे. ‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदले...

*‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘अर्जुन’ अव्वल*

इमेज
‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि नावान्यपूर्ण आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नामवंतांसोबत उगवत्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘प्लॅनेट मराठी’ तर्फे ‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चे (पीएमएसएफएफ)आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल अखेर जाहीर झाला. पाच लाखांचे प्रथम पारितोषिक मधुबन फिल्म्सच्या ‘अर्जुन’ या शॅार्टफिल्मला मिळाले असून तीन लाखांचे द्वितीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अर्जुन्स स्टोरी’ला मिळाले आहे. तर दोन लाखांचे तृतीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अवंती’ या शॅार्टफिल्मने पटकावले आहे. पन्नास हजाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अभी - अनू’ आणि तीस हजाराचे पारितोषिक अमर गोरे व अकबर सय्यद यांच्या ‘आत्मन’ या  शॅार्टफिल्म्सना देण्यात आले आहे.   या शॅार्टफिल्म फेस्टिव्हलला तुफान प्रतिसाद मिळाला असून अवघ्या महाराष्ट्रातून सुमारे १६०० प्रवेशिका आल्या होत्या. या वेळी परिक्षक म्हणून  संजय जाधव, मृणाल कुलकर्णी, किरण यज्ञोपावित, निखील महाजन, सर्वेश परब यांनी जबाबदारी सांभाळली होती. आ...

*सन्मानाने जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा 'फनरल'*

इमेज
आपण खूप आशा अपेक्षा घेऊन जगतो. खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते ‘खूप काही’ मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो आणि मग खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर “अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं ! हे लक्षात येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आज जगण्याचा उत्सव व्हावा आणि मरणाचा सोहळा व्हावा अशी परिस्थिती किती अभावाने दिसते. आयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार देत जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या लेखक-निर्माते रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत. नुकताच ‘फनरल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्...

रंगला ५०० वा महोत्सवी प्रयोग... (एका लग्नाची पुढची गोष्ट) 

इमेज
५०० वा महोत्सवी प्रयोग...  (एका लग्नाची पुढची गोष्ट)         प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा ५०० वा हाऊसफुल्ल प्रयोग रविवार, २९ मे रोजी दीनानाथ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात रंगला. या महोत्सवी प्रयोगाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख त्यांच्या मातोश्रींसह उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गौरी दामले, संजय मोने, आशिष शेलार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.         अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीला झालेल्या ५० वर्षांचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या नाटकाशी संबंधित सर्वांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये त्यांनी त्यांच्या सडेतोड भाषणाने रंगत आणली. यावेळी दीनाना...

*मरिआई या दुर्लक्षित जमातीवर भाष्य करणारा "इरगाल"*

इमेज
दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित 'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून "इरगाल" चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून, महाराष्ट्रातील मरिआई या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  अग्निपंख प्रोडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी यांनी  इरगाल चित्रपटाची निर्मिती केली आहे. रशीद उस्मान निंबाळकर यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचं छायांकन केशव गोरखे, संगीत दिग्दर्शन डॉक्टर जय-भीम सूर्यभान शिंदे, संकलन प्रशांत नाईक यांनी केलं आहे. राम पवार, राहुल चवरे, रशीद उस्मान निंबाळकर, सृष्टी जाधव, उषा निंबाळकर, दामोदर पवार, महादेवी निंबाळकर, स्वप्नाली बोडरे, स्वप्नाली तूपसुंदर, आप्पासाहेब खांडेकर, मस्के सर, अभिनंदन गवळी, साहेबराव जाधव, भारत निंबाळकर, शरणाप्पा बंडगर, शैला गायकवाड आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. मरिआई ही दुर्लक्षित जमात आहे. धर्मग्रंथात किंवा वाङ्मयात त्या बाबत उल्लेख आढळत ...

'वाय ' चा टिझर आपल्या भेटीला.

इमेज
मुक्ता बर्वेने हातात मशाल धरलेले 'वाय' या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता 'वाय' चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहेतच.  चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि 'वाय' या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ''वाय' या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. ह्या टीझरचा आणि 'वाय' या नावाचा अर्थ तुम्हां...