'फनरल'.......मरणाचा 'ही' आनंदोत्सव व्हावा........ समीक्षण: वैभव बागकर.


जन्म आणि मृत्यू, म्हणजे जन्मलेला  माणूस  हा मरणार आहे हे  माहीत  असूनही आपण मृत्यू  बद्दल  बोलणं टाळतो,त्याला दूर सरण्याचा प्रयत्न  करतो .त्याला अशुभ मानतो, सतत स्वतःची  आप्तेष्टांची काळजी घेतो, काळजी करतो.अपघात,आजार, यापासुन सतत  दूर राहून,काळजी करून,घेऊन मृत्यू  पासून  सतत  दूर  पळण्याचा प्रयत्न  करतो,पण......ते अंतिम सत्य आपल्याला  गाठतच,ते सर्वानाच गाठत.पण हेसर्व  माहित  असूनही दूर पळण्याची  असोशी  काही गेल्या जात नाही,पण ..या अंतिम सत्याला आनंदाने  सामोरी  जाऊन,त्याचा आनंदोत्सव  का होऊ नये,असा विचार घेऊन घेऊन  आलेला मराठी  चित्रपट आहे. 'फनरल'.......एक आनंददायी ... मृत्यु नंतरचा  प्रवास ....                                                                        
        ही गोष्ट  आहे हिरा नावाच्या  तरुणाची ,त्याच्या तीन  मित्रांची, मीनल नावाच्या मैत्रिणीची , त्याच्या आजोबांची  आणि इतर माणसांची .....हया त्यातील काही व्यक्तिरेखा आहेत,तसाच एक मार्टिन  नावाचा कावळा पण आहे,तो प्रतीकात्मक  म्हणून असलेला,हिरा आईवडील  नसल्याने आजोबान सोबत मोठा झालाय,आईवडिलांच्या मायेविना आजोबांच्या  छत्रछायेत  मोठा झालाय,म्हणून जुन्या नव्याचा  काळजी युक्त संघर्ष  इथे  आहे,हिरा त्याचे मित्र तस काहीच काम करत नाही,पण काहीतरी  करायचं याचा  विचार मात्र आहे,रोज चायनीज गाडीवर,दारू पिणे,खाणे,अशी मौज मजा चालू आहे,दारूची उधारी सुध्दा आहे,त्याच्यातील एक मित्र पॉलिसी  विकायचं काम करतो,असाच एक दिवस तो एका श्रीमंत माणसाकडे  पॉलिसी  काढून घ्यायला जातो आणि आणि अकस्मात त्यामाणसाचा मृत्यू  होतो,मग पोलीस  तपास संशय,यातून तो सुटतो,पण यासगळ्यातून तो आणि हिरा मित्र  मंडळीना एक सकारात्मक  गोष्ट सापडते,हिरा ही संकल्पना राबवून एकबिनभांडवली उद्योग चालू करायचं योजतो.यात दोन मित्र  माघार घेतात,पण हिरा ते प्रत्यक्षात आणू पाहतो , आणि  'सुखांत' नावाची  एक अंत्यसंस्कार  करणारी  इव्हेंट  कंपनी  उदयास येते,.........आणि खरा शेवटचा प्रवास आनंददायी  कसा होतो,कसा व्हावा,......याची रंजक गोष्ट ..... फनरल 
कथापट हा आत्ताच्या कोरोना  नंतरच्या भाषेत सांगायचं तर एक नवीन स्टार्ट अप घेऊन येतो, अभद्र,अमंगल समजली जाणारी पण त्याशिवाय अडत अशी गोष्ट.... अंत्ययात्रेच,सामान,त्याची तयारी,ही जरा नकारात्मता आणणारी  गोष्ट,पण आज समाजात या गोष्टीची  कधी गरज आहे,हे कथापट  सांगतो,अनेकांची छोटी  कुटुंब, काहींच्या घरात माणसाचं नसणं एकटी  माणसं,यात मृत्यू  झाला तर अंत्यविधी  करायला माणूस नाही,ही बऱ्याच अंशी  खरी गोष्ट  आहे,त्यासाठी मनुष्यबळ हवं,.....यातून कथापट एका वेगळ्या  समस्येकडे अंगुलीनिर्देश करतो, आणि यातून भावनिक नातं जोडू पाहतो,आपण जगण्याचा  उत्सव  आनंद  व्यक्त  करतो,तर मग जाण्याचं का नको,आनंदाने निरोप का नाही द्यायचं,हे सांगू  पाहतो,
कथापटात, मृत्यू संदर्भात दोन प्रसंग प्रत्यावर्तनातुन  समोर येतात,यात हिरा त्यांचे मित्र अंत्ययात्रेला टाकले जाणारे पैसे जमा करताना दिसतात,तर दुसरा प्रसंग मेलेल्या पोपटाला मुठमाती देण्याचा,यातुन दिग्दर्शकाने कथेतील विषय गहिरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे,रोज हिराच्या  गॅलरीत येणारा मार्टीन नावाचा कावळा, यातुन हिंदूधर्मातील पित्रं म्हणून कावळ्याच महत्व नकळत अधोरेखित होताना दिसतं, मृत्यू हा भीतीयुक्त असला तर त्या सत्याला सामोरे जावेच लागतं,मग मृत्यू नंतरची  अंत्ययात्रा ही आनंदाची का होऊ नये, म्हणून शेजारी असलेल्या आणि हिराला  जीव लावणार्या आजीला त्यांनीच चालविलेल्या लाफ्टर  क्लबच्या सभासदांनी हसुन दिलेला अखेरचा निरोप यातुन, सुखांत या कंपनीची कल्पना जास्त स्पष्ट होते.यात केवळ उद्योग, पैसे मिळवणे हा उद्देश नाही तर एक भावनिक नातं फुलताना दिसतं,
कथापटात योजलेले प्रसंग हे मृत्यू, अंत्ययात्रा, यांच्याशी निगडित आहेत,पण ते कुठेही अवास्तव उदास, दुःख दायक किंवा भीतीदायक ही होत नाही, त्यामुळे कथापट आपली भावनिक उलधाल एका स्तरावर सीमित ठेवतो,तर अनेक प्रसंग हृद्य करून आपल्या भावनांशी सलगी करतो,कारण आपण सारेच या सत्याला कधीना कधी सामोरे गेलेलो असतो,पण कथापट  हा उगाच दुःखीही करत नाही,
कथापटातील  नाते संबंध,चाळसंस्कृती, मध्यमवर्गीय मानसिकता, नात्यातील सहजता, व्यक्तिरेखा त्यांचे स्वभावधर्म हे तिथल्या वातावरणात सुसंगत वाटतात, अनाकलनीय भीती,शुभअशुभाच्या संकल्पना, प्रेम व्देष याच भावनिक  द्वंद्व, दुःख आनंद,अव्यक्त प्रेम,काळजी, भावनिक ओलावा यासार्या भावना एकसंध रितीने समोर येताना दिसतात, सध्याच्या काळात कमी होत जाणारी आत्मियता,याचं दर्शनही घडत, उगाच काही सांगण्यासाठीचा आटापिटा इथे दिसत नाही, सहजता कायम राहते हे कथापटाचं बलस्थान आहे,जगू आनंदे,निघू  आनंदे.....हे अभंगासारख गीत आशय आणखी गहिरा करतो.मात्र जगू आनंदे हे सांगणं बर्याच अंशी कमी दिसतं,तसे प्रसंग फारसे नाहीत,कदाचित निघू आनंदे यावर भर असल्याने तसं झालेलं असावं,
कथापटात तशी लोकप्रिय किंवा खूप नावाजलेली कलाकार मंडळी नाहीत,पण जे कलाकार आहेत त्यांनी आपल्या व्यक्तीरेखांना  पूरेपूर न्याय दिलेला आहे, तिथे कुठे ही नवखेपणा जाणवत नाही.प्रेमा साखरदांडे,(मोरे आजी)ही आपल्या शेजारच्या आजी वाटाव्यात,आरोह वेलणकर (हिरा) समजूतदार पुणे साकारलाय,तन्वी बर्वे ( मीनल)विजय केंकरे ( हिराचे आजोबा)संभाजी भगत( कचरू)हर्षद शिंदे (सूर्या)पार्थ घाटगे (विनोद)सिद्धेश पुजारे ( सदा)यासार्याच कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे.
कथापट आपल्याला एका काहीश्या  नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातुन पहायला सांगू पाहतो,आणि जगण्याचाच नाही तर मरणाचा 'ही' आनंदोत्सव व्हावा असं सांगतो......
*‘फनरल’*
प्रस्तुती - ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ ,निर्माते - लेखक - रमेश दिघे
दिग्दर्शक - विवेक दुबे,
असोशिएट निर्माते - प्रदीप दिघे 
कार्यकारी निर्माते - प्रसाद पांचाळ
सहाय्यक निर्माते - विश्वास भोर, सचिन ढमाले
संकलन - निलेश गावंड 
छायांकन - अनुराग सोळंकी
कलादिग्दर्शन - मनोहर जाधव, महेश साळगांवकर
संगीत-पार्श्वसंगीत - अद्वैत नेमळेकर
साऊंड-  सूर्या मुकादम,गंधार मोकाशी
क्रीएटीव्ह दिग्दर्शक - रमेश दिघे, श्रीपाद जोशी

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.