वाय्(Y ).............सुन्न करणारा.....थरार...... समीक्षण:वैभव बागकर.

             वाय्(Y )...............सुन्न करणारा.....थरार......
                                                                       समीक्षण:वैभव बागकर.

      एखादा  चित्रपट येतो तो सत्यघटनेवर आधारित,कदाचित  त्याचा  विषय कालानुरूप थोडा जुना वाटतो,पण ती घटना तो विषय काहि संपत नाही,कारण अशा घटना घडायचं काही थांबत नाही.असा अतिशय गंभीर समस्या बनलेला, विचार केला तरी मन सुन्न होत,हा विषय थेट वैद्यकीय क्षेत्रातील गुन्हेगारी कडे वळणारा एक सामाजिक स्वरुपात गुन्हा असलेला पण एकिकडे तो समाजातील काही घटकांना तो गुन्हा वाटत नाही तर ती गरज वाटते, आणि  अशाप्रकारे समाजात असे गुन्हे घडतच  राहतात,तो गुन्हा आहे गर्भजल निदान आणि स्त्री भ्रूणहत्या.......‘गर्भजल व गर्भलिंगनिदान तंत्र (नियमन व गैरवापर प्रतिबंध) कायदा, १९९४’ या कायद्यात २००३मध्ये सुधारणा करून त्याचे नवे नाव ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा’, असे करण्यात आले आहे. गर्भलिंगनिदान व गर्भनिवड करण्यास या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली आहे. गर्भाचे निदान करून तो गर्भ मुलीचा असल्यास गर्भपाताद्वारे तो काढून टाकण्याच्या अमानवी प्रकारावर वचक बसवण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. असे बेकायदा कृत्य करणाऱ्या डॉक्टरांवर खटला भरण्यात येतो व पुराव्यासह सिद्ध झाल्यास त्याला शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.पण प्रत्यक्षात काय घडतं,आत्ता  पर्यंत काय घडलं........
कथापट अशीच एक प्रातिनिधिक स्वरूपात सत्यघटना आपल्या समोर घेऊन येतो,विश्रामपूर,येथील डॉ.पुरुषोत्तम हॉस्पिटल,इथं चालणार्या गैरपध्दतीने होणार्या गर्भजल चाचणी आणि स्त्री भ्रूणहत्या,बेकायदेशीर होणारे,केले जाणारे गर्भपात........ डॉ.पुरुषोत्तम त्यांचे सहकारी अगदि थंड डोक्याने आपलं गर्भपात करण्याचं काम करीत आहेत,यात ब्लॅकमेल करणारा फोटोग्राफर,याचं अचानक नाहिसं होणं, पोलिस यंत्रणा, त्यांचा भ्रष्ट कारभार, एकूणच चाललेला  हा कारभार,लोकांना याबद्दल काही तक्रार नाही.पण यात पुढे .‘गर्भजल व गर्भलिंगनिदान तंत्र (नियमन व गैरवापर प्रतिबंध) कायदा, १९९४’ या कायदा.(पीसीपीएनडीटी) याअंतर्गत डॉ.आरती (अधिकारी)सगळी माहिती गोळा करुन बेकायदेशीर उद्योग बंद करण्याचे ठरवितात.यासाठि पुरावे जमा करतात,यात त्यांना प्रचंड अडचणी येतात, धमक्या,माहिती न मिळणं,लोकांचा असहकार, चौकशी,बदली, वरिष्ठांन कडून येणारा दबाव,यासगळ्यांना सामोरी जात डॉ.आरती यात यशस्वी होते का?झालीच तर कारवाई होऊन गुन्हेगारांना शिक्षा होते का,कीवां गुन्ह्याची नोंद होऊन शिक्षा झाली का.........यावर आधारित कथापट 'वाय्'
कथापट हा २००७ नंतर च्या कालावधीत घडताना दिसतो.त्यामुळे हा काळ फार जुना नाही.यातील डॉ.पुरुषोत्तम,त्या त्यांचे  हॉस्पिटल तिथे चालणारे, गर्भपात,गर्भजल चाचण्या,हे गैरप्रकार आणि हे रोखण्यासाठी होणारी कायदेशीर कारवाई,यावर कथापट प्रामुख्याने प्रकाशझोत  टाकतो, या सगळ्या प्रकाराची गोष्ट कथापट अतिशय वेगवान उत्कंठावर्धक, रितीने आपल्या पर्यंत घेऊन येतो,कथापटात काही निवडक व्यक्तिरेखा त्यांचे नातेसंबंध त्यांच्यातील भावनिक पातळीवर असलेली निरागसता तर एकदम अंगावर येणारं क्रौर्य समोर येतं.समाजातील हा चालणारा गैरप्रकार हा जणू गैर नाही.अशीच धारणा घेऊन डॉ.पुरुषोत्तम गायकवाड,वावरताना दिसतो,तो नेहमीच्या कथापटात  दिसणारा लौकिक अर्थाने खलनायक नाही.कारण जो जे काही करतो त्यांचं समर्थन करतो,आणि तो म्हणतो मी भ्रृण काढून टाकून मारत नाही तर तर ते आधीच मेललं असतं,त्या स्त्री भ्रूणाचं आधीच नाकारणं हेच त्याला संपवतं,मी डॉक्टर असलो तरी या समाजातील काही घटकांची गरज मी पूरी करतो त्यांना ते हवं असतं,यामधुन समाजातील दांभिकता प्रकर्षाने समोर येते. प्रत्येक वेळी अशा प्रसंगी केवळ पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही.तर एखाद्या सासूचं सुनेला, मुलगा व्हावा म्हणून स्त्री भ्रूणहत्येचं समर्थन करणं,हे अनेकदा घडताना दिसतं, सामाजिक स्तरावर धार्मिकता जोपासताना स्त्री शक्तीला देवीची उपमा दिली जाते,पण मुलीचं जन्माला येणं नाकारलं जातं,तिला जन्माला यायच्या आधी संपवलं जातं,हा दुटप्पीपणा,आणि आपणचं आपल्या नातेसंबंधांची  निर्भर्त्सना करतो,तर डॉ.आरती ही अधिकारी ही नायिका नाही तर तर दृष्ट दुर्दैवी, अमानवीय,प्रकार थांबविण्यासाठी लढणारी वृत्ती आहे.हे सारं आपल्या कर्तव्यनिष्ठतेतून दाखवते.ती स्वतः आई नाही पण एका मुलीची पालक म्हणून आई झालेली आहे.
 कथापटात केंद्र स्थानी असलेला स्त्रीभ्रूणहत्या हा विषय आपल्याला काही सांगण्याचा जाणीवपूर्वक ठाकून टोकून प्रयत्न करीत नाही तर एक गोष्ट उलगडत नेऊन  आपल्याला अस्वस्थ करतो,आत कुठेतरी हादरवतो,यातील पटकथेतून आपल्याला दिग्दर्शक सतत सतर्क  करतो,कथा.पटकथा,छायांकन,दिग्दर्शन इतक्या मिसळून जातात,कि जो दृष्यात्मक एकसंध परिणाम समजतेने समोर येतो, चित्रपटासाठी आवश्यक असलेली चित्रमालिका, चित्रचौकटि त्यातील चित्रभाषा,याचा वापर दिग्दर्शक अगदि जाणीव पूर्वक अचूकतेने करताना दिसतो,उगाचच विविध कोनातून केलेलं छायांकन इथे दिसतं नाही, केवळ दृष्य दाखवण्यासाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना,घडणारी घटना याचं चित्रण,यात एक प्रसंग चालू असताना त्याच दृष्यात दुसरि घटना घडताना दिसते,पण हे घटित तिथेच थांबत,आणि ते पुढे नव्याने सुरु होऊन तो प्रसंग संपतो,हे वापरलेलं तंत्र विषयासाठी खूपच प्रभावी ठरतं, ढणढणाटी पार्श्वसंगीत,याला फाटा देऊन ते सारं सांगतो, किंवा एखादं प्रचारकि थाटाचं गीत तो टाळतो,दृष्यभाषा हि जाणीवपूर्वक समजून वापरून ही आपल्याला हवा तो परिणाम साधताना दिसतो.
कथापटातील अभिनय हा सहजतेने प्रत्येक व्यक्तीरेखा साकारताना दिसतात.यातील डॉ.पुरुषोत्तम गायकवाड,(नंदू माधव)यांचा डॉक्टर यासम हा असाच, व्यक्तिरेखेतील दांभिकता,थंड मानसिकतेतून केलेलं आपल्या कृत्यांचं समर्थन,सहतेनं करताना दिसतात.आपण जे काही करतो हि जणू आणि कर्तव्याचा भाग असल्याचा आव......डॉ.आरती देशमुख,(मुक्ता बर्वे) ह्या व्यक्तीरेखेसाठि मुक्ता सोडुन दुसरा विचारच करवत नाही,तिचं कर्तव्यनिष्ठ असणं,तिचं ममत्व, धाडसीपणा,तडफ,अति अतिशय समजून केलेली व्यक्तीरेखा अभिनयातून समोर येते,यातील वार्ड बॉय मुन्ना (सुहास शिरसाट) आतापर्यंत  केवळ मालिका,सिरिज मध्ये पाहिला असेल.तो सुहास सहतेनं विसरायला लावणारा अभिनय, त्यांच क्रौर्य, विशिष्ट लयीतील संवाद, देहबोली यातून साकारलेला मुन्ना आत्ता पर्यंतची दमदार व्यक्तिरेखा असावी,संदिप पाठक(सिध्दराम), प्राजक्ता माळी(रिमा) ओंकार गोवर्धन (अर्जुन),रोहित कोकाटे (बशीर),काव्या  पाठक(प्रिया),प्रदिप भोसले (डॉ.विश्वास अग्निहोत्री).यासारख्या सगळ्या अभिनेत्यांनी उत्तम साथ दिलेली आहे.
      शीर्षकामधील 'वाय'हे अक्षर रक्ताळलेलं,त्याच्या मधोमध रक्ताने भरलेला स्कालपेल,हे प्रतिकात्मक तर ‘वाय’ हे नाव एक इंग्रजी शब्दात ‘वाय’ अर्थात्  मुलगी किंवा मुलगा होण्यासाठी पुरुषामधील ‘वाय किवा एक्स’हे दोनच ‘क्रोमोझोम्स’ कारणीभूत असतात, त्यामुळे ‘वाय’विषयी  हे सदर शीर्षकातून व्यक्त होते.कथापट आपल्याला एक गोष्ट सांगत नाही,तर एक वास्तव आणि त्यामधील दाहकता,समोर आणतं मुळात कथापट कुठेही उगाच प्रचारकी थाटाचं वक्तव्यं करीत नाही,तर ते दाखवताना नकळत अस्वस्थ करतं,आपल्य आपल्या समोर मन सुन्न करुन टाकणारा अनुभव आपल्याला देतो,यातील शेवटचा थरार,गर्भपात याची दृष्य,भावनिक  कोटगेपण,मन सुन्न  करणारा अनुभव कथापट देतो.आणि अस्वस्थ  करतो.
**************************************************************************************************
कथा,दिग्दर्शन:अजित सुर्यकांत वाडिकर.
पटकथा:अजित वाडिकर ,स्वप्नील सोजवाल.
छायांकन:राके राकेश  भिलारे.
ध्वनि:पियूष  शाह.
पार्श्वसंगीत:पराग  छाब्रा.
______________________________________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.