'संज्या छाया' नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग...
'जिगीषा' व 'अष्टविनायक' निर्मित, 'संज्या छाया' या नवीन नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग आज २७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात दुपारी चार वाजता रंगणार आहे. यावेळी 'संज्या छाया' या नाटकाच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. प्रशांत दळवी यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे.
यंदाचा 'मा. दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार या नाटकाला मिळाला आहे. आशय आणि विनोद यांचा अनोखा संगम असलेल्या या नाटकात 'संज्या-छाया' यांची अफलातून अशी जोडी आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनात आनंदी जगण्याचा मंत्र देणारे हे नाटक असून, हा संदेश हसतखेळत हे नाटक रसिकांपर्यंत पोहोचवत आहे.
चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल, सेलिब्रेशन अशा दर्जेदार नाटकांच्या लेखनाची परंपरा असलेले नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचे हे नवीन नाटक आहे. वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकात आहे. त्यांच्यासोबत सुनील अभ्यंकर, योगिनी चौक-बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.
Comments
Post a Comment