'संज्या छाया' नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग साजरा.....सोबत नाटकाच्या पुस्तकाचे हि प्रकाशन.....



       प्रशांत दळवी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'संज्या छाया' या नाटकाची सेंच्युरी मोठ्या उत्साहात रंगली. या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात रविवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नव्या पिढीचे नाटककार प्राजक्त देशमुख, नीरज शिरवईकर, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे व आदित्य मोडक यांच्या हस्ते 'संज्या छाया' या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.  

       नाटकाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नाटककार प्रशांत दळवी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्राजक्त, नीरज, स्वरा, कल्याणी व आदित्य या पाचही जणांची नाटके मी बघितलेली आहेत आणि त्यांच्या नाटकांनी मी प्रभावित झालेलो आहे. या पाचही जणांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पहिल्याच नाटकात षटकार मारलेला आहे. व्यावसायिक रंगभूमीसाठी आपल्याला लिहायचे आहे म्हणून त्यांनी कुठेही तडजोड वगैरे केलेली नाही. त्यांच्या प्रत्येक नाटकाला प्रेक्षक आणि समीक्षक यांच्या शाबासकीची थापही मिळाली आहे. पुरस्कारांची मोहोरही त्यांच्या नाटकांवर उमटलेली आहे. त्यांच्या प्रत्येक नाटकातला आशय, विषय आणि काळ हा वेगळा असला तरी त्याची संवेदना आधुनिक आहे आणि हे महत्त्वाचे आहे.    
       
       'जिगीषा' व 'अष्टविनायक' या नाट्यसंस्थांची निर्मिती असलेल्या, 'संज्या छाया' या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. वैभव मांगले व निर्मिती सावंत यांच्यासोबत सुनील अभ्यंकर, योगिनी चौक-बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर हे या नाटकाचे निर्माते असून, प्रणित बोडके हे सूत्रधार आहेत.  

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.