"शब्दप्रभू कीर्तनकारांविषयी निवेदनातून व्यक्त होणं ही एक पर्वणीच' दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांचेही जुळले सूर.....


 
१८ ऑक्टोबरच्या सायंकाळी झी टॉकीज वाहिनीतर्फे किर्तनकारांचा गौरव करण्यात आला. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा सायंकाळी ६ वाजता साजरा झाला. यावेळी महाराष्ट्रातील किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी सिनेमा क्षेत्रातील मान्यवर सुबोध भावे , हार्दिक जोशी , भाऊ कदम असे अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. हा सोहळा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा हो सोहळा प्रक्षेपित केला जाणार आहे ज्याचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. या सोहळयाचे निवेदन दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांनी केलं आहे. साहजिकच महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकारांच्या सन्मानार्थ आयोजित सोहळ्याची सूत्रं गुंफण्याचा आनंद आणि आव्हान पेलण्यात दीप्ती आणि क्षितीश यांनी बाजी मारली आहे.
झी टॉकीज वाहिनीवरील गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं नित्य निवेदन दीप्ती भागवत करतच असते पण ज्या मंचावर महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार एकत्र असणार आहेत, ज्यांच्या शब्दप्राविण्याने अख्खा महाराष्ट्र प्रभावित होत असतो त्या कीर्तनकारांसमोर निवेदनातून कार्यक्रमाची बांधणी करत असताना दीप्तीने अर्थातच खूप तयारी केली. दीप्तीला या सोहळयाच्या निवेदनासाठी साथ मिळाली ती अभिनेता क्षितीश दाते याची. निवेदक म्हणून एकमेकांशी समरस होत दीप्ती आणि क्षितीश यांनी या कार्यक्रमाच्या निवेदनाला श्रवणीय प्रवाही बनवले.
दीप्ती सांगते,  “एकतर रोजच्या एपिसोडचं निवेदन करणं आणि उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा या विशेष सोहळ्याचं निवेदन करणं यात नक्कीच फरक होता. मुळात कीर्तनकारांचा सन्मान असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. झी टॉकीजने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कीर्तन, प्रवचन म्हणजे धार्मिक कार्यक्रम हा समज असू शकतो. गावागावात किर्तनाचे कार्यक्रम होत असतात आणि कीर्तनकार त्यांच्या वाणीने श्रोत्यांना खिळवून ठेवत असतात. पण या कीर्तनातून समाजातील कितीतरी चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याचं काम केलं जात असतं. जागृती करण्यासाठी कीर्तनकार त्यांच्या कलेचा योग्य वापर करत असतात.  अशा कीर्तनकारांना एका मंचावर आणून त्यांचा सन्मान करणाऱ्या सोहळ्याचं निवेदन करताना मला खूप शिकायला मिळालं. फार मोठमोठे कीर्तनकार माझ्या समोर होते. एखादा छोटासा विचारही शब्द, उपमा यांच्या माध्यमातून मांडण्याची ताकद असलेल्या कीर्तनकारांविषयी बोलणं, कधी त्यांचा परिचय करून देणं तर कधी त्यांच्या कीर्तनशैलीचं विशेषत्व सांगणं ही माझ्यातील निवेदिकेसाठी खरोखरच एक पर्वणी होती.”
क्षितीश दाते आणि दीप्ती भागवत यांनी या सोहळ्याची सूत्रं खूप छान गुंफली आहेत. उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा या कार्यक्रमाच्या दोन बाजू आहेत. मंचावर महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचा गौरवही झाला आणि या निमित्ताने कीर्तनाचा उत्सवही झाला. शिवाय नंदेश उमप यांच्या गाण्यांची सुरेल साथ होती. अनेक कलाकारांनी त्यांची कला सादर केली. या सगळ्या सोहळयाला मनोरंजन आणि माहिती यांच्या धाग्यात गुंफणारी निवेदनशैली दीप्ती आणि क्षितीश यांनी अप्रतिम साकारली आहे.हा सोहळा  २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...