"गैरी" चित्रपटातील धमाल गाण्यावर कृतिका गायकवाडचे ठुमके.
कृतिका गायकवाड ही मराठमोळी अभिनेत्री आपल्या हटके स्टाइल आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते.
युवा डान्सिंग क्वीन’ फेम कृतिका आता "गैरी" चित्रपटातील आयटम सॉंग मध्ये झळकली आहे. 'तू छेडू नको, हा आयटम बॉम्ब' असे धमाकेदार शब्द असलेलं 'गैरी' चित्रपटातलं गाणं सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. अभिनेत्री कृतिका गायकवाडनं या गाण्यावर ठुमके लगावले असून या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.
युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या "गैरी" या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गाण्याला अमितराज यांचे संगीत असून वैशाली सामंत आणि अमितराज यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचे असून विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट "गैरी" या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अनेक चित्रपट, मालिकांतून ओळख मिळवलेल्या कृतिका गायकवाडच्या या चित्रपटातील गाण्यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. धमाल शब्द, नाचायला भाग पाडणारं संगीत यामुळे अल्पावधीतच या गाण्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
*Song Link*
https://youtu.be/ceIYlgmmays
खुप छान. I like this Movie.
उत्तर द्याहटवा