झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'ला पुरस्कार .
रांची येथे झालेल्या पाचव्या झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'चे निर्माता सुनील जैन यांना 'बेस्ट रिजनल फिल्म मेकर' या या पुरस्काराने गौरवण्यात आले. धोंडी आणि चंप्याची अनोखी प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्द्ल निर्माता सुनील जैन म्हणतात, '' हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आहे. पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे असणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. त्यामुळेच या पुरस्काराचे मानकरी होता आले. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. गावातील दोन मोठे प्रस्थ ज्यांच्यात वैमनस्य आहे आणि त्यांचेच पाळीव प्राणी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, हे प्रेम जुळवून आणताना या शत्रूंची मुलेही एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा काय धमाल होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही संकल्पना मला विशेष आवडली. मला आनंद आहे, की आमच्या कामाचे चीज झाले.
रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
Comments
Post a Comment