ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला...’चा टिझर रिलीज.


‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडेच रंगात असताना, प्रेक्षकांना प्रतिक्षा होती, ती म्हणजे टिझरची! त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आज टिझर रिलीज झालाय आणि तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाचा विषय काय असेल, ओंकार आणि ईशा कोणत्या रूपात आपल्याला बघायला मिळतील याची प्रेक्षक वाट बघत होते, आज ती प्रतिक्षा संपली आहे.

पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचं नवीनच लग्न झालंय. आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. अशात गरीब घरातला आणि पत्त्यांचा नाद असलेला भिका थेट बायकोलाच म्हणजे, सरलाला पत्त्याच्या डावावर लावणार का, अन् पुढे काय गेम सुरू होणार... हे बघण्यासाठी थिएटरातच जावं लागेल!

टिझरमध्ये कलाकारांची मोठी फौज दिसतेय कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप हे कलाकार टिझरमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं टिझरवरून दिसतंय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टिझरमधले संवाद आणि पार्श्वसंगीत हे अत्यंत आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट ‘पॉवर पॅक्ड’ असा चित्रपट असेल असं टिझरवरून वाटतंय.

सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.  

टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.youtube.com/watch?v=HaOVsjXJYzY

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.