◽ सुमित्रा भावे एक समांतर प्रवास या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन.
१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात माहिती पटाद्वारे चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या आठवणींना दिला उजाळा.
निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांच्या 'सुमित्रा भावे एक समांतर प्रवास' या माहितीपटाचं प्रदर्शन १९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात करण्यात आले.
या माहितीपटात आंतरराष्ट्रीय कीर्ती च्या चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो.
दिग्दर्शनामधल्या बारीक सारीक महत्त्वाच्या गोष्टी, अभ्यास आणि त्यांच्या चित्रपट विषयक जाणिवांचे दर्शन आपल्याला या माहिती पटाद्वारे नव्याने उलगडताना दिसून येतात.
सुमित्रा भावे यांच्या समांतर चित्रपट चळवळीतील प्रयत्नांची साक्ष हा माहितीपट आपल्याला नक्कीच देतो. त्यांची शिस्त आणि इतरांना दिलेल्या शिकवणींचा परिणामकारी सकारात्मक प्रभाव नेहमीच त्याचे सहकारी आणि विद्यार्थांमधे दिसून येतो. सुमित्रा भावे यांच्या मराठी कलाकृतींचे कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, चित्रपट अभ्यासक आणि समीक्षक प्रा. एन. मनू चक्रवर्ती यांच्यासह अनेकांनी केलेले विश्लेषण या माहितीपटात आपल्याला ऐकायला मिळते.२०२० साली डॉ. संतोष पाठारे यांनी या माहितीपटाची कल्पना मांडली. सुमित्रा भावे यांच्या समवेत या विषयावर चर्चा करून फेब्रुवारी २०२१ मधे या माहतीपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या माहितीपटाची निवड विविध महोत्सवांमधे करण्यात आली आहे.चित्रपट क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या आणि या माध्यमा चा अभ्यास करू पाहणाऱ्या प्रत्येकास हा माहितीपट नवी दृष्टी देणार आहे.
Comments
Post a Comment