वास्तवाची दाहकता सांगणारा सिनेमा ‘हेल्लारो’ आशियायी चित्रपट महोत्सवात .



१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात दरवर्षी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आणि भाषांमधील उत्तम दर्जाचे चित्रपट रसिकांना पाहण्यासाठी निवडले जातात. यंदाच्या ५ गुजराती चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या मधे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेली  अभिषेक शाह दिग्दर्शित 'हेल्लारो' चा समावेश आहे. तसेच 'धाड' (दिग्दर्शक - परेश नाईक), 'रेवा' (दिग्दर्शक - राहूल भोले व विनीत कनोजिया), २१ एम यु टिफीन (दिग्दर्शक - विजयगीरी बावा) या चित्रपटांचा  आणि 'आ छे मारू गाम' ( दिग्दर्शक - गोपी देसाई) या लघुपटाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे._

'हेल्लारो' हा सिनेमा स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपणाची गोष्ट सांगतो. ‘हेल्लारो’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘मोठी लाट’ असा होतो. १९७५ सालच्या कच्छ भागातील समरपुरा नावाच्या गावाची ही गोष्ट आहे. वाळवंटातल्या या छोट्या वस्तीतल्या स्त्रियांच्या आंतरिक घुसमटीमागचं कारण अर्थातच पुरुषसत्ताक मानसिकता आहे. या काळात देवी म्हणून स्त्रीची पूजा करणाऱ्या पुरुषांची तथाकथित मर्दानगी मात्र स्त्रियांवर अत्याचार करण्यात धन्यता मानणारी आहे.

या महोत्सवात विविध राज्यांतील आणि भाषांमधील चित्रपटांसोबतच पाच गुजराती चित्रपटांची निवड  करण्यात आलेली आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...