'अद्वैत थिएटर्स'च्या पंचविसाव्या नाट्यकृतीचा पंचविस डिसेंबरला शुभारंभ..... 'थँक्स डियर' रंगभूमीवर...





       वर्षभर ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहाय्य केले असेल, त्यांना 'थँक्स डियर' म्हणत वर्षअखेरीस आभार मानले जातात. हेच 'थँक्स डियर' आता वेगळ्या रूपात रंगभूमीवर अवतरत आहे. मोरया थिएटर्स, अद्वैत थिएटर्स व सर्वस्य प्रॉडक्शन या नाट्यसंस्थांचे निर्माते भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे व श्रद्धा हांडे यांनी संयुक्तरित्या या नाटकाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत लोकप्रिय नाट्यकृती रंगभूमीवर आणणाऱ्या 'अद्वैत थिएटर्स'चे हे २५ वे नाटक आहे; तर अभिनेत्री श्रद्धा हांडेने या नाटकाद्वारे नाट्यनिर्मितीत पदार्पण केले आहे. 

       २५ डिसेंबर रोजी 'थँक्स डियर' या नाटकाचा पुण्यात शुभारंभ होत असून, ३१ डिसेंबरला मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन निखिल रत्नपारखी व तुषार गवारे यांनी केले आहे. निखिल रत्नपारखी व हेमांगी कवी हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. श्रद्धा हांडे यांची वेशभूषा, उलेश खंदारे यांची रंगभूषा व गंधार यांचे संगीत, अशी टीम या नाटकाला लाभली आहे. भैरवनाथ शेरखाने हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने रसिकांचा 'इयर एन्ड' नक्कीच आनंदात साजरा होणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.