भद्रकाली प्रॉडक्शन्सची ५८ वी नाट्यकृती "देवमाणूस" माणूस होण्याची गोष्ट...





२६ डिसेंबर २०२२ रोजी मराठी रंगभूमीवर हे नाटक दाखल झाले. प्रथमच मराठी रंगभूमीवर आंतरराष्ट्रीय  विषयावर आलेल्या या नाटकाचे मायबाप रसिक प्रेक्षक, समीक्षक या सर्वांकडून कौतुक होत आहे. या आधी भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेले ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून प्राजक्त देशमुख (लेखक-दिग्दर्शक), आनंद ओक (संगीत दिग्दर्शक), प्रफुल्ल दीक्षित (प्रकाशयोजनाकार) आणि शुभांगी सदावर्ते (अभिनेत्री) यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. त्याचप्रमाणे ‘देवमाणूस’  या नाटकातून शंतनू चंद्रात्रे (लेखक), जयेश आपटे (दिग्दर्शक), शुभम जोशी, सायली सावरकर (संगीत), अपूर्वा शौचे (वेशभूषा) तसेच कलाकार श्रीपाद देशपांडे, प्रणव प्रभाकर, दुर्गेश बुधकर, आशिष चंद्रचूड, शर्वरी पेठकर, ऋतुजा पाठक यांचे देखील व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. अशा या नाटकाचा २५ वा प्रयोग उद्या रवि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर होणार आहे

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.