रंगभूमी आपली आहे, त्यामुळे पॅनल 'आपलं पॅनल'
गेली पाच वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही नाट्य विषयक हालचालींपेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली. म्हणजे नाट्य विषयक घडामोडी झाल्या नाहीत असे आहे कां? तर तसे नाही.. रंगभूमीच्या विकासासाठी अनेक कामं या पाच वर्षात झाली. पण इतकां स्वच्छ आणि निर्भेळ कारभार काहींना सहन न झाल्याने वैयक्तिक आकासापोटी जाणीवपूर्वक काहींना हाताशी धरून दिशाभूल करण्यात आली.
अनेकांनी आम्ही नाट्य परिषद सोडून पळून जाऊ असा जाहीर दावा केला होता. पण आम्ही कुठेही गेलो नाही किंवा पदावरून मागे झालो नाही. कारण केलेल्या सर्व कामांची आम्ही जबाबदारी घेतली आणि सामोरेही गेलो. कारण, सरते शेवटी 'कर नाही त्याला डर कशाला'. आम्ही तुमचे आपले आहोत.. तुम्ही आम्हाला आपलं मानलं म्हणून हे करणं शक्य झालं.
म्हणूनच रंगभूमीचा सर्वांगिक विकास करण्यासाठी, कलाकर - रंगमंच कामगार – निर्माते - लेखक – दिग्दर्शक – हौशी - प्रायोगिक आणि रसिकमायबाप यांच्यातील आपला दुवा होण्यासाठी आम्ही आपल्या माणसांचं *‘आपलं पॅनल’* घेऊन पुन्हा एकदा नाट्य परिषदेच्या निवडणुकीत उभे ठाकलो आहोत.
*‘आपलं पॅनल’ विषयी..*
नाटक ज्यांचा प्राण, अशा रंगकर्मींचे स्वतःचे प्रतिनिधित्व करणारे 'सच्चे रंगकर्मी कार्यकर्ते' 'आपल पॅनल" मधून २०२३ ते २०२८ या वर्षांसाठी पंचवार्षिक निवडणूक लढवीत आहॆत. लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, रंगमंच कामगार, व्यवस्थापक, कलाकार, निर्माते या सर्वांना या पॅनलमधून प्रतिनिधित्व देण्यात आले असून ते एकत्रितपणे पुन्हा उभे आहेत.
*मागील २०१८ - २३ या पंचवार्षिक काळात परिषदेच्या माध्यमातून ‘आपलं पॅनल’ने केलेली ठोस कामे..*
१. नाट्य संमेलन कसे असावे याचा उत्तम दाखला आपण ९८ व्या नाट्य संमेलनाद्वारे दिला. साचेबद्ध संमेलनाची चौकट बदलून ६० तासांचे विक्रमी नाट्य संमेलन आपण आयोजित केले. ज्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने पुस्तिका काढून घेतली.
२. श्री.दामू केंकरे, श्रीमती सुधा करमरकर आणि श्री.विजय तेंडूलकर यांच्या छायाचित्रांचे यशवंत नाट्य संकुल येथे अनावरण केले.
३. नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी गो. ब. देवल स्मृतिदिनी आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा अद्वितीय स्वरुपात साजरा केला.
४. त्यानंतर आठ महिन्यातच ९९ वे नाट्य संमेलन नागपूर येथे आयोजित केले.
५. शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या. तसेच नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती कीर्ती शिलेदार आणि श्री प्रेमानंद गज्वी यांनी एकूण १२ कार्यशाळा राज्यभरात घेतल्या.
६. १०० वे नाट्य संमेलन महाराष्ट्रव्यापी आणि ऐतिहासिक करण्यासाठी ‘शहराकडून गावाकडे नाटक’ हि संकल्पना योजून संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण न्यासाचे तहहयात विश्वस्त मा. शरदचंद्रजी पवार आणि ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आमच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने २०२०-२१ च्या बजेटमध्ये १०० व्या नाट्य संमेलनासाठी १० कोटी रुपये निधी देण्याचे मंजूर केले होते. परंतु करोनाच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आले.
७. यशवंत नाट्यमंदिर येथे व्यावसायिक, हौशी-प्रायोगिक, बालनाट्य विभागासाठी अनुक्रमे रुपये ५०००/- २०००/- १०००/- असे भाडे आकारून प्रोत्साहन दिले त्यामुळे नाट्यसंकुलाच्या क्षमतेचा वापर ३५% वरुन ९०% पर्यंत झाला. परिणामी परिषदेच्या उत्पन्नात वाढ झाली.
८. महाराष्ट्र राज्यातील नाट्य गृहाबाबत रिपेअर व मेंटेनन्स फंड स्थापन करावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा २०२०पासून केला होता. या मागणीची दखल घेत या वर्षीच्या अर्थ संकल्पात नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी ५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.
९. तब्बल १५ वर्षानंतर विश्वस्तांच्या तीन बैठका तहहयात विश्वस्त शरदचंद्रजी पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
*करोना काळातील कार्य..*
• करोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे रंगकर्मींच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी त्यांच्याब पाठीशी भक्कमपणे उभे राहून रसिक मायबापांना मदतीचे आवाहन करण्यात आले.
• अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या आपत्कालीन निधी वरील व्याज, नाट्यकर्मी मदतनिधी आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण ८८२ रंगकर्मींना आर्थिक – शैक्षणिक मदत आणि अन्नधान्य किट देण्यात आले.
• करोना काळात मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या नाट्यगृहांचे भाडे ७५ टक्के सवलतीच्या दारात ३१ मार्च २०२३ पर्यंत नाट्य प्रयोगांना उपलब्ध करून देण्यात आले. तसेच मुंबईबाहेर नाटक पोहोचावे यासाठी शासनाकडून नाटकांच्या बसेससाठी टोल माफी करून देण्यात आली.
• सामाजिक संस्थांच्या सहकार्याने रंगकर्मींचे लसीकरण करण्यात आले.
• तत्कालीन शासनासोबत चर्चा व पत्रव्यवहार करून नाट्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.
*आगामी 2023-2028 या कार्यकाळातील उद्दिष्ट आणि कार्य*
१. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शासन, नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील सर्व नाटयगृहांचे अद्ययावतीकरण करणे.
२. प्रायोगिक/ हौशी रंगमंच संघटनेच्या माध्यमातून प्रायोगिक नाट्यकर्मींना बळ देणे. यासाठी बुधवार योजना सुरु करणे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहांमध्ये दर बुधवारी संपूर्ण दिवस हा हौशी, प्रायोगिक आणि बालरंगभूमीसाठी राखीव ठेवून त्यांना तो नाममात्र दरात उपलब्ध करून देणे.
३. गडकरी रंगायतन ठाणे’च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व नाट्यगृह अथवा जिल्हास्तरावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखांच्या कार्यालयासाठी ५०० चौरस फुटाची जागा उलपब्ध करून देण्यात यावी तसेच स्थानिक हौशी नाट्य संस्थांना नाटकांच्या तालमी व प्रशिक्षण शिबिरासाठी १००० चौरस फुटाचा हॉल कायम स्वरूपी नाममात्र दरात उपलब्ध करून देणे.
४. राज्य नाट्य स्पर्धा सहभागी संस्थांना नाट्य सादरीकरणासाठी दिले जाणारे अनुदान रुपये ६००० वरून रुपये १५००० करण्यासाठी व सादरीकरणानंतर पुढील सात दिवसात आरटीजीएस स्वरुपात तो रंगकर्मींनां मिळावा यासाठी प्रयत्नशील.
५. महाराष्ट्रातील कार्यरत व्यावसायिक नाट्य संस्थांसाठी प्रत्येकी ५ लाखांचे आणि कार्यरत हौशी नाट्य संस्थासाठी प्रत्येकी २ लाखांचे अनुदान मिळण्यासाठी प्रयत्नशील.
६. संगीत व चित्रकला विषयाच्या धर्तीवर शालेय स्तरावर नाट्यशास्त्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत आग्रही.
७. बालनाट्य चळवळ बळकट करण्यासाठी छोटी छोटी रंगमंदिरे विभागा - विभागात, सरकारी शाळा व नगरपालिकांच्या शाळांमधून निर्माण करून, त्या त्या विभागातील रंगकर्मींनी त्याची देखभाल करणे.
८. नाटक हा व्यवसाय आहे याचे भान ठेऊन नाटक व्यवसायाला दर्जा मिळवून देण्यासाठी प्रारूप तयार करणे, जेणे करून आपत्ती काळात त्याला योग्य पद्धतीने मदत होऊ शकेल.
९. रंगकर्मींसाठी स्वतःची पतपेढी निर्माण करून, व्यक्तिगत मदतीसाठी वा स्वबचतीने स्वतःची मदत होऊ शकेल अशी योजना.
१०. हौशी रंगभूमीचा आत्मा, म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा, त्यामध्ये आमुलाग्र बदल व्हावा यासाठी भरीव योजना करणे.
१२. नाटक विषयक (एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा कोणत्याही स्वरूपातील) कार्यासाठी महाराष्ट्रात परिषदेच्या माध्यमातून/ परवानगीने आयोजन करणे (मातृसंस्था म्हणून बंधनकारक करणे) (जसे खेळांच्या बाबतीत केले जाते)
*काही महत्वाच्या योजनांसाठी पुढाकार...*
• महाराष्ट्र शासनाच्यावतीने रंगमंच कामगारांना मराठी नाटकाचे सामान ठेवण्यासाठी अंदाजे 10 हजार स्क्वेअर फूट जागेची आवष्यकता आहे. तरी ‘अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे’च्या अंतर्गत उपरोक्त जागा नाममात्र दराने बी.पी.टी. वडाळा, मुंबई येथे उपलब्धता करुन देणे आणि त्यामध्ये मराठी नाटकांच्या सामानाचे टेम्पो व बसेस यांना पार्किंगसाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध करुन देणे.
• संकटकाळात नाटय संस्थेत काम करणाऱ्या रंगमंच कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मनोरंजन क्षेत्रातील कार्यरत काॅर्पोरेट कंपन्यांच्या (CSR) फंडातर्फे जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देणे.
• महाराष्ट्रातील 91 नाटयगृहांची दुरुस्ती देखभाल व नवीन नाटयगृहांसदर्भात धोरण ठरविण्यासाठी नाटय परिषद व शासन स्तरावर संयुक्त समिती स्थापन व्हावी, या समितीमध्ये मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. नगरविकास, मा. सांस्कृतिक मंत्री व संबंधित विभागांचे सचिव व नाटय परिषद नियुक्त प्रतिनिधी यांचा समावेष करणे.
• महाराष्ट्र राज्यात कुठेही नवीन नाटयगृह उभारणी अथवा नाटयगृह दुरुस्ती करायची असल्यास ज्याप्रमाणे महानगरपालिका/ नगरपरिषद यांची पूर्वपरवानगी अनिवार्य असते, तसेच या नाट्य परिषदेची संमतीही अनिवार्य असावी, जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या चूका टाळता येतील. पर्यायाने नंतर दुरुस्तीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल.
• भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व आर.बी.आय.तर्फे नाट्य क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या प्राधान्य क्षेत्रात समाविष्ट झाल्यास नाट्य क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेला १८ टक्के कर (GST) ५ टक्क्यांवर येईल, ज्याचा मायबाप रसिक आणि रंगभूमीला फायदा होईल.
• ‘अखिल भारतीय मराठी नाटय परिशद’ गेली 117 वर्षे कार्यरत असून ती मराठी रंगभूमीची मातृसंस्था आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एनएसडी व संगीत नाटक अकादमी इत्यादी सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांना वार्षिक अनुदान प्राप्त होते. त्याच धर्तीवर ‘अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेलाही अनुदान मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
• महाराष्ट्र शासनाच्या ‘दादासाहेब फाळके नाटय चित्रनगरी’ (फिल्मसिटी गोरेगाव), असे नाव जरी असले, तरी ‘दादासाहेब फाळके नाटय चित्रनगरी’ (फिल्मसिटी गोरेगाव) येथे आजतागायत नाटयक्षेत्र दुर्लक्षित राहिले आहे. म्हणून तातडीने तिथे नाट्य परिषदेसाठी येथे भूखंड देण्यात यावा, यासाठी प्रयत्नशील.
• वृद्ध अपंग कलाकारांसाठी देण्यात येणाऱ्या शासनाच्या पेन्शन योजनेत ‘रंगमंच कामगारां’चा समावेश करावा. तसेच ‘अखिल भारतीय मराठी नाटय परिषद मध्यवर्तीकडून सूचित केलेल्या नावांचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने ही योजना प्राधान्याने लागू करावी. वयोवृद्ध व अपंग कलावंत (100) मानधन योजनेअंतर्गत जिल्हानिहाय किमान 25 रंगमंच कामगारांकरिता आरक्षित असावा, यासाठी प्रयत्नशील.
*नवे नाट्य संकुल कसे असेल?*
• करोना काळामध्ये यशवंत नाट्य संकुलाला फायर एनोसी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे यशवंत नाट्यसंकुलाची नव्याने अद्ययावत सुविधांसह उभारणी करणे.
• अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी यशवंत नाट्य संकुलाच्या नव्या इमारतीत जवळपास सव्वा लाख फुटाचे बांधकाम.
• तीन अत्याधुनिक आणि अद्ययावत नाट्यगृहांची उभारणी (अनुक्रमे आसनव्यवस्था ८००, २७५, १२५)
• मराठी रंगभूमीचा अभिजात वारसा जपणारे संग्रहालय आणि ग्रंथालय
• परिषदेसह आठ घटक संस्थाची कार्यालये
• तालमींसाठी सुसज्ज सभागृह
• नाट्य विषयक विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी कॅफे कट्टाची निर्मिती
• रंगकर्मीसाठी अल्पदरात निवास व्यवस्था
• नाट्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नाट्य प्रयोगशाळा सुरु करणे.
*मुंबई (मध्यवर्ती) उमेदवार*
१. नवनाथ (प्रसाद) कांबळी
२. सुकन्या कुलकर्णी - मोने
३. मंगेश कदम
४. राजन भिसे
५. प्रमोद पवार
६. संतोष काणेकर
७. रत्नकांत जगताप
८. सुनील देवळेकर
९. अनिल कदम
१०. प्रभाकर वारसे
*मुंबई उपनगर उमेदवार*
१. दिगंबर प्रभू
२. अविनाश नारकर
३. अशोक नारकर
४. ऐश्वर्या नारकर
मतदान - रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३०
Comments
Post a Comment