अवधूत गुप्ते यांचं रॅप शैलीतलं गाणं....





हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं वाजवायची सणकन हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. रॅप शैलीचं हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे लिहिले आहे. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत सर्किट या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे.  तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

पटकन संतापणाऱ्या तरुणाची गोष्ट 'सर्किट' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुऴे या भूमिकेला साजेसं असं 'वाजवायची सणकन' हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केलेल्या आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजातील "काहीसा बावरतो, काहीसा सावरतो' या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. त्यामुळे आता  रफटफ आणि अॅक्शनपॅक्ड असं  'वाजवायची सणकन' हे गाणंही प्रेक्षकांची दाद मिळवेल यात शंका नाही.

Song Link 

https://youtu.be/vC9oGeDEDD0



Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.