'बधाई दो' मधील अपेक्षा पोरवाल उर्फ कोमल हिने तिच्या टीमच केल कौतुक !



नुकतेच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ ने फिल्मफेअर मध्ये  अनेक पुरस्कार पटकावले.चित्रपटातील कोमल, सुमीचे (भूमी पेडणेकर) पहिले प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणारी अपेक्षा पोरवाल हिने संपूर्ण टीमचे अभिनंदन करून एक खास मेसेज शेअर केला.      अभिनेत्री म्हणते, " फिल्मफेअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल टीम बधाई दोचे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी खूप आभारी आहे, हा एक संदेश देऊन जाणारा चित्रपट आहे जो  LGBTQI ची एक सुंदर कथा मांडतो "     ती पुढे पुढे म्हणते, "समलिंगी विवाह विधेयकावर SC मध्ये सध्या सुरू असलेले खटले पाहता, मला आशा आहे की हा चित्रपट नक्कीच समीक्षकांना सोबत प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी छान संदेश देऊन जातो.
      अपेक्षा पोरवाल सध्या स्लेव्ह मार्केट या इंग्रजी-अरबी वेब सीरिजचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय म्हणून परदेशात चर्चेत आहे. ती सध्या स्लेव्ह मार्केटच्या पुढच्या सीझनवर आणि इतर अनेक प्रोजेक्ट्सवर बॅक टू बॅक काम करत आहे आणि प्रेक्षकांना लवकरच अपेक्षा कडून काहीतरी उत्तम बघायला मिळणार यात शंका नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...