'आदिपुरुष' च्या टीमने पूर्ण गाणं आणलं प्रेक्षकांच्या भेटीला...
आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' या गाण्याने केवळ भारतीयांना नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावले आहे! हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड यासह अनेक भाषांमध्ये टीझर रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक आतुरतेने पूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहू लागले . अजय-अतुल या जगप्रसिद्ध मराठमोळ्या जोडीने संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुनताशीर यांच्या दमदार गीतांचे वैशिष्ट्य असलेले, हे विलक्षण गाणे प्रभू श्रीराम यांच्या सामर्थ्याला आदरांजली अर्पण करते.
ग्रीपिंग व्हिज्युअल्स आणि अजय-अतुल या संगीतकार जोडीने ३०पेक्षा अधिक गायक गायकांच्या सोबतीने हे गाणे सादर केले. नाशिक ढोलांपासून ते ‘जय श्री राम’च्या गजरापर्यंत, अशा प्रकारचा हा एक मोहक आणि आगळावेगळा अनुभव होता. एका तल्लीन करणाऱ्या अनुभवाद्वारे हे गाणे भव्य पद्धतीने लाँच करण्यात आले.
मराठमोळ्या ओम राऊतने दिग्दर्शित केलेला आणि भूषण कुमार निर्मित, आदिपुरुष हा एक सिनेमॅटिक अनुभवाचा उत्कृष्ट नमुना आहे जो प्रभास, सैफ अली खान, क्रिती सॅनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्यासह अनेक उत्कृष्ट कलाकारांना एकत्र आणतो. मंत्रमुग्ध करणारी चाल, चित्तथरारक व्हिज्युअल आणि प्रभावी कथाकथनाने, 'जय श्री राम' हे फक्त गाणं न राहता ते आरतीच्या स्वरूपात प्रत्येक भारतीयाच्या मनात बसणार हे नक्की.
प्रभु श्रीरामाचे खरे सार आणि वैभव दाखवून देणारे, प्रभु श्रीरामाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारे, ‘जय श्री राम’ हे गाणे श्रोत्यांना नक्कीच आश्चर्यचकित करेल. या गाण्याच्या संगीतातून निर्माण होणारी उर्जा, मनाला भिडणारे शब्द आणि संगीतरचना, अंगावर काटा उभे करणारे स्वर असे हे गाणे भारतीय सिनेसृष्टीसाठी एक सांस्कृतिक घटना आहे. करोडो भारतीयांसाठी हे गाणे प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
आदिपुरुष, ओम राऊत दिग्दर्शित टी-सीरीज, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी निर्मित केला आहे आणि १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment