"ढ लेकाचा" चित्रपटातील आयुष उलागड्डेला अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोकृष्ट बालकलाकार पुरस्कार जाहीर.


 

नुकताच पार पडलेल्या अंबर भरारीडॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित व्या अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल महोत्सवात अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट निर्मित ढ लेकाचा  या चित्रपटातील आयुष उलागड्डेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे. हृदयस्पर्शी अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडण्यासाठी लवकरच हा चित्रपट अल्ट्रा झकास”  मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

     "ढ लेकाचा" या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो.

 भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण करण्यात आले आहे.

 ढ लेकाचा” चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वनी यातून पाहायला मिळणार आहे. अंबरनाथ फिल्म फेस्टिवलने नुकतच "ढ लेकाचा" चित्रपटामधील बालकलाकार आयुष उलागड्डेच्या उत्तम कामगिरीची ओळख प्रेक्षकांना पुरस्कारामार्फत करून दिली आहे.

 दर्जेदार आणि उत्तम कथा यासारख्या वेगवेगळ्या पठडीतले  आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटमार्फत ढ लेकाचा सारख्या अपवादात्मक मराठी चित्रपटाची जादू आणि भावना प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येतील.

 निर्माते आणि दिग्दर्शक यांनी कलाकारांच्या उत्तम कौशल्याने चित्रपटाची कथा पडद्यावर जिवंत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संबंधित पात्रेआकर्षक कथा आणि हृदयस्पर्शी कामगिरीमुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी पाहिलाच पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.