"तूच मोरया" च्या निमित्ताने अभिनेता विशाल फाले आणि कोकणहार्टेड गर्ल अंकिता आणि एकत्र..



      देवाचं अस्तित्व हे चराचरात आहे, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या सोबत असतोच, बऱ्याच वेळेस संकटांची मालिका आपल्याला सतावत असते, अशा वेळेस आपले विचार नकारात्मक पारड्यात जास्त झुकतात, पण प्रत्येक वेळेस एक नैसर्गिक शक्ती आपल्या सोबत असते जी या ना त्या स्वरूपात आपल्यासोबत उभी राहते, ती शक्ती म्हणजे आपण मानलेला “तूच मोरया” 
     दादर अभिमान गीताच्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दूसरा म्युझिक व्हिडीओ  "तूच मोरया" हा नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. विशालचे हे ४० वे गाणं आहे तर आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकरचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाले ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
        एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा अनोख्या पद्धतीने साक्षात्कार होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण देऊन जातो. अशी या गीताची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले. प्रणिल आर्ट्स ह्या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर ह्यांनी एक हाती बजावली आहे.
 सध्या सोशल मिडीयावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे.

*Song Link*

https://youtu.be/OntL8ZM14tQ


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...