विनोदवीर दादांच्या या सिनेमातील लावणी आणि भजन ४५ वर्षानंतरही घालते रसिकांना भुरळ.


     निखळ मनोरंजन, साधी कथा, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांवर बेतलेले सिनेमातील सीन यांची भट्टी जमवणारे रसायन म्हणजे विनोदवीर दादा कोंडके. दादा कोंडके यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची पर्वणी घर बसल्या पाहता यावी यासाठी झी टॉकीज या वाहिनीने विडा उचलला आहे. दादा कोंडके यांचे सुपर डुपर हिट सिनेमे झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत . याच मालिकेत दादा कोंडके यांच्या तुफान गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'तुमचं आमचं जमलं' हा सिनेमा रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दादा कोंडके प्रेमी रसिकांना 'तुमचं आमचं जमलं' या सिनेमाचा आस्वाद घर बसल्या घेता येणार आहे. 
 
      झी टॉकीज नेहमीच चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत असते . आजवर अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांना दिली आहे. मराठी सिनेमाला मिळालेला अस्सल मातीतला नायक म्हणजे दादा कोंडके . एकीकडे ऐतिहासिक चित्रपट आणि तमाशा प्रधान चित्रपट लोकप्रिय होत असताना दादा कोंडके ह्यांनी आपल्या हटके विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. दादा कोंडके ह्यांचा तो काळ झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी पुन्हा आणला आहे. दादा कोंडके यांचा सिनेमा हा नेहमीच इतिहास रचणारा सिनेमा म्हणून प्रसिद्ध आहे . किमान २५ आठवडे हाऊसफुल गर्दी हे दादा कोंडके यांच्या सिनेमांचं समीकरण ठरलेलं . दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटलं की फक्त मराठीतीलच नव्हे तर राजकपूर, देव आनंद यासारख्या बॉलीवूड मधल्या तगड्या निर्मात्यांनाही घाम फुटायचा . 
      दादा कोंडके यांच्या सिनेमातील विनोद, गाणी, संवाद सगळंच हटके असायचं . 'तुमचं आमचं जमलं' या सिनेमातील 'अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान' हे भजन आज ४५ वर्षानंतरही लोकांच्या मुखात आहे. हे या सिनेमाचं यश म्हणता येईल. 'झाल्या तिन्ही सांजा, करून शिणगार सांजा, वाट पाहते मी गं येणार साजन माझा' ही लावणी 'तुमचं आमचं जमलं' या सिनेमात नायिका अंजना मुमताज आणि नायक दादा कोंडके यांच्यावर चित्रित झाली . अतिशय सात्विक आणि सोज्वळ शब्दरचना असलेली ही लावणी आजही तितक्याच उत्साहाने ऐकली जाते. दादांनी ‘तुमचं आमचं जमलं’ या सिनेमात अतिशय सुंदर भजन आणि दर्जेदार लावणीची रचना करून हा सिनेमा हिट करून दाखवला. 
      'तुमचं आमचं जमलं' हा सिनेमा दादा कोंडके यांनीच दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे . एक चांगला आणि एक वाईट भाऊ आणि त्यांची कथा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळते . वाघ्या कुत्र्याच्या सोबत सिनेमाचा नायक कृष्णा कशा पद्धतीने समाजातील चुकीच्या गोष्टी उजेडात आणतो अशी ही कथा आहे . या सिनेमात अशोक सराफ यांचीही विशेष भूमिका आहे . झी टॉकीजवर ‘तुमचं आमचं जमलं’ हा सिनेमा पाहण्याची संधी येत्या रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.