'निळावंती' ती येतिय........उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित.





चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात.  आता 'निळावंती' चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक  चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय... या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा  प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे. 

 'निळावंती' हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित  आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून 'निळावंती' राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.  

लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना `निळावंती` ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...