इंदुरीकर महाराजांच्या किर्तन रंगी रंगणार झी टॉकीजचे प्रेक्षक.
महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक परंपरांपैकी एक आहे ती कीर्तनाची परंपरा. समाजप्रबोधनाची कोणतीही माध्यमं नव्हती तेव्हापासून लोकजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तनकारांची ओळख आहे. आजच्या जगातही कीर्तनातून समाजातील अनेक घडामोडींवर भाष्य करत कीर्तनकार समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करत आहेत. कीर्तनाचे हेच रंग झी टॉकीज या वाहिनीने प्रेक्षकांसाठी घरबसल्या अनुभवण्यासाठी आणले आहेत. झी टॉकीज नेहमीच परंपरा आणि मनोरंजन यांचा मेळ साधत असते. कीर्तन परंपरेचा वारसा जपणाऱ्या कीर्तनकारांना व्यासपीठ देण्यासाठी झी टॉकीजवर नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम सादर केला जातो. याच कार्यक्रमात रविवार दि. २६ नोव्हेंबरला प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराज त्यांच्या खास शैलीतून प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीजवर नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम सादर होणार आहे. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. महाराष्ट्रात खूप मोठी संत परंपरा स आहे .वारकरी संप्रदायाची पंढरी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. संत साहित्य, प्रवचन ,कीर्तन यामधून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांचा वारसा आजही समर्थपणे चालवला जातो. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे यापैकीच एक महत्त्वाचं नाव. इंदुरीकर महाराज त्यांच्या शैलीने आणि मिश्किल सादरीकरणाने श्रोत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी अनेक श्रोत्यांचे कान आतुर झालेले असतात. इंदुरीकर महाराजांच्या कार्य बाहुल्यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्याची संधी अनेक प्रेक्षकांच्या हातातून निसटून जाते पण आता हीच संधी झी टॉकीज ने सर्व प्रेक्षकांना घरबसल्या दिली आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा आस्वाद आता झी टॉकीज च्या प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे येणार आहे. कधी कोपरखळी मारत, विनोदाची पेरणी करत तर कधी चिमटे घेत इंदुरीकर महाराज कीर्तनातून आयुष्यातील, रोजच्या जगण्यातील, अनुभवांतील अशा काही गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात की ऐकणारी व्यक्ती हसता हसता अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. इंदुरीकर महाराज यांची समाजातील घडामोडींवर भाष्य करणारे परखड कीर्तनकार अशी ओळख तर आहेच पण त्याचबरोबर इंदुरीकर महाराज कीर्तनासोबत त्यांच्या गावात एक असं काम करतात की ते ऐकून त्यांच्याविषयी आदर अधिकच वाढतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा