जागतिक रंगकर्मी दिवसा निमित्त रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या "मराठी नाट्य कलाकार संघाच्या" वतीने नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून "२५ नोव्हेंबर" हा दिवस "जागतिक रंगकर्मी दिवस" म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त रंगभूमीवर अनमोल कार्य करणाऱ्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्यात येतो, यंदा सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोरे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, सदर सोहळा माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर येथे नाटय रसिकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला,
याप्रसंगी शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, शिवसेना विभागप्रमुख गिरीश धानोरकर तसेच सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले, अजित भुरे, ज्ञानेश पेंढारकर, मुकुंद मराठे आणि निर्माता यतिन जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी नाटय क्षेत्रात मोलाचं योगदान असणाऱ्या पण आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या काही रंगकर्मींना रु.२५ हजार आर्थिक सहाय्य केले जाते, यंदा रोहिदास पांगे ह्या रंगकर्मींला त्याचा लाभ देण्यात आला, त्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या अर्चना नेवरेकर यांनी त्याचा भार उचलला, अजूनही काही कलाकारांना हा लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे, यासाठी दानशूर मंडळींनी पुढे यावे असे आवाहन कलाकार संघाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांनी केले. प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.