जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे घेऊन येत आहे, भव्यदिव्य संगीतमय नजराणा “मानापमान" दिवाळी २०२४ मधे!


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "मानापमान" दिवाळी २०२४ मध्ये प्रदर्शनास सज्ज होत आहे. 
          नुकताच अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "मानापमान" पुढल्या वर्षी दिवाळी मध्ये रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये कलाकारांचे पोषाख, निसर्गरम्य ठिकाणं, वैशिष्ठ्यपूर्ण चित्रीकरण पाहता एकंदरीत चित्रपटाची भव्यदिव्यता दिसून येतेय. कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. 
       राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव',  'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित एक नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.