दामोदर नाट्यगृह बचाव साठी सरसावले 'सहकारी मनोरंजन मंडळ'.
परळ येथील दामोदर नाट्यगृह कोणतीही पूर्व सूचना न देता जमीनदोस्त करण्यास सुरुवात केल्याने तसेच या जागी पुन्हा नाट्यगृह बांधून देण्याची कोणतीही लेखी हमी न दिल्याने दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी सहकारी मनोरंजन मंडळ पुढे सरसावली असून त्यास विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवार रोजी शांततापूर्ण आंदोलन दामोदर नाट्यगृहाच्या प्रवेश प्रवेशद्वारावर करण्यात आले यास ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर उपस्थित होते
कामगार नेते कै. ना म जोशींनी सुरू केलेली चळवळ एकाएकी बंद होऊ देऊ नये. यासाठी गुरुवार दि. ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वा.दामोदर हॉलच्या कट्ट्यावर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.यास मुंबई मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला व तसे पत्रही मंडळाच्या अध्यक्षाना देण्यात आले.
या वेळेस संघटन सहसचिव चेतन काशीकर यांनी 'माई' संघटनेची बाजू मांडली तसेच त्यांच्या सोबत गणेश तळेकर व सुरज खरटमल आदी सदस्य उपस्थित होते.
जेष्ठ दिग्दर्शक व अभिनेते विजय पाटकर म्हणाले,"ही वास्तू जमीनदोस्त करतांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती त्यामुळे जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच चालू ठेवणार.
यावेळेस नाट्य व्यवस्थापक हरी पाटणकर, जेष्ठ नाट्य अभिनेते राघवकुमार, सुंदर परब, दिलीप दळवी व इतर मान्यवर हजर होते.
Comments
Post a Comment